' मार्च एन्ड…; पोलिसमामा ला बघून यू-टर्न घेण्यापेक्षा ट्रॅफिकचे ‘खरे’ नियम वाचा आणि दंड भरणं टाळा! – InMarathi

मार्च एन्ड…; पोलिसमामा ला बघून यू-टर्न घेण्यापेक्षा ट्रॅफिकचे ‘खरे’ नियम वाचा आणि दंड भरणं टाळा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

गाडी चालविणे हे आता आपल्यासाठी नेहमीचे झाले आहे. नातेवाईकांकडे किंवा इतरत्र फिरायला जाणं सुद्धा तुम्ही सुरु केलं असेल. हे सगळं मजेशीर तोपर्यंतच असतं, जोपर्यंत समोर ट्राफिक पोलीस येत नाही. आणि आता तर आलाय मार्च एन्ड,  तेव्हा पोलिसांचं टार्गेट काय असतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीच

गाडी चालविण्याची मजा घेत असताना कधी कधी ट्रॅफिकचे एखाद-दोन नियम तुटतात.

मग ट्राफिक पोलीस आपलं चलान फाडणार आणि आपल्याला ५००-१०००चा फटका बसणार. म्हणूनच गाडी चालवताना तुम्हाला सगळे नियम माहित आहेत ना याची खात्री करून घ्यायला हवी.

नियम माहित असतील, तर त्या नियमांचे पालन करणं सोपं जाईल. शिवाय, एखाद्या ठिकाणी भ्रष्टचाराच्या उद्देशाने अधिक रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येत असेल, तर ते सुद्धा तुम्हाला सहजपणे कळू शकेल.

आपल्याला नियम आणि दंडाची रक्कम नीट माहित नसल्यामुळे अनेकदा पोलिसांचा फायदा होतो. ते अवैध दंड वसूल करतात. कधी कधी तर त्यांचं ‘वर्षभराचं टार्गेट’ पूर्ण व्हावं या उद्देशाने सुद्धा दंड वसूल केला जातो.

म्हणूनच हे सगळे नियम आणि अधिकार तुम्ही जाणून घेतलेच पाहिजेत.

 

traffic police rules-inmarathi01

 

ट्राफिकच्या नियमांनुसार ६ कारणांमुळे पोलीस तुमचे लायसन्स तीन महिन्यांसाठी जप्त करू शकतात.

१. रेड लाइट जंप करणे.

२. गाडी सामानाची ओव्हरलोडिंग करणे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

३. ओझे वाहून नेणाऱ्या गाडीत प्रवाश्यांना बसवणे.

४. मद्यपान करून गाडी चालविणे.

५. ड्राइविंग करताना मोबाईलवर बोलणे.

६. गाडी ओव्हर स्पीडने चालविणे.

कुठलाही ट्राफिकचा कायदा मोडल्यास त्यावर तीन प्रकारचे चलान असू शकतात.

 

traffic police rules-inmarathi02

 

१. ऑन द स्पॉट चलान

जर ट्राफिक पोलिसांनी तुम्हाला कुठला ट्रॅफिकचा नियम मोडताना पकडले आणि त्याच वेळी त्यांनी तुम्हाला चलान देऊन दंड आकारून सोडले तर त्याला ऑन द स्पॉट चलान म्हणतात.

२. नोटिस चलान

जर कुठला चालक नियम तोडून पळून जात असेल आणि त्यानंतर ट्राफिक डिपार्टमेंट त्याच्या घरी चलान पाठवत असेल तर त्याला नोटिस चलान असे म्हणतात. हा चलान भरण्यासाठी तुम्हाला एक महिन्याचा वेळ दिला जातो.

३. कोर्ट चलान

जर वाहन चालकाने कुठला मोठा गुन्हा केला असेल ज्यासाठी त्याला शिक्षा आणि दंड दोन्ही होणार असेल तर अश्या प्रकरणांत कोर्ट चलान जारी करण्यात येते.

कॉन्स्टेबल फाईन मागू शकत नाही.

traffic police rules-inmarathi

 

कॉन्स्टेबलला फाईन घेण्याचा अधिकार नसतो. तो केवळ कारवाई म्हणून गाडीचा नंबर नोट करू शकतो. तर हेड कॉन्स्टेबलला १००० रुपयांहून अधिकचा फाईन घेण्याचा अधिकार नसतो. तसेच ट्राफिक ऑफिसर एएसआय हे १००० हून अधिक रुपयांचा फाईन घेऊ शकतात.

तीन कारणांसाठी तुमची गाडी ट्राफिक पोलिसांद्वारे जप्त केली जाऊ शकते.

१. जर तुमची गाडी एखाद्या ठिकाणी हक्क नसलेल्या स्थितीत उभी असेल.

२. जर तुमची गाडी नो पार्किंग झोनमध्ये उभी असेल.

३. जर तुमची गाडी अशा स्थितीत उभी असेल ज्यामुळे इतरांना त्रास होत असेल.

तसेच कुठल्या चुकीसाठी किती दंड आकारला जाऊ शकतो हे देखील माहित असणे गरजेचे आहे.

 

traffic police rules-inmarathi05

 

जर तुमच्या गाडीची नंबर प्लेट डिफेक्टिव्ह असेल, जर तुम्ही सीट बेल्ट न लावता गाडी चालवत असाल, गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क असेल, सिग्नल लाल झाल्यावर जर तुम्ही गाडी काढली,

विना हेल्मेट दुकाचीवर समोर किंवा मागे बसले असाल, गाडीवर गरज नसताना लाल दिवा लावला असेल तसेच दुकाचीवर तीन जण बसलेली असतील तर अश्या परिस्थितीत तुमच्याकडून १००० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.

कुठले नियम तोडल्यास १००० हून जास्त रुपयांचा फाईन आकारला जातो.

traffic police rules-inmarathi03

 

ओव्हरस्पीड गाडी चालविण्यासाठी तुमच्याकडून किमान ४०० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. तुम्ही जर कार अधिक वेगाने चालवत असाल, तर ही रक्कम तब्बल २००० रुपये इतकी मोठी असू शकते. दुचाकीकरिता एवढा मोठा दंड आकारला जाऊ शकत नाही.

गाडी चालविणारा अल्पवयीन असल्यास त्याच्या पालकांवर ही कारवाई करण्यात येते. यासाठी तब्बल २५००० रुपयांचा दंड आणि ३ वर्षे तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते. आपल्या अल्पवयीन पाल्याला गाडी चालवू देऊ नये, हा नियम आपण सुद्धा पाळणे आवश्यक आहे.

गाडी चालविताना मोबाईलवर बोलणं सुद्धा फारच महागात पडू शकतं. यासाठी तब्बल ५००० रुपये इतका दंड भरावा लागू शकतो. याशिवाय १ वर्षापर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता सुद्धा असते.

विना इन्शुरन्स गाडी चालविल्यास २००० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. म्हणजेच इन्शुरन्स काढण्याचा आळस किंवा पैसे वाचवण्याची इच्छा खूपच महागात पडू शकते.

हे नियम आणि अधिकार माहित असणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच ते पाळणे देखील महत्वाचे आहे. कारण हे नियम आपल्याच सुरक्षेसाठी तयार करण्यात आले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?