बँक अकाउंटमध्ये पैसे instant transfer करण्याचा नवीन UPI app फंडा !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
पंतप्रधान मोदीजींनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद करायची घोषणा करून फक्त २ आठवडे झाले आहेत आणि आपल्या देशात बरीचशी मंडळी cashless economy कडे वळत आहेत. बऱ्याचश्या व्यापाऱ्यांनी आता paytm ,freecharge सारख्या wallet सेवेमधून पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
परंतु आता instant पैसे transfer करायचा अजून एक खूप छान option तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे आणि transfer केलेले पैसे कोणत्याही wallet मध्ये न जाता थेट जातील बँक अकाउंट मध्ये ! या नवीन सेवेचं नाव आहे Unified Payment Interface !
RBI चे आधीचे गव्हर्नर रघुराम राजन ह्यांनी chashless economy ला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच ह्या सिस्टिमचं उद्घाटन केलं होतं.
भारतातल्या बहुतेक सगळ्या बँकांनी UPI apps चालू केले आहेत ज्याचा वापर करून तुम्ही समोरच्याच्या बँक अकाउंट मध्ये direct पैसे transfer करू शकता.
आता तुम्ही म्हणाल यात काय एवढा ते तर मी IMPS किंवा NEFT वापरू देखील करू शकतो पण गंमत इथेच आहे, UPI apps साठी तुम्हाला payee register वगैरे करायच्या भानगडीतच पडायच नाहीये तर फक्त एक unique ID generate करून लगेच पैसे transfer होतात.
ही सेवा वापरण्यासाठी –
– IFSC code आणि बँक अकाउंट वगैरे टाकून payee add होण्यासाठी वाट बघायची गरज नाही
– त्वरित पैसे transfer होतात
– २४ तास ही सेवा चालू असते , बँक holiday वगैरे काही भानगड नाही.
– NEFT आणि IMPS सारखे कोणतेच charges नाहीत .
आता हे वापरायचंय कसं ते बघूया
– आपल्या बँकेचं UPI app स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करा.
– त्या App शी आपलं बँक अकाउंट link करा.
– App एक unique ID बनवेल, बस्स फक्त हा ID त्याच्याशी share करा ज्याच्याकडून तुम्हाला पैसे घायचे आहेत.
– तो त्याच्या UPI App मध्ये ID टाकून पैसे transfer करेल आणि पैसे तुमच्या अकाउंट मध्ये लगेच जमा होतील.
सध्या भारतात खालील दिलेल्या २० banks आहेत ज्या UPI payment support करतात.
•HDFC Bank (Payzapp)
•State Bank of India (SBI Pay)
•Axis Bank (Axis Pay)
•ICICI Bank (IMobile and Pockets App)
•Andhra Bank
•Bank of Maharashtra
•Canara Bank
•Catholic Syrian Bank
•DCB Bank
•Karnataka Bank
•Union Bank of India
•United Bank of India
•Vijaya Bank
•Punjab National Bank
•Oriental Bank of Commerce
•TJSB
•Federal Bank
•UCO Bank
•South Indian Bank
•Standard Chartered Bank India
चला तर मग होऊया आपणही कॅशलेस !!!!
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.