Site icon InMarathi

त्या दोघांचा छोटासा प्रयत्न आता अन्नाच्या नासाडीविरोधातली व्यापक मोहीम म्हणून आकार घेतोय!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अनेकदा आपले काहीसे प्रयत्न जगात बदल घडवून जातात. असे बदल ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. असच काहीसं इंग्लंडच्या एडम स्मिथ आणि जो हर्कबर्क ह्यांनी करून दाखवलं आहे. त्यांचा एक छोटासा प्रयत्न आता एका खास मोहिमेत रुपांतरीत झाला आहे.

इंग्लंड येथे राहणाऱ्या ह्या दोघांनी अन्न वाया जाण्यापासून वाचविण्यासाठी काही वर्षांआधी जंक फूड स्टोर चेनची सुरवात केली होती. ह्या स्टोरमध्ये सुपरमार्केटमध्ये रिजेक्ट करण्यात आलेल्या फूड आयटम्स तसेच रेस्टॉरंटमधील उरलेले अन्न आणल्या जाते. ह्यानंतर हे अन्न गरजू लोक आपल्या इच्छेनुसार किंमत देऊन विकत घेतात.

 

resource.co

ह्या स्टोरमध्ये लोकांना गरजेची ती प्रत्येक वस्तू मिळते ज्यासाठी ते सुपरमार्केटमध्ये जातात. ह्यात फळ, भाज्या, ब्रेड, केक आणि चिकन इत्यादी सर्व खाद्यपदार्थ येतात. ह्या स्टोरची सुरवात “द रीयल जंक फूड प्रोजेक्ट्स” च्या नावाने करण्यात आली होती.

 

static.origos.hu

हे स्टोर सोमवार ते शनिवार फक्त २ तासांसाठी उघडण्यात येते. ह्यादरम्यान येथे ग्राहकांची लांबच लांब रांग लागते. आता तर ह्या स्टोरची लोकप्रियता एवढी वाढत चालली आहे की येथे येणारं समान लगेच संपून जातं.

 

dainikbhaskar.com

येथे येणारे समान हे सुपरमार्केटच्या दर्ज्याचे जरी नसले तरी ते खाण्या लायकीचे नक्की असते. म्हणजे जर सुपरमार्केटमध्ये मिळणाऱ्या एखाद्या डब्यावर एखादा स्क्रॅच असेल तर तो डबा येथे आणल्या जातो. तसेच एखाद्या भाजीची काडी हिरवी नाही तर लाल झाली असेल तर ती भाजी देखील येथे आणली जाते.

 

thegryphon.co.uk

२०१६ साली एडमने आपले पहिले स्टोर उघडले होते. तर आता इंग्लंडमध्ये असे ४ स्टोर उघडण्यात आले आहे. आणि आणखी ६ स्टोर उघडण्याची तयारी सुरु आहे. हे स्टोर प्रत्येक आठवड्याला जवळपास २५ हजार लोकांना अन्न उपलब्ध करवून देते. त्यासोबतच ह्यामुळे दर आठवड्याला ६ टन अन्न वाया जाण्यापासून वाचविल्या जाते.

एडम हे आधी शेतात काम करायचे, त्या शेतातील डुकरांना काकडी खायला दिल्या जायची, ज्यापैकी जास्तकरून काकडी ही खराब होऊन जायची. तर दुसरीकडे काही लोकांना काकडी विकत घेणे देखील शक्य होत नसे. ह्यातूनच एडम ह्यांना अन्न वाचविण्याची ही कल्पना सुचली. त्यांचा हा उपक्रम अगदी स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे.

 

jagranimages.com

एका रिपोर्ट नुसार जगभरात जेवढ जेवण तयार होतं त्याच्या एक तृतीयांश म्हणजेच जवळपास १ अरब ३० कोटी टन अन्न हे अक्षरशः वाया जातं. तर जागतिक भूख निर्देशांकमध्ये भारताचा जगात ६७ वा क्रमांक लागतो, म्हणजेच भारतातील प्रत्येक चौथा व्यक्ती उपाशीपोटी झोपतो. त्यामुळे जर आपल्या देशातही अश्या प्रकारचा कुठला उपक्रम राबविण्यात आला तर कदाचित कुणावर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version