उचलेगिरी! ही सुपर हीट गाणी म्हणजे निर्लज्जपणे चोरलेल्या, नुसरत फतेह अली खानांच्या गजल आहेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नुसरत फतेह अली खान… संगीत क्षेत्रातील असा एक तारा ज्याने सुफी संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. नुसरत हे प्रसिद्ध सुफी कव्वाल होते. त्यांनी अध्यात्मिक अंग लाभलेल्या कव्वाली या गायकीच्या परंपरेला जागतिक दर्जा मिळवून दिला.
त्यांचे घराणे कव्वाल गायकी जिवंत ठेवणारे ६०० वर्षांचे जुने घराणे आहे.
नुसरत फतेह अली खान यांना ‘शहेनशाह-ई-कव्वाल’ या नावाने ओळखले जाते. त्यांचे वडील उस्ताद फतेह अली खाँ हे स्वतः अत्यंत उत्तम दर्जाचे कव्वाल होते. नुसरत फतेह अली आपल्या गायकीच्या पेशात येऊ नये, असे वडिलांना वाटत होते.
तथापि वडिलांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या एका धार्मिक कार्यक्रमात नुसरत फतेह अली यांनी वडिलांना कव्वालीचीच श्रद्धांजली अर्पण करून आपल्या गायन कलेचा प्रारंभ केला.अल्पावधीत त्यांनी प्रसिद्धीचे शिखर गाठले.
आज ते या जगात नाहीत. पण कव्वाली या गायन प्रकारच्या अशा काही खुणा ते सोडून गेले आहेत की असा कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांचे संगीत आपण जितक्या वेळा ऐकत जाऊ तसे ते आणखी खोलवर झिरपत जाते. कधी कधी २० मिनिटांची कव्वाली संपली कधी असा प्रश्न पडावा इतके आपण भान हरपून ऐकत राहतो. पुनःपुन्हा ऐकत राहतो.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आजच्या पिढीतले तरुण कव्वाली आणि सुफी गायनप्रकाराचे शौकीन असल्याचे दिसते. त्यातही नुसरत यांच्या गाण्यांनी या पिढीला वेड लावले आहे.
नुसरत साहेबांना प्रत्यक्ष न ऐकता आल्याचा खेद या पिढीतल्या तरुणांना नक्कीच वाटत असेल. ते जिवंत असेतोवर पाकिस्तान चित्रपटसृष्टीने त्यांची दखल घेतली नाही कारण त्यांनी एकाही पाकिस्तानी चित्रपटासाठी गाणे गायले नाही.
नुसरत साहेबांनी बॉलीवुडसाठी काही कव्वाली गीते गायली जसे की ‘दूल्हे का सेहरा सुहाना लगता है’. तसेच तेरे बिन नही जिणा मर जाणा ढोलणा हे गाणे असलेल्या ‘कच्चे धागे’ या चित्रपटाचे ते म्युझिक डायरेक्टर होते. हा गाण्यांची सुंदर रचना असलेला एक संगीतमय चित्रपट होता. यातील ‘प्यार नही करना’ हे गाणं त्या गाण्याच्या beats मुळे आणि त्या गाण्यातील ऊर्जेमुळे इतरांपेक्षा वेगळं ठरलं.
राजस्थानी लहेजा वापरून केलेलं हे गाणं आणि त्यातून राजस्थानच्या वाळवंटात केलं गेलेलं शूटिंग यामुळे ते संस्मरणीय बनलं. हे अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी गायलं होतं. त्यांनी स्वतः केवळ 3 बॉलीवुड चित्रपटांसाठी काम केले. मात्र ‘एका वेगळ्या प्रकारे’ ते अनेक चित्रपटांचा भाग बनले.
–
- तुम्हाला आवडणारी ही सारी लोकप्रिय गाणी चक्क चोरलेली आहेत!
- केवळ गाणी आणि कथाच नव्हे, तर ‘या’ सिनेमांनी तर पोस्टरसुद्धा केले होते कॉपी!
–
९०च्या दशकात कित्येक संगीतकारांनी निर्लज्जपणे नुसरत साहेबांना श्रेय न देता त्यांच्या कव्वालीवरून धून चोरून कैक ब्लॉकबस्टर गाणी रचली.
