Site icon InMarathi

नाझींचा एक असा वैमानिक ज्याच्या साहसी व्यक्तिमत्वाची स्तुती स्वतः हिटलर करायचा

rudel inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

हिटलर हे एक असे व्यक्तिमत्व होते जे त्याच्या कृरतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे.

जर्मनीचा सर्वात मोठा क्रांतीकारी नेता अडोल्फ हिटलर दुसऱ्या विश्वयुद्धातील त्याच्या कामगिरीसाठीही जाणला जातो. दुसऱ्या विश्वयुद्धा दरम्यान एकीकडे सोव्हियत संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवू पाहत होता, तर दुसरीकडे हिटलरचे देखील तेच ध्येय होते.

नाझी पार्टीच्या हिटलरजवळ एक विशाल नाझी सेना देखील होती. तेव्हा लोकांमध्ये नाझींची दहशत होती. आणि हिटलर किती क्रूर होता हे कोणाला वेगळ्याने सांगायची गरज नाही.

 

historyonthenet.com

 

दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान हिटलरने आपल्या नाझी सेनेच्या जोरावर आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांवर कब्जा केला. ह्या दरम्यान त्याची सेना तिथल्या लोकांवर अत्याचार करायची. त्याच्या सेनेमध्ये असे अनेक होते जे हिटलरच्या एका सांगण्यावरून आपला जीव देतील.

ह्यापैकीच एक साहसी पायलट होता Hans-Ulrich Rudel ज्याच्यावर आजचा हा लेख आहे.

Hans-Ulrich Rudel ह्याला अनेकजण ‘ईगल ऑफ द ईस्टर्न फ्रंट’ ह्या नावाने देखील ओळखतात.

विश्वयुद्धादरम्यान Rudel ने अनेकदा स्वतःच्या जीवाची परवा न करता हिटलरसाठी काम केले. त्याच्या साहसी व्यक्तिमत्वासाठी त्याला अनेकदा सन्मानित देखील करण्यात आले.

हिटलर जेव्हा संकटात होता तेव्हा Rudel ने नेहमी त्याला त्या संकटांतून बाहेर काढले आहे. त्यामुळे तो हिटलरच्या खूप जवळचा होता.

 

carolynyeager.net

 

रुडेल ह्याचा जन्म जर्मन सिलेसिया येथील Konradswaldau येथे झाला होता. त्याचे वडीलही राजकीय पक्षात सहभागी होते.

रुडेल हा लहानपणी पासूनच संकटांना न घाबर त्यांना सामोरे जायचा म्हणून त्याला पायलट बनण्याची इच्छा होती. पण त्याचे वडील त्याला पायलटचे महागडे शिक्षण देऊ शकत नव्हते.

काही काळाने रुडेल ने Luftwaffe बाबत ऐकले. ही दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान जर्मन सेनेची हवाई युद्ध शाखा होती.

हे हिटलरच्या सेनेचे एक महत्वाचे आणि अभिन्न अंग. त्यानंतर रुडेल ह्याने ठरवले की तो पायलट बनेल. काही वर्षांच्या मेहनतीनंतर रुडेल ने Luftwaffe मध्ये भारती होण्यासाठीची कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आणि १९३६ साली त्याची इंफ्रेट्री ट्रेनिंग सुरु झाली.

 

worldwarwings.com

 

रुडेल ह्याला एखादी गोष्ट समजण्यासाठी जरा वेळ लागायचा. ह्या दरम्यान त्याने बॉम्बर शाळेत वॉलेंटीयर म्हणून काम देखील केले.

रुडेल ह्याला कुठ्लेहो व्यसन नव्हते त्यामुळे त्याचे कधीही कुठल्याही कॅडेट सोबत पटले नाही. त्यामुळे तो त्याचा वेळ जास्तकरून खेळण्यात घालवायचा. ह्या दरम्यान १९४० पर्यंत  त्याने अनेक प्रकारचे प्रशिक्षण घेतले. आणि तो जगातील सर्वात चांगला बॉम्बर म्हणून जगासमोर आला.

दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान त्याने पोलंडवर आक्रमणासाठी पहिल्यांदा उड्डाण केले. १९४० मध्ये रुडेलने ला JU-87 स्टुका डाईव्ह बॉम्बर विमान टीममध्ये सामील करण्यात आले होते.

 

carolynyeager.net

 

१९४१ साली त्याने पहिल्यांदा आपल्यातील असाधारण प्रतिभेचे दर्शन घडवले. त्याने Kronstadt बंदरावर उभ्या असलेल्या सोव्हियत युद्धनौका ‘मारक’ ला नेस्तनाबूत केले.

ह्यानंतर क्रोनस्टेड बेटाच्या चारी बाजूने भयानक बॉम्बफेक करत अनेक नौकां, जहाजे आणि क्रुजरनष्ट केले. त्यांच्या ह्या कामासाठी त्यांना १८ जुलै १९४१ साली आयरन क्रॉस प्रथम श्रेणी ने सन्मानित करण्यात आले.

विश्वयुद्धादरम्यान ह्यांनी स्वतः ५१९ सोव्हियत टँक नष्ट केल्या. युद्ध संपेस्तोवर त्याने २.३५० मिशनवर काम केले. त्यांनी पहिल्या ९० दिवसांच्या आतच ५०० उड्डाणे पूर्ण केली होती.

 

pinterest.ca

Rudelचे शौर्य बघता हिटलरने जानेवारी १९४५ साली त्याला कर्नल पद बहाल केले. ह्या दरम्यान बर्लिन येथील बंकरच्या आत असलेल्या एका मुख्यालयात हिटलरने Rudel ह्याला सांगितले की,

“तू जर्मन सेनेतील आतापर्यंतचा सर्वात महान आणि साहसी सैनिक आहेस”.

 

coub.com

 

नाझी वायुसेनेचा प्रमुख असलेल्या रुडेलने शत्रूंवर जवळपास ३० हून जास्त वेळा अॅण्टी एअरक्राफ्ट गनने निशाना साधला. पण तो मात्र नेहीमी शत्रूच्या तावडीतून सुटून यायचा, ९ फेब्रुवारी १९४५ साली जेव्हा सोव्हियत संघाने त्याच्या जहाजावर हल्ला करून त्याला नष्ट केले तेव्हा देखील Rudel हा त्यातून निसटून आला.

पण ह्यावेळी रुडेलने अतिशय जखमी झाला होता. त्यामुळे त्याचा एक पाय कापावा लागला. पण त्याच्या साहसी वृत्तीमुळे तो ६ आठवड्यांत परत सेनेत परतला.

काही वर्षांनी तो सेनेतून निवृत्त झाला आणि युद्धानंतर अर्जेंटिना येथे वास्तव्यास गेला. येथे त्याने अनेक वर्ष स्टेट एयरप्लेन वर्क्स मध्ये काम केले.

त्याने अनेक पुस्तकही लिहिली, ज्यामध्ये त्याने हिटलरच समर्थन केलं आहे. १९५३ साली तो जर्मनीत परतला आणि त्याने ‘जर्मन रिच पार्टी’ जॉईन केली. आणि अखेर १८ डिसेंबर १९८२ साली त्याने अखेरचा श्वास घेतला.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version