Site icon InMarathi

जम्मूमध्ये Eiffel Tower पेक्षा ३५ मीटर उंच, कुतुबमिनारपेक्षा ५ पट उंच रेल्वे ब्रिज उभा रहातोय!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जगाला हिंदुस्थानचा अजुन एक सुखद धक्का. जम्मुमधील चेनाब नदीवर उभारला जातोय जगातील सर्वात उंच रेल्वे पुल.

ह्या ब्रिजच्या उंचीचा अंदाज यावा म्हणुन सांगायचं झाल्यास, हा पूल, जगातील आश्चर्य असलेल्या आयफेल् टाॅवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. कुतुबमिनारच्या उंचीच्या पाचपट उंच आहे.

Source: Topyaps

Yup, आपण बांधतोय चक्क ३५९ मीटर उंचीचा पुल, ज्याचं बांधकाम २००४ च्या आॅगस्ट महिन्यात सुरु झालं असुन ते लवकरच पूर्ण होईल. ह्या बांधकामासाठी ५.१२ अब्ज रुपये ($ ९ कोटी २० लाख) खर्च होत आहेत. बारामुल्ला व श्रीनगरला जम्मुशी हा पुल उधमपुर-कटरा-गाजीकुंज मार्गे जोडणार आहे.

हा पुल पुर्ण झाल्यावर भारताच्या शिरपेचात दोन मानाचे तुरे खोवणार आहेत. एक म्हणजे “स्टील ब्रीज” ह्या प्रकारात जगात सर्वात जास्त उंचीचा (३५९ मी.) आणि “सर्वात जास्त स्पॅन/लांबी” असलेला (१३१५ मी.) हा पुल असेल.

Source: railway-technology

 

जम्मूमध्ये, स्थानिकांसाठी, दुर्गम पर्वतरांगांमधून प्रवास करणं फार त्रासदायक आहे. त्यामुळे इथल्या पर्यटन तसंच इतर उद्योगांवरदेखील अनिष्ट परिणाम होत असतो. ह्या अडचणींचा विचार करून JUSBRL (Jammu-Udhampur-Katra-Quazigund-Baramulla Railway Line) हा प्रोजेक्ट २००३ मध्ये मंजूर केला गेला. जम्मू ते उधमपूर रेल्वे लाईनचं काम २००५ सालीच पूर्ण झालं आहे.

जिज्ञासू वाचकांसाठी ह्या प्रोजेक्टवर एक छोटासा व्हीडीओ. नक्की बघा!

 

प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा असा हा पुल तयार होतोय मित्रांनो, लक्ष असु द्या…!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version