Site icon InMarathi

‘तो’ नसता तर कारगिल युद्धाचा निकालच वेगळा लागला असता…

major yogendra singh kargil-inmarathi04

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ही कहाणी आहे उत्तर प्रदेशात जन्मलेल्या एका साहसी भारतीय सेनेतील सैनिकाची. एक असा सैनिक जो कदाचित नसता तर कारगिल युद्धाचा परिणाम हा कदाचित थोडा वेगळा असता. सुबेदार मेजर योगेंद्र सिंह यादव ज्यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी भारतीय सेनेत प्रवेश घेतला.

 

 

सेनेत प्रवेश घेतल्याच्या जवळपास दीड वर्षानंतर त्यांची प्लाटून ‘घातक’ ला टायगर हिल च्या ३ बंकर्स वर कब्जा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा सुबेदार मेजर योगेंद्र सिंह यादव ह्यांच्या जवळ हवा तेवढा अनुभव नव्हता.

पण त्याच्या मनात आपल्या मातृभूमीविषयी प्रेम होते, आपल्या देशासाठी काहीही करण्याची तयारी होती.

 

 

रात्रीच्या अंधारात २१ शिपाई टायगर हिलच्या दिशेने चढत होते. त्यापैकी ७ शिपाई हे समोर होते. ह्यापैकीच योगेंद्र ही एक होते. ५ मे १९९९ च्या सकाळी योगेंद्र ह्यांची बटालियन ’18th Grenadiers’ टायगर हिलच्या शिखरावर पोहोचली आणि त्यांच्यावर शत्रूंनी तीन बाजूंनी हल्ला करण्यास सुरवात केली.

===

हे ही वाचा असंख्य जखमा झेलून, शत्रूला संपवण्यासाठी एका सैनिकाने दिलेली झुंज…

===

त्याच्या बटालियनमधल्या शिपायांजवळ हवे तेवढे शस्त्र आणि दारुगोळा देखील नव्हता. पण तरीही हे सैनिक मोठ्या शौर्याने लढले.

७ पैकी ६ सैनिक ह्या दरम्यान शहीद झाले. ह्यात योगेंद्र ह्यांना देखील १७ गोळ्या लागल्या होत्या. १७ गोळ्या लागूनही ते जिवंत होते. तेव्हा जखमी परिस्थितही त्यांनी हार मानली नाही. तर शक्कल लढवली.

 

 

त्यांना माहित होतं की ते आता आणखी लढू शकणार नाही, म्हणून त्यांनी ठरवलं की ते मरण्याचे नाटक करतील जेणेकरून पाकिस्तानी सैनिक काय बोलताहेत त्यांची समोरील रणनीती काय आहे हे माहित होऊ शकेल. तेव्हा योगेंद्र ह्यांच्या कानावर काही गोष्टी पडल्या.

त्यांनी ऐकले की,

“पाकिस्तानी सेना भारताच्या मिडीयम मशीन गन पोस्टवर हल्ला करण्याची योजना आखत आहे.”

आता योगेंद्र ह्यांनी काहीही करून ही माहिती भारतीय सेनेपर्यंत पोहोचवायची होती.

पण २ पाकिस्तानी सैनिकांनी मृत भारतीय सैनिकांचा मृत्यू सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्यावर आणखी गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये योगेंद्र ह्यांच्या छातीमध्ये एक गोळी लागली. त्यांना वाटले की आता ते जगू शकणार नाहीत.

तेव्हाच एका पाकिस्तानी सैनिकाचा पाय त्यांच्या पायाला लागला आणि त्यांना कळाले की ते जिवंत आहेत.

 

एवढ्या त्रासात असुनही योगेंद्र ह्यांनी गपचूप एक ग्रेनेड काढला आणि पाकिस्तानी सैनिकांच्या दिशेने फेकला. तो ग्रेनेड पाकिस्तानी शिपायाच्या खिशात जाऊन पडला आणि तो काही करू शकेल त्याआधीच ग्रेनेड फुटला.

त्यानंतर योगेन्द्राने स्वतःला सावरत एक रायफल उचलली आणि शत्रूंवर अंधाधुंद गोळीबार केला.

शत्रू सेनेला भ्रमित करण्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळ्यांचा वर्षाव करत होते. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना वाटले की, भारतीय सेना तिथवर येऊन पोहोचली आहे. आणि त्यांनी तेथून पळ काढला.

त्यानंतर योगेंद्र तेथून काही मीटर पर्यंत रांगत रांगत समोर जाऊ लागले तेथे त्यांना पाकिस्तानी सेनेचा बेस आणि त्यांचे टँक तसेच मोटर पोझिशन दिसली. आता त्यांना लवकरात लवकर ही माहिती आपल्या युनिट पर्यंत पोहोचवायची होती.

युनिट कडे जाण्याआधी योगेंद्रनी त्यांच्या साथीदारांना बघितले पण ते सर्व मृत्युमुखी पडले होते, त्यानंतर योगेंद्र ह्यांनी स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवत आपल्या युनिटकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण जाणार कसे १७-१८ गोळ्यांनी त्यांचे शरीर शिथिल झाले होते त्यांचा हात तुटला होता ते चालूही शकत नव्हते.

तरीदेखील त्यांनी हिम्मत हारली नाही आणि रांगत रांगत आपल्या युनिटच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. थोड्यादूर गेल्यानंतर त्यांना एक खड्डा दिसला त्यांनी तेथे आपल्या साठीदारांची वाट पाहण्याचा निर्णय घेतला.

 

काही वेळाने त्यांच्या युनिटचे इतर साथीदार तेथे पोहोचले आणि त्यांनी योगेंद्र ह्यांना खड्ड्यातून बाहेर काढले. ह्यानंतर योगेंद्र ह्यांना कमांडिंग ऑफिसर कर्नल कुशल चंद ह्यांच्याकडे नेण्यात आले. जेथे त्यांनी सर्व हकीगत सांगितली.

आणि त्यानंतर योगेंद्र बेशुद्ध पडले. श्रीनगरजवळील एका रुग्णालयात ३ दिवसांनी त्यांनी डोळे उघडले. तोवर भारतीय सेनेने टायगर हिल वर कब्जा मिळविला होता.

 

२६ जानेवारी २००६ साली सुबेदार मेजर योगेंद्र सिंह यादव ह्यांना त्यांच्या ह्या साहसासाठी माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन ह्यांच्या हस्ते परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

खरंच जर तेव्हा योगेंद्र ह्यांनी ते साहस दाखवले नसते तर कदाचित आज कारगिल युद्धाचे खूप विपरीत परिणाम भारताला भेगावे लागले असते.

त्यामुळे योगेंद्र आणि त्यांच्यासारख्या सर्व भारतीय सैन्यातील जवानांना आमचा सलाम! ते आहेत म्हणूनच आज भारत ताठ मानेने जगासमोर उभा आहे.

===

हे ही वाचा भारतीय सैनिकांच्या या शौर्यासाठी पात्र ठरण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version