Site icon InMarathi

विशिष्ट ब्लड ग्रुपच्या लोकांना आणि तरुणींना डास जास्त का चावतात? नेमकं उत्तर वाचा

Mosquito IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ऋतु कोणताही असला तरीआपल्या घरी काही पाहुणे हे पाहुणे आपल्याकडे पाहुणचार करायला नाही तर आपलं रक्त प्यायला येत असतात. आतापर्यंत तुम्हाला कळालेच असेलं की, आम्ही डासांबाबत बोलत आहोत. हे डास येतात आणि आपली रात्र खराब करून जातात.

बरं कितीही गुडनाईट आणि कितीही मॉर्टीन जाळलं तरी उपयोग नाही. आजकाल डासांवर ह्या गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही.

 

 

डासांचा त्रास हा सगळ्यांनाच होत असतो. पण ह्यातही काही लोक खूप लकी असतात. ते म्हणजे ज्यांना डास चावत नाहीत…!

कधी कधी वाटतं की त्यांच्याकडे कुठलीतरी दैवी शक्ती असावी, ज्यामुळे डास त्याच्यापासून दूर राहतात.

नाहीतर आम्ही! कितीही पांघरूण घेऊन झोपलं तरी डास कुठूनतरी मार्ग काढून आमच्यापर्यंत पोहोचतातच.

आणि बरं, असंही नाही की एकदा चावून निघून जातील…!

तर त्यांना आमचा सूड घ्यायचा असतो म्हणून ते पहिले चावणार नाही तर गुण-गुण  करत आधी कानाजवळ फिरतील. मग आपली झोपमोड झाल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी चावतील आणि जोपर्यंत अगदी खडबडून जागे होणार नाही तोवर ते आपल्याला सतावत राहतील.

 

 

 

तुम्ही देखील ह्याच प्रकारच्या लोकांमध्ये येता का ज्यांच्याकडे मुली नाही तर डास जास्त आकर्षित होतात?

म्हणजे ते जाहिरातीत दाखवतात की – डीओ लावल्यावर मुली आपल्याकडे आकर्षित होतात…पण प्रत्यक्ष आयुष्यात डास जास्त आकर्षित होतात…!

तर आज हे नक्की समजून घ्या – की आपल्याकडे जर जास्त डास आकर्षित होत असतील तर त्याच्या मागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. हीच कारणं आपण आज जाणून घेणार आहोत.

==

हे ही वाचा – डास चावल्याचे फोड घालवण्यासाठी महागडी औषधं कशाला? त्याऐवजी सोपे-स्वस्त उपाय..

==

पहिलं कारण – घाम !

 

 

ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांच्याकडे डास अधिक आकर्षित होतात. जेव्हा आपल्या शरीरातून घाम निघतो त्यात लॅक्टिक अॅसिड, युरीन अॅसिड आणि अमोनिया सारखे तत्व आढळतात.हे सर्व तत्व डासांना आपल्याकडे आकर्षून घेतात. तसेच घामाच्या वासाने देखील डास आकर्षित होतात.

दुसरं कारण – प्रेग्नन्सी…!

 

 

गर्भवती स्त्रियांच्या शरीराचे तापमान इतर स्त्रियांच्या तुलनेत जास्त असते. तसेच, गर्भवती स्त्रियांच्या शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे जो विशिष्ट गंध तयार होतो ,त्यामुळे देखील डास अशा स्त्रियांकडे आकर्षित होतात.

तिसरं आणि सर्वात मोठं कारण – तुमचा रक्तगट…!

 

 

एकूण चार प्रकारचे रक्त गट असतात. ए, बी, एबी आणि ओ.

ओ रक्त गट हा सर्वाधिक लोकांचा असतो. ह्या रक्त गटात साखरेचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे हे रक्त पचविणे डासांसाठी सोपे ठरते. ह्याचं कारणामुळे ओ रक्त गटाच्या लोकांना डास जास्त चावतात.

चौथं कारण – दारू!

 

 

रिसर्च नुसार सामान्य स्थितीच्या तुलनेत बियर प्यायलेल्या व्यक्तीला डास अधिक प्रमाणात चावतात. कारण बियर प्यायल्यानंतर शरीरातून एक वेगळ्याच प्रकारचा गंध येतो जो डासांना आकर्षून घेतो.

==

हे ही वाचा – बॉम्बे ब्लड ग्रुप! होय, हा आहे मराठी माणसाने शोधलेला दुर्मिळ ब्लड ग्रुप!!

==

पाचवं कारण – शरीरावरील बॅक्टरीया…

 

 

आपल्या त्वचेवर असलेले बॅक्टेरिया देखील डास चावण्याच एक मोठं कारण आहे. पायावर बॅक्टेरिया जास्त असतात. त्यामुळे ह्या ठिकाणी डास जास्त चावतात.

सहावं कारण – शरीराची “केमिस्ट्री” !

 

 

विज्ञानानुसार काही लोकांमध्ये अट्रॅक्टिव प्रकारचे कंम्पाउंड्स असतात जे डासांना त्यांच्याकडे आकर्षून घेतात. ज्या लोकांमध्ये असे कंम्पाउंड्स आढळतात त्यांना डास जास्त चावतात.

सातवं कारण – स्त्रिया अधिक “आकर्षक” 😉

 

 

स्त्रियांच्या शरीरात काही विशिष्ट प्रकारचे तत्व आढळतात जे पुरुषांपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत डास स्त्रियांकडे अधिक आकर्षित होतात.

आता जर तुम्हाला देखील डास चावत असतील तर “मी फार गोड आहे” म्हणून मला डास जास्त चावतात अशी कारणे देणं बंद करा…!  आणि खरी कारणं सांगून इतरांना इम्प्रेस करा! 😀

==

हे ही वाचा – जगातला असा देश की जिथे ‘एकही’ डास नाही! असं कशामुळे, ते वाचा!

==

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version