आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं काहीजणं म्हणतात. तर काहींच्या मते प्रत्येकाची लव्हस्टोरी वेगळी असते. अर्थात प्रेमाची व्याख्या काहीही असली, तरी प्रत्येकासाठी प्रेम ही भावना खुप महत्वाची असते. पण याच प्रेमळ नात्याची दुसरी तितकीच सत्य बाजू मान्य करण्यास आपण चाचरतो.
प्रेम हे दरवेळी प्रेमळ क्षण, सुखाचा पाऊस, चंदेरी स्वप्न, हातातले हात, आयुष्यभराची साथ इतकंच नसून निस्वार्थ भावना, नात्यातील अढळ विश्वास, खंबीर आधार, संयम, तडजोड आणि त्यागाचे प्रतीक असतं.
एक कच्चा धागा नात्याची विण सैल करून उसवू शकतो. आपल्या वैयक्तीक आयुष्याचे पडसाद नात्यावर उमटताना आपल्या साथीदारावर आरोप करणे सोपे वाटते.
अशावेळी भावनिक समतोल ढळला जाऊन प्रत्येक चूक गोष्टीचे खापर त्यांच्या माथी नकळत फोडत राहतो अश्या वेळी गोष्टींच्या मुळांचा विचार आपण कोणी करत नाही.
- जोडीदार निवडताना या ९ चुका झाल्या तर आयुष्यभर किंमत चुकवावी लागू शकते
- लोक आपल्या जोडीदाराला better half का म्हणतात याचे उत्तर देते ही ग्रीक दंतकथा!
बौद्ध भिक्षुक Chödrön च्या मते आपल्याला आपल्या साथीदारकडून एका अभेद्य भिंतीसारखा आधार अपेक्षित असतो. त्यांच्या कडेकोट सुरक्षेत राहणे सर्वांनाच आवडते. काळ- वेळेचे भान न ठेवता त्यांनी सतत आपले समर्थन करावे असे वाटणे साहजिक असते.
आधुनिक नातेसंबंधामध्ये आपणास आपला साथीदार कर्णासारखा प्रामाणिक आणि अचल हवा असतो. तो आपला best friend असावा.
सेल्फी-, शॉपिंग-मुव्ही-डान्स-म्युझिकली-स्नॅपचॅट-बाईक-नेटफ्लिक्स पार्टनर तसेच ‘पार्टनर इन क्राईम’ असावा. इतकंच काय तर सकाळच्या “मॉर्निंग बेबी’ पासून ते “नाईट लव्ह” पर्यंतचा त्यांचा वेळ आपलाच असावा.. आणि यात काही वावगं आहे असं वाटत नाही बरं का.
कारण ते लाईफ “पार्टनर” आहेत नं.
त्यांचे buddy to gaddi (गाडी हो) आपल्या पसंतीचे असावेत अशी माफक (?) अपेक्षा असतेच. नेहमीच्याअड्ड्या पासून तर नवीन उघडलेल्या zara शोरूमपर्यंत सोबत भटकंती करण्याचे बेत आखावे लागत नाहीत; आपसूकच ठरलेले असतात.
या सर्वांनी नातं अगदीच बहरलेलं दिसेल, असेल वा राहील असं वाटू शकतं पण हे दिसतं तितकं सोप्पं नाही.
आजच्या बिझी शेड्युल मध्ये आणि धकाधकीच्या जीवनात अश्या अपेक्षा प्रत्येकावर थोडं दडपण, बरचसा दबाव आणणारे आणि अगदीच विरोधाभास जागविणारे आहे. या अपेक्षा म्हणजे आपल्याच प्रेमाच्या गोड पाकात मिठाचा खडा टाकण्यासारखे आहे.
“मी माझ्या बेस्ट फ्रेंड च्या प्रेमात आहे” किंवा “माझा/ माझी बेस्ट फ्रेंड माझा लाइफ पार्टनर आहे” हे बोलण्यात कितीही भूषण वाटत असले तरीही ते आपले प्रियकर/ प्रेयसी असून बेस्ट फ्रेंड नाहीत असे Chödrön ना वाटतं. ते आपले साथीदार असून एक सोबती असण्याची खूप नितळ भावना जी आपल्या जीवनाची आवड आणखी दृढ करते.
आपल्या नात्याचा पाया ज्यांच्या विचार-आचारांनी शुद्ध आणि भक्कम होतो.
जेव्हा गोष्ट अपेक्षांची येते, त्यांनी अपेक्षांचे किती घडे भरावेत यात काही मर्यादा असाव्यात. त्यांनी तुमचं शब्दशः “सर्वस्व” असू नये; बनूही शकत नाहीत. बनण्याचा प्रयत्न केला गेल्यास आपल्या नात्याच्या मूलभूत संपत्तीवर सुरक्षितता, मत्सर, हेवा, भीती यांचे दरोडे पडण्याची दाट शक्यता असते.
याने आपण नात्यावर कमी आणि दिखाव्यावर जास्ती लक्ष केंद्रित करू लागतो. आपले नाते भावनिकदृष्ट्या दृढ असणे जास्ती गरजेचे आहे. आपण डोळ्यांवरील ती चमचमती “so called relationship goals” ची पट्टी उतरविल्यावर प्रेमाचा खरा अर्थ लक्षात येऊ शकतो.
नात्यात दोन्ही जीव समान वागविले गेले पाहिजेत, विश्वास हा अगदीच मूलभूत घटक असला तरी नाते त्यानेच टिकविता येते.
या विश्वासासह स्वातंत्र्य देखील महत्वाचे आहे. हे स्वातंत्र्य फक्त साथीदारासाठीच नव्हे तर स्वतःसाठी देखील असावे. मग ते विचारांचे, वेळेचे, मित्रांचे, आवडी निवडीचे कोणतेही असो.
–
- आपला जोडीदार निवडताना फर्स्ट इम्प्रेशन पाडण्यासाठी काय कराल? वाचा
- कितीही घुश्श्यात असाल, तरी जोडीदाराला या ७ गोष्टी चुकूनही बोलू नका, नाहीतर…
एकच ग्रुप किंवा फ्रेंड सर्कलमध्ये असणं कदाचित वागण्याबोलण्यात दडपण आणू शकते. परिपक्वता नसेल तर साधी मस्करी देखिल न्यूनगंड जगवू शकते. तिथे कपल म्हणून रहावे की मित्र म्हणून हा एक निरुत्तरीत प्रश्न आहे.
प्रत्येक व्यक्ती ही तिचे वेगळे विश्व जन्मतःच घेऊन येते. त्या विश्वांचा योग्य मिलाप यशस्वी नात्यांची सांगड घालतो. मनापासून दिलेल्या स्वातंत्र्याने साथीदाराचे विश्व जपता येते. त्यांचे वेगळेपण त्यातच खुलते. एका नवीन आवडी निवडीचा आस्वाद यातून घेता येऊ शकतो.
‘नियमावली’ ही नात्यात नसावी, फिरण्याची, वागण्याबोलण्याची, हवा तिथे वेळ घालविण्याची मुभा, योग्य राखलेले अंतर हे एकमेकांबद्दलचा आदर दुणावते.
शेवटी प्रेमिकांना ‘नाणे’ म्हटले तरी नाण्याच्या दोन विभिन्न बाजू एकमेकांची पाठराखण करतच आपापले महत्त्व पटवून देतात…. काय म्हणता?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.