आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
काही जणांची झोप ही खूप सावध असते तर काही लोकं बिनधास्त कुठेही कसेही ढराढूर झोपू शकतात! ज्यांची झोप सावध असते त्यांची झोप मोड झाली तर त्यांना खूप त्रास होतो!
आणि या दोन्ही प्रकारात मोडणारी लोकं आपल्या आसपास असतातच!
पण तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का, की तुम्ही एका जागी शांत झोपले आहात, खूप गाढ झोप लागली आहे, आणि अचानक तुम्हाला जाणवतं की तुम्ही कोणत्या तरी खोल दरीत जीचा अंत नाहीये अशा दरीमध्ये तुम्ही कोसळत आहात, आणि काही सेकंदानी तुम्हाला जाग येते तेंव्हा तुम्ही आहात तिथेच असता!
–
हे ही वाचा – शांत झोप मिळवणं आहे सोपं! झोपण्यापूर्वी हा व्यायाम करणं नक्कीच ठरेल फायदेशीर…
–
हा प्रकार बहुतेक संगळ्यांबरोबरच होतो, तर नेमका हा काय प्रकार आहे किंवा गाढ झोप लागली असून देखीलसुद्धा तुम्हाला असे
women.comविचित्र भास का होतात? या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?
कसं झोपावं, कधी झोपावं, झोपताना काय करावं, काय करू नये, झोपण्याआधी काय खाल्ल की चांगली झोप लागते, एवढं सर्व झोपे संबंधी आपण आजवर ऐकले आणि वाचले असेल. पण आज आम्ही आपल्याला झोपेसंबंधीच आणखी थोडी माहिती देणार आहोत.
तुम्ही अनुभवले असेल की अनेकदा झोपलेले असताना अचानक आपली झोप उघडते. पण अस का होते?
माणसाना भेडसावणाऱ्या चिंता स्वप्नांचे रूप घेऊन येतात किंवा ईश्वर बऱ्याचदा आपल्या भक्तांशी संवाद साधायला स्वप्न एक माध्यम म्हणून वापरतो असेही मानले जाते.
आपण झोपेत असताना अनेकदा आपले डोळे अचानक उघडून जातात. कदाचित हे कधी तुमच्या लक्षात जरी आले नसेल तरी हे आपल्या सर्वांसोबत होते.
कधी कधी हे एखाद्या वाईट स्वप्नामुळे होते तर कधी सहजपणे.
पण झोपेत असं नेमकं काय होतं की आपली झोपमोड होऊन जाते?
काही वर्षांपुर्वी ३५ शोधांचा एक पेपर तयार करण्यात आला होता, हे शोध ३६ हजार लोकांवर करण्यात आले होते. ज्यामध्ये असे दिसून आले की सामान्य लोकांपैकी ७.६ % लोकांनी कधी ना कधी स्लीप पॅरालाइसिसचा अनुभव घेतला आहे.
ह्या शोधासाठी त्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली ज्यांची झोप ही अनियमित असते.
तसेच ह्यामध्ये मानसिक ताणताणाव आणि अनिद्रेने ग्रासलेल्या लोकांना सहभागी करण्यात आले.
झोपेत असताना अचानक जाग येणे ह्याचं कारण REM (Rapid Eye Movement) असल्याचं ह्या रिसर्चमध्ये समोर आलं. ह्याचे तीन-चार प्रकारही असतात.
ह्याच्या शेवटच्या स्टेजवर माणसाला जे स्वप्न येतात ते जास्त वास्तविकतेशी अधिक संबध ठेवणारे असतात.
जसे की आपण कधी स्वप्नात बघतो की आपण खाली पडतो आहोत आणि आपली झोप तुटून जाते.
जेव्हा आपण खूप गाढ झोपेत असतो तेव्हा आपले शरीर एका प्रकारे पॅरालाइज्ड असते.
ह्या स्थितीला REM Atonia असे म्हणतात. तसे तर बहुतेक लोक ह्या स्थितीचा अनुभव घेतात पण जे अतिशय दु:खी आणि तणावात असतात त्यांना ह्या स्थितीला जास्तकरून सामोरे जावे लागते.
Sleep Paralysis Hallucination चे तीन प्रकार असतात. Incubus, Intruder आणि Unusual.
Incubus मध्ये असं वाटत असतं जसं की, आपल्या छातीवर खूप जड ओझं ठेवलं आहे ज्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. आणि असं भीतीमुळे होत असते.
खरं बघता हा प्रकार भयानक असतो, म्हणजे यात जर तुम्हाला लवकर समजले नाही तर तुमचा श्वास कमी पडून त्रास होण्याची शक्यता दाट असते!
–
हे ही वाचा – व्यवस्थित झोप झाली, तरी दिवसभर दमल्यासारखं वाटतंय? या ७ टिप्स आजमावून बघाच
–
Intruder Hallucinations ह्या स्थितीत स्वप्न बघणाऱ्या लोकांना आपल्या जीवाची खूप भीती असते. थोडासा आवाज किंवा इतर कुठल्याही प्रकारची हालचाल होताच त्यांना असं वाटू लागतं की ते मारणार आहेत. आणि म्हणून ते खडबडून जागे होतात.
ही भीती मग त्यांना कोणत्याही गोष्टीची वाटू शकते, अनैसर्गिक गोष्टीच नव्हे तर आसपास वावरणाऱ्या माणसांची किंवा निर्जीव वस्तूंची सुद्धा त्यांना भीती वाटू शकते!
Unusual ह्या स्थितीत माणसाला असे वाटत असते, जसे की तो हवेत उडत आहे. ह्याप्रकारचा स्लीप पॅरालिसीस खूप वेगळा असते. ह्यामध्ये झोपेत असताना मेंदूचा वेगवेगळा भाग अॅक्टिव्ह असतो.
ह्या शोधानुसार ह्याचा कुठलाही वैज्ञानिक उपचार नाही आहे. ह्याचा उपचार म्हणजे नियमित झोप घेणे, तणावमुक्त जीवन जगणे, तसेच वेळेत झोपणे. हे सर्व करून तुम्ही ह्या स्थितीपासून वाचू शकता.
ते म्हणतात ना,
“लवकर निजे लवकर उठे त्यालं विद्या धन-संपत्ती मिळे!” अगदी योग्य आहे ते!
===
हे ही वाचा – औषधांविना शांत झोप लागावी असं वाटत असेल तर हे ५ पदार्थ तुम्हाला हमखास मदत करतील
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.