Site icon InMarathi

स्मोकिंग न करताही फुफुसांच्या कॅन्सरचं वाढतं प्रमाण, याची नेमकी कारणं…

cancer without smoking feature InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

पाहायला गेल तर सिगरेट गुटखा यांच्या पाकीटावर सुद्धा संभाव्य धोके लिहिलेले असतात तरी आपल्या इथे तंबाखू,गुटखा किंवा सिगरेट यांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना काही दिसत नाही, उलट दिवसेंदिवस ही प्रमाण वाढतानाच दिसतंय!

आणि सिगरेट ओढणे म्हणजे स्टाइल मारण्याची एक पद्धत अशी काहीशी समजूत सध्याच्या तरुण मुला-मुलींमध्ये आढळून येत आहे, काही शाळकरी विद्यार्थी सुद्धा या व्यसनांच बळी होताना सुद्धा दिसतंय,त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल काहीतरी ठोस पावल सरकारने उचलायला हवीत असं प्रकर्षाने जाणवत आहे!

सर्वात अधिक कॅन्सर हा सिगरेट ओढल्याने होतो, आणि त्याचा अपाय फक्त व्यसन करणाऱ्याच व्यक्तीला होतो असं नाही तर त्या व्यक्तीच्या आसपास असणाऱ्या लोकांना सुद्धा हा त्रास होतो याला इंग्रजी मध्ये पॅसिव्ह स्मोकिंग असे सुद्धा म्हणतात!

 

shutterstock.com

आणि याच कारणामुळे जे सिगरेट आणि तत्सम व्यसन करत नाहीत त्यांना श्वसनाचे आजार, दमा, तसेच कॅन्सर सारखे भयंकर आजार उद्भवतात!

खरे पाहता फुफुसाचा कँसर हा शब्द ऐकल्यावर आपल्यासमोर प्रतिमा उभी राहते ती एका मागोमाग एक असा सिगारेट ओढण्याचा सपाटा लावणाऱ्या चेन स्मोकर्सची. फुफुसाचा कँसर हा सिगारेटच्या, तंबाखूच्या व्यसनामुळे होतो हे आज अगदी सर्वमान्य, जगन्मान्य तत्व आहे.

आत्तापर्यंत डॉक्टर तरी हेच समजत होते परंतुनव्या आलेल्या काही धक्कादायक संशोधांचे निष्कर्ष असे सांगतात की ज्या व्यक्तीने कधी तंबाखू खाल्ली नाही किंवा सिगारेट ओढलेली नाही अशा व्यक्ती सुद्धा फुफुसाच्या कँसरला बळी पडू शकतात.

 

 

 

clinical OIMC

खरे पाहता कँसरचं प्राथमिक तत्व हेच आहे की शरीरातील पेशींमध्ये अचानक आणि असामान्य अशी होणारी वाढ. ही वाढ लगेच होत नाही. शरीरात अनेक वर्षे साठून अचानकपणे अशा वाढीचा उद्भव होवू शकतो.

त्यामुळे फुफुसाच्या कँसर ला जबाबदार असणारा धूर हा महत्वाचा घटक सिगारेट पिणाऱ्या किंवा न पिणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींच्या आयुष्यावर परीणाम करू शकतो.

 

chronicles.com

 

आपण समजून घेऊया की कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या कारणासाठी सर्वसामान्य सिगारेट न पिणाऱ्या व्यक्ती अशा महाभयानक रोगाच्या विळख्यात सापडतात.

१. सिगरेटचा धूर पसरलेल्या वातावरणात राहिल्यामुळे

खरे पाहता जी व्यक्ती सिगारेट पिते तिच्या फुफुसामध्ये निकोटीन साठून राहिलेले असते.

मात्र ज्या ठिकाणी बराच काळ व्यक्ती सिगारेट ओढत राहतात अशा वातावरणात देखील ज्या सिगारेट न ओढणाऱ्या व्यक्तींना काम करण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्याही फुफुसामध्ये वातावरणामध्ये पसरून राहिलेला निकोटीन आणि टार जातो.

अनेकदा सिगारेट ओढून झाल्यावर राहिलेले थोटूक न विझवता तसेच सोडले जाते. या थोटकांमधून निघणारा धूर वातावरण प्रदूषित करत राहतो आणि याच वातावरणात जिथे काम करत राहावे लागते अशा व्यक्तीना याचा धोका संभवतो.

या क्रियेला second-hand smoking म्हणतात. म्हणजे सिगारेट ओढली तर नाही पण सिगारेट च्या धुरात खूप वेळा काम करण्याची किंवा रहाण्याची वेळ तर येते अशा वेळी त्या ही व्यक्तीला फुफुसे दुषित होण्याचा धोका सतावतो.

healthplus.vn

 

२. कँसरला कारणीभूत ठरणाऱ्या कार्सिनोजेनिक घटकांच्या सानिध्यात केले जाणारे काम

काही काही व्यक्तींचे व्यवसाय अत्यंत दुर्दैवी असतात. खाण कामगार, कोळशाच्या खाणीत, वाळूच्या खाणीत काम करणारे लोक कामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणाचे शिकार बनत राहतात.

अभ्रकाच्या खाणी तसेच डीझेल चे जे साठे असतात त्या ठिकाणी कँसर ला कारणीभूत ठरणारी कार्सिनोजेनिक घटक प्रचंड प्रमाणात वातावरणात भरून राहिलेले असतात.

डीझेल इंजिन असतात त्यांच्यामधून देखील मोठ्या प्रमाणात कार्सिजेन उत्सर्जित होतो. त्यामुळे अशा ठिकाणी काम करणारे लोक भले सिगारेट ओढत नसतील तरीही त्यांच्या बाबतीत कँसर चा धोका जास्त प्रमाणात असतो.

 

radicalradiationremedy.com

 

३. हवा प्रदूषण

सार्वजनिक वाहतुकीमधून केले जाणारे जे हवेचे प्रदूषण असते त्याच्या धुरात देखील कँसर ला कारणीभूत ठरणारे घटक असतात.

अत्यंत दाट लोकवस्तीचे प्रदेश आणि वाहनांची प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी पेट्रोल डीझेल च्या धुरातून होणारा उत्सर्ग कँसर च्या कार्सिजेनिक घटकांचे प्रमाण वाढवतो.

 

themindunleashed .com

 

२०१० साली डीझेल प्रदूषणाचे जागतिक ओझे या नावाने एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला होता त्यात २०१० साली जवळजवळ २,२३,००० मृत्यू हे फुफुसाच्या कँसर चे होते ते ही फक्त डीझेल प्रदुषणाच्या प्रमुख कारणामुळे झालेले असा निष्कर्ष नोंदवण्यात आलेला होता.

 

४. रेडीएशन

किरणोत्सर्गाचा संसर्ग किती भयानक असू शकतो हे आपणास हिरोशिमा आणि नागासाकी च्या उदाहरणावरून ठाऊक आहे. खरे पाहता आज असे अनेक उद्योग धंदे आहेत ज्याच्यामधून रेडन नावाचा गॅस बाहेर पडतो.

या अप्रत्यक्षपणे वातावरणात पसरणाऱ्या रेडीएशनचा परिणाम म्हणून हवा दुषित होते.

 

livemint

 

अशा वातावरणात राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांना फुफुसाचा कँसर होण्याचा धोका सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीपेक्षा जवळजवळ ७० पट जास्त संभवतो.

त्यामुळे सिगारेट न पिणाऱ्या व्यक्तींना देखील आपल्या वातावरणाचा अभ्यास करण्याची आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात काम करताना काळजी घेण्याची गरज आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version