Site icon InMarathi

अलार्मचा शोध लागण्यापूर्वी लोक वेळेवर कसे उठायचे? आयडिया बघून पूर्वजांचं कराल कौतुक

Alarm clocks im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या आधुनिक युगात अनेक सोयी सुविधा आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे सगळ कसं सुरळीत सुरु असतं. मनुष्याचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी जेवढे उपयुक्त शोध लागले गेले, त्यामध्ये अलार्मचं नाव आघाडीवर घेतल गेलं पाहिजे. कारण हा अलार्म नसता तर आपलं काय झालं असतं देव जाणे!

आता आपल्याकडे अलार्म आहे म्हणून आपण रात्री उशिरा देखील निश्चिंत होऊन झोपतो, कारण आपल्याला माहित असतं की सकाळी काही झालं तरी अलार्म हा वेळेवर वाजणार आणि आपल्याला बरोबर जागा करणार.

थोडी झोपमोड होते म्हणा, त्याबद्दल आपण अलार्मला चार शिव्याही हासडतो, पण नंतर वेळेवर उठवल्याबद्दल त्याचे आभार देखील मानतोच की!

पण कधी विचार केलायं का, अलार्मचा शोध लागण्यापूर्वी लोक कसे काय वेळेवर उठत असतील? समजा एखाद्याला सकाळी सकाळी कुठे अर्जंट जायचं झाल तर तो बिचारा काय करत असेल?

अलार्म असता तर त्याची पंचायत मिटली असती. पण त्या काळी अलार्मच नव्हते तर तो माणूस वेळेवर उठून त्याच्या कामासाठी पोचत असेल का? तेव्हाच्या लोकांना अलार्म म्हणजे काय ही गोष्टच ठाऊक नव्हती, तर मग त्यांच्या दिवसाची सुरुवात कधी आणि कशी होत असेल?

 

 

१५ व्या शतकाच्या पूर्वी लोकांकडे जरी सुखसोयीच्या उपयुक्त गोष्टी नसल्या, तरी त्याचं डोक मात्र भन्नाट होतं. प्रत्येक गोष्टीवर ते काहीना काही जुगाड करायचे.

आता हे अलार्मचंच घ्या. त्यांच्याकडे तेव्हा अलार्म नव्हते परंतु त्यांनी त्यावर देखील एक जालीम शक्कल लढवली होती. तेव्हा लोक रात्री झोपायच्या वेळेस एक पेटलेली मेणबत्ती धातूपासून बनलेल्या प्लेटवर ठेवायचे आणि त्या मेणबत्तीवर ठराविक अंतराने खिळे टोचून ठेवलेले असायचे. जेव्हा खिळ्याभोवतालचं मेण वितळायचं तेव्हा तो खिळा धातूच्या प्लेटमध्ये पडायचा आणि मोठा आवाज व्हायचा.

त्या आवाजाने झोपलेला माणूस दचकून जागा झालाच पाहिजे. आणि समजा कधीकधी त्या आवाजानेही माणूस जागा झाला नाही तर, म्हणूनच हे लोक मेणबत्तीला ठराविक अंतराने ४-५ खिळे टोचून ठेवायचे, म्हणजे कोणत्या तरी एका खिळ्याच्या आवाजाने झोपलेला माणूस जागा होईल.

(अलार्म मधील स्नूझ प्रकरणाचं हे प्राचीन रूप)

 

हे जुगाड पाहून तुम्ही देखील म्हणत असाल, “वॉट अॅन आयडिया सर जी !!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version