Site icon InMarathi

“चीन” नावाचं भारतीय कनेक्शन! भारत-चीन प्राचीन संबंधांबद्दल ह्या गोष्टी माहितीच हव्यात

india-china-inmarathi

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सर्वसाधारणपणे चीन म्हटल्यावर प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यासमोर १९६२ साली झालेलं युद्ध आठवतं. “हिंदी चीनी भाई भाई” अशी आवई देत पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आपल्या या शेजाऱ्या बद्दल आपल्या मनात एक प्रकारचा न सांगता येणारा सल कायम बसलेला असतो. १९६२ साली झालेल्या युद्धाने आपले डोळे खाड्कन उघडले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची मिलिटरी पॉवर कमी पडली असे भारताला कबूल करावे लागले. त्यानंतर च्या काळात आपल्या देशाने स्वत:ची लष्कर क्षमता वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. फाळणीनंतर बनलेला नवजात पाकिस्तान चीन च्या मदतीला गेला आणि पाकिस्तान-चीन भारतासाठी एक राजकीय आव्हान होवून बसले.

 

indiandefencereview.com

अर्थात १९६२ चं युद्ध होण्यापूर्वी भारत आणि चीन या दोन देशांमध्ये प्राचीन काळापासून मैत्रीचे नाते राहिले आहे. या दोन देशांनी आपापसात अनेक शतकापासून सांस्कृतिक आदानप्रदान केली आहे. व्यापारी दृष्टीकोनातून दोन्ही देश एकमेकांना अनेक वर्षापासून मदत करत आलेले होते. इतकेच नव्हे तर भारत आणि चीन च्या अनेक ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय बाबींमध्ये साम्य आढळते. तसं बघितल्या गेलं तर चीन क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताच्या तिप्पट मोठा आहे आणि लोकसंख्या आपल्या पेक्षा थोडी जास्त आता आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीन ला ही मागे टाकण्याच्या रेस मध्ये आहोत.

 

asiancustoms.eu

भारतीय ज्या पद्धतीने दोन हात जोडून नमस्कार करतात. चीन मध्ये मस्तक खाली झुकवून आणि दोन्ही हात छातीजवळ बंद मुठीत घेवून नमस्कार करतात. चीन हे नाव जे आज साऱ्या जगभर प्रसिद्ध आहे ते नाव भारताने अगोदर चीन ला दिले होते. चीन मध्ये “यीन” नावाचं शक्तिशाली राजघराणं होवून गेलं त्याच्यावरून भारतातले लोक चीनी अशा नावाने चीनच्या लोकांना आणि देशाला संबोधित करत असत. हेच नाव पुढे जगजाहीर झालं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा चीन मध्ये हा “यीन” राजवंश राज्य करत होता त्यावेळी भारतात चंद्रगुप्त मौर्य ने मौर्य घराण्याची सत्ता स्थापन केली होती ज्यावेळी चीन मध्ये कान्फ्युशियस आणि ताओ धर्माचा उगम झाला त्याच्या आसपास भारतात जैन आणि बौद्ध धर्म उगम पावले होते. चीनी भाषेत भारतला काय म्हणतात हे ऐकल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

 

indiafacts.org

चीन मध्ये भारताला “तिनाझू” असं संबोधलं जातं. ज्याचा चीनी भाषेत अर्थ होतो “स्वर्ग”. आता ही गोष्ट शतप्रतिशत खरी आहे की ज्या काळात भारताला चिन्यांनी हे नाव दिले होते त्या काळात भारत खरोखर ऐश्वर्यवान असा स्वर्ग होता. पण जर सध्याच्या काळात विचार करायचा म्हटलं तर चीन ची अर्थव्यवस्था आज भारताच्या चौपट मोठी आहे. चीन ने १९७८ पासून आपल्या अर्थव्यवस्थे मध्ये जे मूलगामी बदल घडवत आणले त्याचे फळ म्हणून आज चीन चे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त पटीने वाढलेले आहे. आजही भारत चीन ची जी सीमारेखा आहे ते तब्बल ४००० किलोमीटर च्या घरात आहे तरीही दोन्ही देशांमध्ये सीमेवर आदानप्रदान करण्यासाठी फक्त सिप्कीला, नथूला आणि लिपल्का अशा तीनच खिंडी आहेत. शिक्षण, उद्योग, इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व, परदेशात होणारे ब्रेन ड्रेन या सगळ्या बाबतीत भारत चीन एकमेकांना नेहमी टक्कर देण्याच्या प्रयत्नात असतात.

भारतातील सगळ्यात मोठी नदी ब्रम्हपुत्रा आज चीनमध्ये गेलेल्या तिबेट मधून उगम पावते आणि भारत चीन सीमारेषेला १८० अंशाचा वळसा घालून थेट भारतात येते. चीन हा ब्रम्ह्पुत्रेचा मार्ग बदलण्याच्या प्रयत्नात आहे अशा सतत बातम्या आपल्या गुप्तहेर खात्याने आणि लष्कराने सरकारला दिलेल्या आहेत.

 

echarcha.com

भारत १९४७ साली स्वतंत्र झाला आणि १९४९ ला people’s republic of china ची स्थापना झाली होती. शिवाय चीन ला लोकशाही देशाचा दर्जा देणारा भारत हा जगातील पहिला देश. भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणून ज्या महात्मा गांधी ना संबोधले जाते त्या गांधींपेक्षा चीन चे भाग्यविधाते ओळखले जाणारे सन-यत-सेन हे फक्त तीन वर्षे मोठे होते. दोन्ही देशामध्ये शक्तिशाली साम्राज्ये होवून गेली, परकीय आक्रमणे आली, दोन्ही देशांचा सांस्कृतिक वारसा प्रचंड मोठा आहे आणि तो काळाच्या भरपूर पाठीमागे जातो.

अशा ५००० वर्षे जुन्या मैत्रीला गालबोट लावून १९६२ साली चीन ने भारतावर सीमारेषेच्या वादावरून आक्रमण केले. सदरचे युद्ध हे सीमारेषेच्या प्रश्नावरून झाले होते. जरी हे युद्ध चीन ने दोन आठवड्यानंतर थांबवले तरी सीमारेषेचा वाद तसा आजपर्यंत कायम आहे. आजही चीन भारताच्या अरुणाचल प्रदेश वर आपला हक्क सांगतो जिथे भारताने ठामपणे अरुणाचलप्रदेश आमचा आहे अशी भूमिका घेतली आहे. तर चीन ने पाक व्याप्त काश्मीर च्या जवळचा काही भागावर पाकिस्ताना च्या मदतीने आपला कब्जा कायम केलेला आहे. आज जरी युद्ध नसेल तरी ही दोन देशात फार मोठी मैत्री नाही. पण आशिया खंडातील या दोन महासत्ता एक झाल्या तर त्यांना जगात कुणी टक्कर देवू शकणार नाही असे राजकीय जाणकार सतत सांगत राहतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version