Site icon InMarathi

भारत सरकारला “पाच टन” सोन्याची मदत करणारा निजाम.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जातं. तसं ते खरंच आहे. अशे अनेक राजे महाराजे, श्रीमंत व्यक्तित्वे भारतात होऊन गेली आहेत. आज ही भारतात अनेक श्रीमंत व्यक्ती आहेत जे जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण करून आहेत.

त्यांच्या हाती कोटी रुपयांची धन दौलत आहे.

त्यात काही प्रसिद्ध नावं प्रत्येक भारतीयाला मुखोदगत आहेत जसे अंबानी, टाटा, बिर्ला आणि संघवी परंतु एक असं नाव आहे जे जगातील चिरकाल गर्भ श्रीमंत व्यक्तींच्या यादीत या सर्वांना मागे टाकून अजरामर झालं आहे आणि भारताच्या सुबत्तेचं प्रतीक बनलं आहे.

ते नाव आहे हैद्राबादच्या अंतिम निजामचं उस्मान अली खानचं !

 

hindustantimes.com

ब्रिटिश वर्तमान पत्र द इंडिपेंडंट आणि नाणेनिधीच्या नव्या सूची अनुसार सर्वकालीन धनवानांच्या सूची मध्ये हैद्राबादचा अंतिम निजाम सहाव्या स्थानावर आहे. त्याची ऐकून संपत्ती हि १३६ अब्ज डॉलर इतकी मोजण्यात आली होती.

जी आजचे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या ३० अब्ज रुपये या संपत्तीच्या १० पट होती. इतका श्रीमंत हैद्राबादचा निजाम होता.

भारत सरकारला ला देऊ केलं होतं ५ टन सोनं

निजाम उस्मान अली खान जवळ एकेकाळी भारत सरकारपेक्षा जास्त धन संपत्ती होती. १९६२ च्या भारत चीन युद्धामुळे आणि १९६५ च्या पाकिस्तान सोबतच्या युद्धामुळे देशाची आर्थिक परिस्थिती जरा खराब होती.

तेव्हा भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी सरकारला मदत करण्यासाठी देशातील धनवंत लोकांना साकडे घातले होते. परंतु कुठल्याही व्यक्तीने पुढाकार घेतला नाही.

तेव्हा निजाम उस्मान अली ने पंतप्रधानांच्या विनंतीवरून ५ टन सोनं राष्ट्रीय कोषासाठी देऊ केलं होतं. आज त्या सोन्याची किंमत १६० हजार कोटी रुपये इतकी आहे .

 

deccanchronicle.com

हैद्राबादचा निजाम कोण होता?

१७१३ मध्ये मुघल शासनाच्या अधीन हैद्राबाद मध्ये निजामशाहीची सुरुवात झाली. जिला निजाम मुल्क म्हणून ओळखलं जाऊ लागलं. १९४७ मध्ये भारताचं विभाजन झाल्यावर निजाम ने भारतात सामील होण्यास नकार दिला होता.

तेव्हा भारत सरकारने सेनेच्या मदतीने हैद्राबादवर आक्रमण केलं आणि चार दिवसांत स्वतंत्र भारतात सामील केलं.

काही कालावधीच्या लष्करी शासना नंतर १९५२ साली विधानसभेचं गठन करण्यात आलं. उस्मान अली खान निजामशाहीचे शेवटचे निजाम होते. ते १९६७ ला ८० वर्षांचे असताना दगावले.

निजामाच्या काही रंजक कथा

आज पण हैदराबादेत निजामाच्या बाबतीत अनेक किस्से आणि कथा ऐकायला येतात. निजामाला मोत्यांचा आणि घोड्यांचा शौक होता. त्यांचा जवळ अरबी वंशाचे शेकडो घोडे होते. १३४० कोटी किंमत असल्येला हिऱ्याचा वापर निजाम पेपरवेट म्हणून करत असे.

हैद्राबादचा निजाम जरी श्रीमंत असला तरी त्याला साधेपणा प्रिय होता. त्याने पस्तीस वर्ष एकच टोपीचा वापर केला. त्याने कधी कपड्याला इस्त्री करवून घेतली नाही.

तो फक्त एक प्लेट भात खात होता. त्याला कुठलंच व्यसन नव्हतं. त्याने आयुष्यभर सिगारेट आणि दारूला स्पर्श सुद्धा केला नाही. निजामाला डझन भर बायका आणि मूलं होती. जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याला एकूण ८३ मुलं मुली होते.

 

punjabkesari.com

निजामाचे वारस

निजामाचे वारस आज एक गुपित आयुष्य जगत आहेत. निजाम ८३ पैकी एकाही मुलाला स्वतःचा वारस म्हणून नेमलं नाही. जीवनाच्या शेवटच्या दिवसांत आपल्या नातवाला मुकर्रम जहाँ ला वारस म्हणून नेमलं. मूकर्रम जहाँची आई तुर्की होती. तिथे ते एका छोट्या फ्लॅट मध्ये राहत होते.

एकवेळ अशी आली की मूकर्रम जहाँ कडे आपली बाजू मांडणाऱ्या वकिलाची फी भरायला पैसे नव्हते.

अश्याप्रकारे एका गर्भश्रीमंत राजाचा अंत झाला. निजाम हा अत्यंत क्रूर होत असं देखील म्हणतात.

त्याने हैद्राबाद मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या लोकांवर प्रचंड जुलूम केल्याची नोंद देखील आहे. पण शेवटी त्याला कर्माचे फळ मिळाले आणि त्याने त्याचं सर्व ऐश्वर्य गमावलं व अश्याप्रकारे निजाम राजवट नावाची अति श्रीमंत बलवान सत्ता लयास गेली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version