आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
अमेरिका आणि रशिया या दोन देशांमधील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिलेले आहेत. पहिल्यापासून महासत्ता बनण्यासाठी या दोन्ही देशात रस्सीखेच सुरु आहे. एक काळ असा होता जेव्हा रशिया हा महासत्ता होता आणि अमेरिका त्यावेळी नुकतीच जागतिक राजकारणात रशियाच्या मागे होती.
दुसरे महायुद्ध रशियाला महागात पडले आणि अमेरिकेचा जागतिक महासत्ता म्हणून उदय झाला.
परंतु या दोन देशांचे एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे प्रमाण नेहमी सुरु असते. अमेरिकेची CIA ही गुप्तहेर संस्था आणि रशियाची KGB एकमेकांवर सतत हेरगिरी करत असतात आणि त्याच्यानंतर एकमेकांवर जाहीरपणे हेरगिरीचे आरोपही लावत असतात.
नुकतीच फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे शिखर परिषद पार पडली. या परिषदेत या दोन्ही देशाचे दिग्गज नेते अर्थात महामहीम डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे समोरासमोर आले.
मात्र या नेत्यांच्या भेटीच्या आधीच अमेरिकन गुप्तहेर खात्याला या भेटीबाबत धडकी भरलेली होती. कारण भेटीच्या आधी अमेरिकेमध्ये नुकतेच KGB च्या हेरगिरी चे एक प्रकरण FBI ने उघडकीस आणलेले आहे. अमेरिके मध्ये २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहत होते. त्यावेळी हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रकम्प हे दोन उमेदवार अध्यक्षपदाच्या दावेदारी साठी उभे होते.
ट्रम्प यांची प्रतिमा मुळातच उर्मट, संतापी आणि हट्टी अशी रंगवली गेल्यामुळे प्रथमदर्शनी तरी जनमत ट्रम्प यांच्या बाजूने नव्हते. जगभरात देखील ट्रम्प यांची प्रतिमा फार चांगली बनली नव्हती.
त्यावेळी रशियाच्या केजीबी ने ट्रम्प निवडून येवू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते.
जी वृत्तपत्रे आणि मीडिया ट्रम्प यांच्या विरोधात होता त्यांना गुप्तपणे आतून रशिया तर्फे पैसा पुरवण्यात आला. हेरगिरी करणारे डबल एजंट त्यावेळी अमेरिके मध्ये तैनात करण्यात आलेले होते. ज्यावेळी निवडणूक संपली आणि ट्रम्प निवडून आले त्यावेळी आपल्या विरोधकांचा त्यांनी समाचार घ्यायला सुरुवात केली.
निवडणुकीच्या काळात रशियाने केलेल्या हेरगिरीचे पुरावे अमेरिकन गुप्तहेर खात्याच्या अधिकाऱ्यांना सापडले. त्यानुसार डबल एजंट म्हणून अमेरिकेत कार्यरत असणाऱ्या १६ रशियन अधिकाऱ्यांची ओळख पटवण्यात आली. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
ही शिखर परिषद सुरु होण्यापूर्वी या संदर्भात अमेरिकन कोर्टाने गुन्ह्याचं सविस्तर विवरण करणारे आरोपपत्र जाहीर केले. यामुळे शिखर परिषदेला पुतीन आणि ट्रम्प समोर आल्यानंतर काय घडणार याने अमेरिकन गुप्तहेर एजन्सीला धडकी भरली.
यापूर्वीदेखील ट्रम्प यांनी रशियाच्या एका भेटीमध्ये अमेरिकन गुप्तहेर खात्याची काही गुपिते रशियन अधिकाऱ्या समोर उघड केली होती. त्यामुळे आता हे दोन नेते समोरासमोर आल्यावर त्यांच्यात अजून काय नक्की बोलणे होईल यावर सर्व सुरक्षा एजन्सी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होत्या.
अमेरिकन न्यायालयाने आरोपपत्र सादर केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांनी पुतीन यांना रशियाच्या हेरगिरी बद्दल जाब विचारला पाहिजे अशी भूमिका अमेरिकन लोकांनी घेतली होती.
त्यासाठी वृत्तपत्रे, टीव्ही वाहिन्या, पब्लिक पोल यांच्याद्वारे ट्रम्प यांच्यावर मोठा दबाव आणला जात होता. जेव्हा शिखर परिषदे मध्ये हे नेते आमने सामने येतील तेव्हा त्यांच्यामध्ये मोठी खडाजंगी होईल अशी अपेक्षा सर्वाना होईल. ट्रम्प पुतीन यांना त्यांच्या हेरगिरीच्या कृत्याबद्दल जाब विचारातील आणि चर्चेला वेगळे वळण लागू शकते असा बऱ्याच विश्लेषकांचा कयास होता.
मात्र भेटीदरम्यान जेंव्हा हे दोन नेते एकमेकांसमोर आले तेव्हा त्यांच्यात बऱ्याच संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा झाली.
यामध्ये रशियन इमिग्रंट चा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. मात्र या व्यतिरिक्त या दोन देशांच्या अध्यक्षांनी आपापसात काय चर्चा केली आणि खरोखर ट्रम्प यांनी पुतीन यांना अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी मध्ये केजीबी चा असलेला तथाकथित सहभाग याबद्दल जाब विचारला का याबाबत ची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.
अनेक वार्ताहरानी जंग जंग पछाडूनही याबाबत ट्रम्प यांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे खरेच हा मुद्दा बोलला गेला अथवा नाही हे शोधून काढण्याची जबाबदारी पुन्हा या दोन देशांच्या सुरक्षा यंत्रणेवर पडली आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.