Site icon InMarathi

जेवणात मीठ जास्त झालंय? ‘हे’ सोपे उपाय करून बिघडलेले पदार्थ सहज सुधारा!

salty-food-featured-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मीठ हा भारतीयांच्या जेवणातला अत्यावश्यक घटक आहे, तुम्ही आज कुठेही जेवायला जा, अगदी घरी किंवा हॉटेल मध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा जेवायला बसता त्याआधी तुम्हाला ताटात मीठ वाढून घ्यायची सवयच लागते!

मीठ जितकं खाण्यासाठी चांगलं तितकंच त्याचं जास्त सेवन शरीरासाठी अपायकारक! ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन चा त्रास याच गोष्टीमुळे होतो. त्यामुळे सगळेच डॉक्टर सुद्धा सल्ला देत असतात कि शक्यतो मीठ कमी घ्यावं!

जेवणात मीठ कमी पडलेलं एक वेळ चालतं पण जास्त पडल्यास ते कमी करता येत नाही!

 

 

आपल्या जेवणात मिठाचा खूप मोठा वाटा असतो, त्याशिवाय आपल्या पदार्थाची चवच अपूर्ण अशी वाटते. पण जर हेच मीठ जरासं जास्त पडलं की आपल्या जेवणाची मजाच निघून जाते. कारण खारट जेवण कुणालाच आवडत नाही.

असे जेवण कोणीच खाऊ शकत नाही, बनविणाऱ्याची मेहनत वाया जाते आणि खाणाऱ्याचा उत्साह देखील कमी होतो.

पण आता जेवणात पडलं मीठ जास्त मग काय करणार? मीठ काढून तर घेऊ शकत नाही, मग अश्यावेळी काय करायचं?

ज्याने मीठ कमी होऊन जेवणाची चव बिघडणार नाही.

 

 

अनेकांना जेवण बनविताना ही समस्या उद्भवते, कधी अंदाज चुकतो तर कधी नकळत जास्त मीठ पडून जातं. पण ह्यावर देखील काही उपाय आहेत, ज्यामुळे तुमच्या जेवणाची चव बिघडणार नाही आणि तुमची मेहनत देखील वाया जाणार नाही.

तर मग बघुयात जेवणात पडलेलं जास्तीच मीठ कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स..

 

दही :

 

 

भाजीतील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. त्यासाठी भाजीमध्ये दोन-तीन चमचे दही घाला.

ह्याने भाजीतील मिठाचे प्रमाण संतुलित होण्यास मदत होईल.

बटाटा :

 

 

जर तुम्ही ग्रेव्हीची भाजी किंवा वरण बनवत असाल तर अश्यावेळी बटाटा आपल्या खूप कामी येऊ शकतो. मिठाची चव कमी करण्यासाठी भाजी किंवा वरणात बटाट्याचे काही काप घाला.

ह्यामुळे बटाटा काही प्रमाणात मीठ शोषून घेईल. ह्यामुळे भाजी किंवा वरण ह्यांची चव ही सामान्य होईल.

त्यानंतर ग्रेवी घट्ट झाल्यावर बटाट्याचे काप काढून घ्या. ह्यासाठी जर उकडलेल्या बटाट्याचा उपयोग केला तर ते अधिक चांगले ठरेल.

 

पीठ :

 

 

भाजी किंवा वरणातील मीठाचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही पिठाचा देखील वापर करू शकता.

ह्यासाठी तुम्हाला पीठाचे दोन – तीन लहान लहान गोळे भाजी किंवा वरणात घालायचे आहेत. पीठ जास्तीचे मीठ शोषून घेईल.

काही वेळाने हे पीठाचे गोळे काढून घ्या.

 

तूप :

 

 

वरण किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता. त्यासाठी भाजी किंवा वरणात एक-दोन चमचे तूप घाला.

त्याने मिठाचे प्रमाण नियंत्रित येण्यास मदत होईल.

 

चण्याची डाळ :

 

 

भाजी सुकी किंवा ग्रेव्हीची त्यात चण्याची डाळ घातल्याने त्यातील मिठाचे प्रमाण कमी होऊ शकते.

ह्यासाठी दोन-तीन चमचे भाजलेली चण्याची डाळ भाजीत घालावी.

 

लिंबाचा रस :

 

 

जर तुम्ही सुकी भाजी बनवता असाल आणि त्यात जर मीठ जास्त पडलं तर त्यात जरासा लिंबाचा रस घाला.

ह्याने मिठाची चव कमी होईल आणि भाजीची चव देखील खराब होणार नाही.

 

बेसन :

 

 

जर सुकी भाजी बनवत असाल तर त्यात तुम्ही बेसनाचा वापर देखील करू शकता. भाजीत गरजेनुसार दोन-तीन चमचे बेसन घाला ह्यानेदेखील जास्तीच्या मिठाची चव कमी होण्यास मदत होईल.

 

ब्रेड :

 

 

ग्रेव्हीच्या भाजीत मीठ जास्त झाल्यास तुम्ही त्यात ब्रेडचे काही काप देखील घालू शकता. ब्रेड ही भाजीतील मीठ शोषून घेईल.

 

काजू :

 

 

ह्यासाठी तुम्ही काजूचा पेस्ट देखील वापरू शकता. ह्यामुळे भाजीतील मीठ तर कमी होईलच तसेच भाजीला एक वेगळी चव देखील येईल.

ह्या काही सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या बिघडलेल्या भाजीला परत खाण्यायोग्य बनवू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version