Site icon InMarathi

गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात जुन्या हॉटेलचे ‘वय’ थक्क करणारे आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जगभरात आपल्याला अनेक हॉटेल आढळतील, जिथे तुम्हाला सर्व सुविधा मिळतील. आपल्यापैकी अनेकांची इच्छा असते की अश्या महागड्या हॉटेल्समध्ये राहावे. तिथल्या सोयी-सुविधा उपभोगाव्या, तुम्हाला अनेक पंचतारांकित हॉटेल्सबद्दल माहितही असेल.

आज आम्ही आपल्याला जपानच्या एका अश्या हॉटेलबाबत सांगणार आहोत ज्याची जगातील सर्वात जुने हॉटेल म्हणून ‘गिनीज़ बुक ऑफ़ वर्ल्ड रिकार्ड्स’मध्ये नोंदणी करण्यात आली आहे.

 

hotelyouwant.com

निशियामा ओनसेन केंकन हे हॉटेल जपान येथे फुजिवारा माहितो नावाच्या एका व्यक्तीने सातव्या शतकात बनविले होते. आज ह्या कुटुंबाची ५२ वी पिढी ह्या हॉटेलला चालवत आहे.

१३०० वर्ष जुने हे हॉटेल जगातील सर्वात जुने हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या जुन्या आणि विशिष्ट हॉटेलमध्ये जगभरातील हायप्रोफाईल लोक राहिलेले आहेत. हे हॉटेल अतिशय सुंदर आणि तेवढेच आरामदायी देखील आहे. येथील गरम पाण्याच्या झऱ्यासाठी हे हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. तसेच येथील नैसर्गिक सौंदर्य देखील मन मोहून घेते. ह्या हॉटेलच्या एका बाजूने नदी तर दुसर्या बाजूला दाट जंगल आहे.

 


१९९७ साली ह्या हॉटेलला रिनोवेट करण्यात आले होते, पण तरी देखील ह्याच्या जुन्या ओळखीला धक्का देखील लागू दिला नाही. ३७ खोल्या असलेल्या ह्या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्याचा किराया हा ४७० डॉलर एवढा आहे.

 


एवढं जुने आणि सुंदर हॉटेल कदाचितच जगाच्या पाठीवर आणखी कुठे असेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version