Site icon InMarathi

अपघातातून लागलाय पृथ्वीवरील सर्वात जुन्या ‘जैविक रंगाचा’ शोध! हा रंग कोणता असेल? जाणून घ्या..

australia-inmarathi03

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

ऑस्ट्रेलियन संशोधकांनी सहाराच्या वाळवंटात सर्वात जुन्या जैविक रंगाचा शोध लावला आहे. ह्या शोधानंतर वैज्ञानिकांच्या मते ह्यामुळे पृथ्वीवर उत्पन्न झालेल्या कॉम्प्लेक्स जीव संरचनेला समजण्यासाठी आणखी मदत होऊ शकेल. ह्या रिसर्चनुसार जगातील सर्वात जुना जैविक रंग हा कुठला दुसरा नसून गुलाबी हा आहे.

 

smithsonianmag.com

ह्या गुलाबी पिगमेंटला Cyanobacteria नावाचे अतिसूक्ष्म जीव बनवतात. रिसर्चनुसार हे पिगमेंट १.१ बिलियन वर्ष जुनं आहे. ह्याआधी ज्या जैविक रंगह शोध लागला होता तो ५०० मिलियन वर्ष जुना होता.

 

studyabroad101.com

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे सिनियर शोधकर्ता Jochen Brocks ह्यांच्या मते पृथ्वी जवळपास ४.५ बिलियन वर्ष एवढी जुनी आहे. पण तरी देखील ह्या पृथ्वीवर जीवाश्मांची उत्पत्ती ६०० वर्षांआधी झाली आहे. तेव्हा पृथ्वीवरील वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण खूप असल्याचे सांगितले जाते.

Algae च्या उत्पन्नानंतर Cyanbacterial समुद्रातून संकुचित झाले आणि त्यानंतर जीवांची संरचना होण्यास सुरवात झाली. ह्यापैकीच एक मनुष्य प्राणी देखील आहे.

 

uib.no

वैज्ञानिकांनी लावलेला हा शोध एक अपघात होता. एक तेल कंपनी पश्चिमी आफ्रिकेत खोदकाम करत होती. ह्यादरम्यान सापडलेल्या दगडांना तपासणीसाठी वैज्ञानिकांकडे पाठविण्यात आले. ज्यात हा शोध लागला आहे.

ह्या शोधादरम्यान आढळून आलेले हे पिगमेंट मानवी डोळ्यांनी निळी आणि हिरव्या रंगाची दिसतात, पण ती गुलाबी रंगाची आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version