उदाहरणादाखल काही गाणी खाली देत आहोत.
१. सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम।
कोयला मूव्ही व्हिडिओ
कोयला चित्रपटाचे संगीतकार राजेश रौशन होते. सूफ़ी संगीतातील दर्दी माणसांना हे माहीतच असेल की ही कव्वाली मुळात नुसरत साहेबांनी गायलेली आहे.
ओरिजिनल गाण्याची लिंक
२. मेरा पिया घर आया हो राम जी।
याराना मूव्ही व्हिडिओ
या गाण्यावर आपल्यापैकी अनेकांनी ठेका धरला असेल. कित्येक जण माधुरीच्या नृत्यावर फिदा झाले असतील. अनू मलिक यांनी हे गाणं नुसरत साहेबांची कव्वाली ‘मेरा पिया घर आया हो लाल नी’ या गाण्यावरून प्रेरित होऊन बनवले आहे.
ओरिजिनल गाण्याची लिंक
३. कितना प्यारा तुझे रब ने बनाया
राजा हिंदुस्तानी मूव्ही व्हिडिओ
९० च्या दशकातील ख्यातनाम संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांनी राजा हिन्दुस्तानी या चित्रपटासाठी गाणे बनविले होते. खरं तर हे गाणं सुद्धा नुसरत साहेबांची कव्वाली ‘किन्ना सोहणा तेनु रब ने बनाया’ यावरून कॉपी केलं गेलं आहे.
ओरिजिनल गाण्याची लिंक
४. मुझे एक पल चैन न आये सजना तेरे बिना
जुदाई मूव्ही व्हिडिओ
नुसरत साहेबांच्या प्रसिद्ध कव्वालींपैकी एक, ‘सानु इक पल चैन ना आवे सजना तेरे बिना’ या कव्वालीच्या डायरेक्ट कॉपी-पेस्टने रसिकांना दुःखी केलं. नदीम-श्रवण यांचाच हा कारनामा. Hats off बॉलीवूड. ह्या गाण्यातील ९५% संगीत आणि गाण्याचे शब्द ओरिजिनल गाण्यातून घेतलेले आहेत.
ओरिजिनल गाण्याची लिंक
५. तू चीज़ बड़ी है मस्त-मस्त
मोहरा मूव्ही व्हिडिओ
‘मोहरा’ चित्रपटातील या गाण्याशिवाय कोणतीही पार्टी पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. पण हे गाणं सुद्धा संगीतकार विजू शाह यांनी अगदी सफाईने नुसरत साहेबांच्या ‘दम मस्त कलंदर मस्त मस्त’ या गाण्यावरून ढापलं होतं.
ओरिजिनल गाण्याची लिंक
६. ये जो हल्का-हल्का सुरूर है
सौतन की बेटी मूव्ही व्हिडिओ
तसं पाहिलं तर नुसरत साहेबांच्या प्रत्येक कव्वालीची वेगळी मजा आहे, पण ‘ये जो हल्का हल्का सुरूर है’ या गाण्याची गोष्टच काही वेगळी आहे. ही कव्वाली हृदयाच्या तारा छेडते. ‘सौतन की बेटी’ या चित्रपटात ती कव्वाली चोरून वापरण्यात आली.
ओरिजिनल गाण्याची लिंक
७. किसी का यार ना बिछडे
श्रीमान आशिकी मूव्ही व्हिडिओ
नदीम-श्रवण या जोडगोळीचं श्रीमान आशिकी या चित्रपटातील आणखी एक गाणं जे मुळात नुसरत यांच्या ‘किसी दा यार ना विचडे’ या गाण्याची कॉपी पेस्ट आहे.
ओरिजिनल गाण्याची लिंक
अशा काही ९० च्या दशकातील बॉलीवूडच्या म्युझिक डायरेक्टर्सनी नुसरत साहेबांचे शब्दच नाही तर त्यांची धूनदेखील चोरली आणि शिवाय त्यांना त्याचे श्रेयदेखील दिले नाही. आजही त्यांच्या कव्वाल्या गायक गातात. गाणी गातात. पण त्यांना त्याचे श्रेय देऊन मगच. असाच प्रामाणिकपणा ९०च्या दशकातील डायरेक्टर्स ने देखील दाखवला असता तर किती बरे झाले असते….
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.