' “ट्रेनच्या” डब्यांवर पिवळ्या – पांढऱ्या रंगांचे पट्टे असण्यामागचं कारण जाणून घ्या… – InMarathi

“ट्रेनच्या” डब्यांवर पिवळ्या – पांढऱ्या रंगांचे पट्टे असण्यामागचं कारण जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातील विभाग, भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्याचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज कॅबिनेट दर्ज्याचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.

आत्तापर्यंत, रेल्वे वाहतुकीवर भारतीय रेल्वेचा एकाधिकार होता. भारतीय रेल्वेची गणना जगातील सर्वांत मोठ्या रेल्वेंमध्ये केली जाते.

२५ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, जगातील सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे, जी कर्मचारीसंख्येत फक्त चिनी लष्करापेक्षा लहान आहे.

 

indian-railways 1 InMarathi

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या आयुष्यात एक महत्त्वाची भूमिका निभावते.

रेल्वे ही दळणवळणाच्या आधुनिक साधनांपैकी एक आहे. १९५१ मध्ये भारतीय रेल्वे राष्ट्रीयीकृत करण्यात आली. आज भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वांत मोठे रेल्वे नेटवर्क आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे.

वाफेच्या इंजिनापासून डिझेलच्या इंजिनापर्यंत आणि मग विजेच्या इंजिनापर्यंत असा त्याचा दिमाखदार प्रवास झाला आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे यात्रा सर्वांत सुरक्षित आणि अविस्मरणीय मानली जाते. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आपण अतिशय सहजपणे देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचू शकतो आणि ते देखील स्वस्तात.

electric railway InMarathi


अनेकदा ट्रेनमधून प्रवास करत असताना तुम्ही ट्रेनच्या रंगीत डब्यांबरोबरच काही ट्रेनच्या डब्यांवर वेगवेगळ्या रंगांचे पट्टे ओढलेले दिसतात. उदाहरणार्थ पिवळे किंवा पांढरे इ. तुम्ही कधी विचार केला आहे का की या रेल्वे डब्यांवरच्या रंगीत पट्ट्या नेमक्या काय दर्शवितात?

त्या विशिष्ट ट्रेनच्या डब्यांवरच का असतात? त्यांचा अर्थ काय असतो? तसेच ट्रेनच्या काही डब्यांचा रंग इतर डब्यांहून वेगळा का असतो? या लेखाच्या माध्यमातून आपण हे समजून घेणार आहोत.

 

lines-on-rail InMarathi

पहिल्यांदा आपण समजून घेऊयात रेल्वेच्या डब्यांवर वेगवेगळ्या रंगांचे पट्टे का असतात?

भारतीय रेल्वेमध्ये अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या चिन्हांचा वापर केला जातो. यासाठी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला काही चिन्हे असतात तशीच प्लॅटफॉर्मवर काही चिन्हे असतात.

या सर्व चिन्हांची गरज पडते कारण ती असली की प्रत्येक व्यक्तीला वेगळे सांगावे लागत नाही. यामुळे ट्रेनच्या डब्यांमध्ये देखील विशिष्ट चिन्हांचा वापर केला जातो.

निळ्या (blue) ICF डब्ब्यावर शेवटच्या खिडकीवर पिवळे किंवा पांढरे पट्टे आखलेले असतात. हे या विशिष्ट डब्यांना इतर डब्यांपासून वेगळे करतात. हे पट्टे ते द्वितीय श्रेणीचे अनारक्षित डबे असल्याचे सूचित करतात.

जेव्हा ट्रेन स्टेशनवर येते तेव्हा ज्या लोकांना जनरल डब्बा कोणता असेल हा प्रश्न पडतो त्यांना हे पिवळ्या रंगाचे पट्टे पाहून हाच जनरल डब्बा असल्याचे समजते. त्याच प्रकारे निळया किंवा लाल रंगावर पिवळ्या रंगाच्या पट्ट्या या विकलांग आणि आजारी माणसांच्या डब्यांसाठी वापरल्या जातात.

त्याच प्रकारे ग्रे म्हणजेच राखाडीवर हिरव्या पट्ट्या असतील तर त्याचा अर्थ असा की तो डब्बा केवळ महिलांसाठी राखीव आहे.

 

ladies-train-inmarathi

 

राखाडी रंगावर लाल रंगाचे पट्टे हे तो डब्बा प्रथम श्रेणीचा असल्याचे सूचित करतात. हे रंगांचे पॅटर्न सध्या मुंबई आणि पश्चिम रेल्वेमध्ये केवळ नव्या Auto Door Closing EMU पुरते मर्यादित आहेत.

आता ट्रेनमधील वेगवेगळ्या डब्यांच्या रंगांबद्दल जाणून घेऊयात.

भारतीय रेल्वे मध्ये जास्तकरून तीन प्रकारचे डबे असतात.

आयसीएफ (ICF)
एलएचबी (LHB)
हाइब्रिड एलएचबी (Hybrid LHB)

एखाद्या रेल्वेच्या दोन डब्यांमधील अंतर त्या गाडीची रचना, बोगी यावर अवलंबून असते.

– साधारणतः मोठ्या प्रमाणावर असलेला सामान्य ICF कोच (general ICF coach) निळ्या रंगाचा असतो जो सर्व ICF यात्री गाड्या, मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेनमध्ये असतो.

 

ICF Coach InMarathi

 

– ICF वातानुकूलिन ट्रेनमध्ये लाल रंगाच्या डब्यांचा वापर केला जातो.

– गरीब रथ ट्रेनचे डब्बे हिरव्या रंगाचे असतात.

– मीटर गेज ट्रेन मधील डब्बे तपकिरी(भूरे) रंगाचे असतात.

– बिलीमोरा वाघई यात्री, ही एक संकीर्ण गेज ट्रेन आहे. यामध्ये हलक्या हिरव्या रंगाचे डब्बे असतात. यामध्ये कधी ब्राउन रंगीत डब्बे सुद्धा असतात.

– याशिवाय काही रेल्वे अशाही आहेत ज्यांनी आपल्या स्वतःचे रंग ठरविले आहेत. उदाहरणार्थ केंद्रीय रेल्वेच्या काही ट्रेन्स या पांढरा-लाल-निळा अशी रंगसंगती वापरतात.

different colour coaches InMarathi

 

– LHB कोचमध्ये एक डिफ़ॉल्ट लाल रंग असतो जो राजधानी ट्रेनचा सुद्धा असतो.

– गतिमान एक्सप्रेस ही शताब्दीसारखी दिसते. मात्र यावर एक अतिरिक्त पिवळी पट्टी असते.

नजीकच्या काळात, भारतीय रेल्वे डब्यांच्या रंगात बदल करणार आहे.

आता ICF कोच गडद निळ्या रंगाऐवजी राखाडी (grey) रंगाचे असतील.

 

icf-inmarathi

 

रेल्वे बोर्डाने सर्व ५५००० इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF) डब्बे पुन्हा नव्याने स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन रंगाच्या मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांचा पहिला सेट या वर्षी सुरू होईल अशी आशा आहे. याच प्रकारे कालांतराने इतर डब्यांचे रंग देखील बदलण्यात येतील.

तर हे आहे ट्रेनच्या डब्यांवर वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्या काढण्याचे कारण आणि ही आहे ट्रेनच्या डब्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या रंगांमागची गोष्ट.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?