आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
भारत देशाचा इतिहास जेवढा ऐतिहासिक तेवढच ऐतिहासिक येथील खाद्यपदार्थ देखील आहेत. जगभरात भारत जरी त्याच्या संस्कृतीसाठी ओळखला जात असला तरी आपले जेवण देखील तेवढचे प्रसिद्ध आहे.
तुम्ही आजवर भारताबाबत, इथल्या शूरविरांबाबत अनेक कहाण्या एकल्या असतील पण आज आपण काही अश्या पदार्थांच्या कहाण्या जाणून घेणार आहोत जे आपण अतिशय आवडीने खातो.
१. जिलेबी :
जिलेबी हा आपल्या देशातील सर्वात आवडता गोड पदार्थ आहे. पण जिलेबीचा जन्म हा भारतात नाही तर पश्चिमी आशियात झाला होता. १५ व्या शतकातील ऐतिहासिक लिखाणात ह्याचा पुरावा आढळतो. तिथे ह्याला बनविण्याची पद्धत आणि सामुग्री एकसारखीच आहे फक्त नाव वेगळ आहे.
२. म्हैसूर पाक :
म्हैसूर पाक ह्याच्या नावातच ह्याच्या जन्मस्थानाची माहिती येते. ह्याची सुरवात २० व्या शतकात झाली होती. म्हैसूर येथील राजा नालावादी कृष्णराजा ह्यांना खायला आवडायचे. त्यांच्या आचाऱ्याने एकदा एक गोड पदार्थ त्यांच्यासाठी तयार केला. राजाने जसा हा गोड पदार्थ त्याच्या जीठेवर ठेवला तो वितळून गेला.
राजाला हा गोड पदार्थ खूप आवडला. त्यांनी ह्याच नाव विचारलं, तेव्हा त्या आचाऱ्याने सांगितले की ह्या पदार्थाचा शोध म्हैसूर येथे लागला म्हणून ह्याचं नावं म्हैसूर पाक असावं. कन्नड भाषेत पाक म्हणजे मिठाई.
३. दाल बाटी :
दाल बाटी हे राजस्थानातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध व्यंजन आहे. दाल बाटी राजस्थान आणि तेथील राजवाड्यांच तेव्हाच जेवण होत जेव्हा ते लोक युद्धात राहायचे. ह्याचे कारण असे की, बाटी ही अतिशय कमी पाण्यात बनविता येते आणि ह्याला साजूक तुपात बुडवून खाल्ले जाते. अश्या लढायांत दाल बाटीच्या तुपामुळे ताकद मिळायची तसेच कमी पाणी असल्याने ते जास्त काळ लढू शकायचे.
४. पेठा :
आग्रा हे तेथील ताजमहाल साठी जेवढ प्रसिद्ध आहे तेवढेच तिथे मिळणाऱ्या पेठ्यासाठी देखील आहे. तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल पण ह्या पेठ्याची कहाणी ताजमहालाशी निगडीत आहे. सांगितल्या जाते की, ताजमहालाच्या निर्माण कार्यादरम्यान जवळपास २१ हजार मजदूर तिथे काम करायचे.
ते मजदूर रोजचे जेवण खखाऊन खाऊन त्रस्त झाले होते, जेव्हा ही बाब शहाजहाला कळली तेव्हा त्याने ही समस्या ताजमहालाचे वास्तुविशारद उस्ताद इसा इफिदी ह्यांना सांगितली.
ह्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उस्ताद इसा इफिदी हे पीर नक्षबंदी साहिब ह्यांच्या दरबारात गेले. दंतकथेनुसार पेठ बनविण्याची पद्धत स्वतः अल्लाहने त्यांना सांगितली होती. ज्यानंतर जवळपास ५०० आचाऱ्यांनी मिळून पहिल्यांदा पेठा तयार केला.
५. दम बिर्याणी :
लखनौ आणि हैदराबाद येथील बिर्याणी ही सर्वात चविष्ट असल्याचं म्हटले जाते. पण जेव्हा ह्या पदार्थाचा जन्म झाला तेव्हा हा पदार्थ म्हणजे गरिबांचं जेवण होतं. अवध येथील नवाबने आपल्या अचाऱ्यांना एक असा पदार्थ बनविण्यासाठी सांगितले जो कमी खर्चात जास्त लोकांसाठी बनविता येईल.
ह्यासाठी त्या अचाऱ्यांनी खूप मोठ्या भांड्यांचा वापर केला त्यात अनेक प्रकारचे मसाले, इतर काही वस्तू आणि तांदूळ घालून शिजवले. त्यानंतर जे शिजून आलं त्याला बिर्याणी म्हटल्या गेलं. ह्याला बनविण्याच्या पद्धतीला ‘दम’ असे नाव देण्यात आले.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.