Site icon InMarathi

या अफलातून कलाकारांनी भारतातील ‘स्ट्रीट आर्ट’चा चेहराच बदलून टाकलाय..

art inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पेंटिंगचे प्रकार म्हणजे आजपर्यंत आपल्या कडे फक्त आर्ट गॅलरी मध्ये लावलेल्या चित्रांच्या स्वरुपात आलेले आहेत. आपण चित्र म्हटल्यानंतर एका विशिष्ट फ्रेम मध्ये बंदिस्त जागेत काढले गेलेले चित्र अशा स्वरूपाचा विचार करतो.

पण चित्र किंवा पेंटिंग हे आर्ट गॅलरी पुरते मर्यादित न राहता रस्त्यावर उतरून भव्य दिव्य प्रमाणात साकार झाले तर?

रस्ते, इमारती, घरे, क्रिडांगणाच्या भिंती, सभागृहाच्या भिंती हीच जर मोठमोठी चित्रे बनून गेली तर?

ही गोष्ट शक्य आहे आणि याला नवीन जमान्यात स्ट्रीट आर्ट असे नाव दिले गेले आहे. रस्त्यावरची कला असे जरी हिचे नाव असेल तरी प्रत्यक्षात जे काही पालायासमोर साकार होतं ते डोळ्यांना सुखावणारं नक्कीच असतं.

 

menxp.com

 

युरोप अमेरिकेमध्ये रूढ झालेला प्रकार आता भारतीय मातीमध्ये देखील रुजत चालला आहे.

भारतात st+art India foundation ही दिल्लीतील एक संस्था स्ट्रीट आर्ट च्या प्रचाराचे आणि प्रसाराचे काम करतेय. ही संस्था अनेक आर्टिस्टसना घेवून काम करते.

यामध्ये असेही आर्टिस्ट आहेत ज्यांच्याकडे कला तर आहे पण जर ती कला त्यांना दाखवायची असेल तर महागडी आर्ट गॅलरी घेवून त्यात त्यांची चित्रे लावणे त्यांना शक्य होत नाही.

मुळात आर्ट गॅलरी हा प्रकारच फार कमी लोकांना ठावूक असतो.

बरं त्यात ही फक्त उच्चभ्रू लोकांच्या वर्तुळात अशा आर्ट गॅलरीचे विषय फिरत राहतात मात्र त्यातून आर्टिस्टला फायदा मिळेल हे सांगता येत नाही.

त्यामुळे जर आपली कला रस्त्यावर आणून तिचे प्रदर्शन केले तर ती आख्या जगाला दिसेल आणि कलेचा स्कोप देखील वाढेल या विचारातून ही संस्था सुरु झाली आहे.

 

youtube.com

 

स्ट्रीट आर्ट म्हणजे घराच्या, कार्यालयाच्या, इमारतीच्या भिंती असतील त्या कलात्मक रीतीने चित्रे काढून सजवणे.

यात बागा, उपहार गृहे, कार्यालये, मोठमोठे कला महोत्सव भारतात त्यासाठी मोठमोठी पोस्टर बनवणे, ती रंगवणे या गोष्टींचा समावेश होतो.

सध्या मुंबई, दिल्ली, बंगलोर यासारख्या मेट्रोपोलिटीन शहरात स्ट्रीट आर्ट चे नमुने पाहायला भेटतात.

start India foundation च्या लोकांनी याबाबत आपला अनुभव बोलून दाखवताना सांगितले होते,

“आर्ट गॅलरी” मध्ये एक तर प्रत्येकाला चित्रांचे प्रदर्शन भरवणे शक्य होत नाही आणि भरलेच तरी काही शेकड्यात फक्त लोक भेट देवून जातात, त्यातही कुणी चित्र विकत घेईल न घेईल याची शाश्वती नसते पण जेव्हा आम्ही स्ट्रीट आर्ट च्या माध्यमातून आमचे काम लोकांसमोर आणले तेव्हा आमच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातून दररोज १००० पेक्षा ही जास्त लोक भेट देतात आमच्या कामाचे कौतुक करतात.”

“ही आम्हाला आमच्या कलेला मिळालेली मोठी पावती असते. शिवाय कला हा प्रकार फक्त अभिजन वर्गासाठी बंदिस्त न राहता तो थेट रस्त्यावर उतरल्यामुळे त्याला लोकाश्रय देखील मिळाल्याची भावना होते.”

start India foundation ला कामे मिळवण्यासाठी तसे आजही भरपूर प्रयत्न करावे लागले होते. सुरुवातीच्या काळात यांच्यातील लोकांनी दिल्ली मध्ये घरोघरी जावून लोकांना तुमच्या भिंती आम्ही रंगवून देवू का अशा शब्दात घरोघरी जावून विनवले होते.

 

dnaindia.com

 

याला अर्थातच लोक  नसायचे. घर रंगवणे म्हणजे प्लेन रंग देणे हा एकाच प्रकार बहुसंख्य लोकांना ठावूक असतो पण घर रंगवून त्या घरांच्या भिंतीच एक सलग चित्र बनवणे हा प्रकार लोकांच्या लवकर पचनी पडत नव्हता.

हळूहळू नकाराची जागा कुतूहलाने घेतली. काही लोकांनी असे काम करून देखील घेतले आणि त्यांनतर या चित्रकर्मी लोकांना हळूहळू कामे मिळू लागली.

आजही खूप सगळ्या सरकारी निमसरकारी प्रकल्पामध्ये st+art India foundation आपले स्ट्रीट आर्टचे कौशल्य दाखवते. शहरात मोठमोठे स्ट्रीट आर्ट चे उत्सव भरतात त्यातही या कलाकारांना स्वत:ची कला दाखवण्याची संधी मिळते.

या कामात पैसे बहुदा जे प्रायोजक असतात त्यांच्याकडून च मिळतात. या लोकांना एशियन पेंट्स चे खूप जास्त प्रमाणात आर्थिक साहाय्य लाभले आहे. अजूनही सरकार दरबारी अशा कामांची दाखल घेतली जात नाही.

 

onlyindia.com

 

खूप वेळा लाल फितीच्या कारभारामध्ये हाते आलेला प्रकल्प रखडतो. शिवाय st+art India foundation हा non-profit तत्वावर काम करणारा NGO आहे. त्यामुळे बाहेरची मदत त्यांना जास्त मिळत नाही.

तरीही कला हा प्रकार बंदिस्त न राहता तो हर एका स्मार्ट सिटीचा मोठा भाग बनावा म्हणून या कलाकारांचे जे काम चालले आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version