' जगातील सर्वात पहिले घड्याळ- त्याच्या निर्मितीची आणि प्रवासाची रोचक कहाणी.. – InMarathi

जगातील सर्वात पहिले घड्याळ- त्याच्या निर्मितीची आणि प्रवासाची रोचक कहाणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

वेळ कधीही कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे वेळेसोबत बदलत राहणे ह्यातच शहाणपणा असतो. गेलेला एकही क्षण कधी परत येत नाही.

त्यासोबतच आपणही नेहेमी बदलत असतो. आणि हा बदल आपल्यात तसेच आपल्या आजूबाजूला होत असल्याची जाणीव आपल्याला कोणी करवून देत असेल तर ते म्हणजे घड्याळ.

घड्याळ आपल्याला जाणाऱ्या प्रत्येक क्षणाची आठवण करवून देतो त्यासोबतच येणाऱ्या वेळेचीही जाणीव करवून देतो. हे घड्याळ आयुष्यात आपल्याला खूप काही शिकवते.

 

 

old watch-inmarathi
yourwatchhub.com

जगातील पहिले घड्याळ कोणी आणि कधी बनविले असेल हा प्रश्न अनेकदा आपल्यालाही पडला असेल.

आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात पहिले घड्याळ आणि त्याच्या निर्माती ची कहाणी सांगणार आहोत.

 

old watch-inmarathi01
dev.quillandpad.com

जगातील पहिले घड्याळ निर्माता म्हणून पीटर हैनलैन ह्यांना ओळखले जाते. नुकतंच त्यांचं एक घड्याळ आढळून आलं, ज्याला पोमँँडर (Pomander) असे नाव देण्यात आले आहे.

हे घड्याळ जगातील सर्वात जुने घड्याळ असल्याच सांगितलं जात आहे.

 

old watch-inmarathi04
quora.com

जगातील जुन्या घडाळ्यांचे मुल्यांकन करत असलेल्या कमिटीच्या मते, सफरचंदाच्या आकाराचे हे घड्याळ जगातील सर्वात जुने घड्याळ आहे. ह्या कमिटीमध्ये हरमॅॅन ग्राएब, डॉ पीटर मिलिकिसिन ह्यांच्यासारखी तज्ञ मंडळी आहे.

 

old watch-inmarathi01
dev.quillandpad.com

हे घड्याळ जगासमोर येण्याची कहाणी देखील अतिशय रंजक आहे.

घड्याळ बनविणाऱ्या एका तरुणाने लंडन येथील एका जुन्या सामानांच्या बाजारातून १९८७ साली १० पाउंडमध्ये एक बॉक्स विकत घेतला होता. त्याच बॉक्समधून हे घड्याळ सापडले आहे.

त्याने हे घड्याळ २००२ साली विकले आणि ह्याच्या नवीन मालकाने देखील ही आणखी कुणाला ते विकले. त्यानंतर हे घड्याळ एका रिसर्चरने विकत घेतले. ज्याने ह्या घड्याळाला ओळख मिळवून दिली.

 

old watch-inmarathi03
yourwatchhub.com

विशेष म्हणजे हे घड्याळ पूर्णपणे तांबे आणि सोनं ह्यापासून बनले आहे. हे घड्याळ १५०५ साली बनविण्यात आले होते.

ह्या घड्याळ्याला पीटर हैनलैन ह्यांचे पर्सनल घड्याळ सांगितले जात आहे. सध्याच्या स्थितीत ह्या घड्याळ्याची किंमत ३०-५० मिलियन युरो एवढी सांगितली जात आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?