Site icon InMarathi

“भोळ्या संजू”च्या जीवनातल्या ७ अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी दाखवायचं “विसराळू राजू” विसरला

sanju movie missed points inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संजू… सर्वात वादग्रस्त अभिनेता संजय दत्त ह्याच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट दोन वर्षांपुर्वी रिलीज झाला. अनेक लोकांनी त्याला डोक्यावर घेतले.

दिग्दर्शक राजकुमार हिराणी ह्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘संजू’ ह्या चित्रपटाची चर्चा खूप दिवसांपूर्वी पासून सुरु होती. ह्यामध्ये रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका अत्यंत सुंदर साकारली आहे. त्यासाठी त्याची खूप प्रशंसा देखील करण्यात आली.

 

india.com

 

संजय दत्त म्हणजे चित्रपट सृष्टीतील सर्वात वादग्रस्त अभिनेता. ड्रग्स, अफेअर, अंडरवर्ल्ड असं सर्वकाही सध्यापर्यंत संजय दत्तने अनुभवलं. म्हणूनच त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग जास्त उत्सुक होता.

कारण ह्यातून त्याच्या आयुष्यात काय काय घडलं हे सर्व समोर येणार होतं. पण त्यातही प्रेक्षकांच्या पदरी निराशाच पडली.

हा चित्रपट भलेही एक बायोपिक म्हणून सादर केला गेला असला, तरी ह्यात संजय दत्तच्या जीवनातील अनेक महत्वाचे मुद्दे हेतू पुरस्सर  वगळण्यात आले आहेत.

त्यामध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याचा संजय दत्तच्या जीवनावर खूप प्रभाव पडला होता.

बाळासाहेबांनी वाचवणं :

 

indianexpress.com

 

बाळासाहेब ठाकरे ह्यांनी संजय दत्तची तेव्हा मदत केली जेव्हा तो १३ महिने तुरुंगात होता. १९९५ साली जेव्हा शिवसेना सत्तेत होती तेव्हा बाळासाहेबांनी संजय दत्तला जामीन मिळवून देण्यात मदत केली होती.

त्यावेळी सुनील दत्त हे देखील कॉंग्रेसमध्ये होते तरीदेखील त्यांच्या पक्षाने त्यांची कुठल्याही प्रकारे मदत केली नव्हती.

त्यानंतर सुनील दत्त हे बाळासाहेब ह्यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले. त्यावेळी सुनील दत्त ह्यांनी बाळासाहेबांकडे आपल्या मुलाला सोडविण्यासाठी मदत मागितली आणि त्याबदल्यात आपले राजकीय करिअर देखील सोडण्यास ते तयार होते.

पण बाळासाहेबांनी त्यांना म्हटले की ते देखील एक वडील आहेत, त्यामुळे त्यांना वडिलांची काळजी आणि प्रेम कळतं. त्यामुळे

“मी तुमची मदत करीन. पण त्यासाठी तुम्हाला तुमचं राजकीय करिअर संपवायची गरज नाही.”

आणि त्यानंतर बाळासाहेबांनी संजय दत्तची जामिनावर सुटका करवून घेतली होती.

समाजवादी पार्टीत संजयचा प्रवेश :

 

pinkvilla.com

 

संजय दत्तचे वडील म्हणजेच स्वर्गीय अभिनेते सुनील दत्त पाच वेळा कॉंग्रेसमध्ये खासदार होते. त्यांनी मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाच्या काळात देखील काम केले. हे एक यशस्वी अभिनेते तर होतेच त्यासोबतच ते तेवढेच यशस्वी राजकारणी देखील ठरले.

ते कॉंग्रेसचे एक प्रामाणिक नेते होते. संजय दत्तची बहिण प्रिया दत्त ह्या देखील कॉन्ग्रेसशी जोडलेल्या होत्या. तसेच २००९ सालच्या निवडणुकीत त्या विजयी देखील झाल्या होत्या.

पण त्यानंतर असं काही झालं ज्यामुळे एक खूप मोठा वाद निर्माण झाला.

२००९ सालच्या मतदाना निवडणुकांनंतर संजय दत्त ह्यांनी समाजवादी पार्टी जॉईन केली. त्यांचे मित्र अमर सिंघ ह्यांच्या सांगण्यावरून त्यांना समाजवादी पार्टीत सामील केले गेले. ह्याविषयी बोलताना त्यांनी असे करण्याचे स्पष्ट कारण देताना एका घटनेची आठवण करून दिली.

जेव्हा त्यांच्या वडिलांना तीन तास शरद पवारांनी वाट बघायला लावली होती. तसेच सुनील दत्त सहमत नसतानाही त्यांनी संजय निरुपम ह्यांना प्रवेश दिला. म्हणून संजय दत्त ह्याने त्याच्या पित्याच्या मृत्यूचे कारणही काँग्रेस पक्ष असल्याचं विधान केलं होतं. पण हा एवढा मोठा मुद्दा ह्या चित्रपटातून वगळण्यात आला आहे.

संजय दत्तची पहिली दोन लग्न :

 

indiatvnews.com

 

ह्या चित्रपटात बऱ्यापैकी संजयचे कौटुंबिक जीवन, त्याची पत्नी मान्यता आणि दोन मुले ह्यांच्याबाबत दाखविण्यात आले आहे. पण ह्या चित्रपटात संजय दत्तच्या ह्याधीच्या दोन विवाहांचा उल्लेखही आढळून येत नाही.

म्हणजेच संजय दत्तच्या आयुष्यातील तो काळ जो बघण्यात प्रेक्षकांना जास्त रस होता ह्या चित्रपटातून वगळण्यात आला.

रिचा शर्मा ही संजय दत्तची पहिली पत्नी ज्यांचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला. ती देखील एक अभिनेत्री होती जिला देव आनंद ह्यांनी लॉन्च केले होते. बातम्यांनुसार माधुरी दीक्षित सोबतच्या त्याच्या अफेअर मुळे ह्याचं लग्न तुटलं होतं.

रिया पिल्लई ही त्याची दुसरी पत्नी. जिचं अफेअर लिअँडर पेस सोबत असून त्याच्यापासून तिला एक मुलगी देखील असल्याची चर्चा बराच काळ मिडीयामध्ये होती. तसेच त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्याला त्रिशाला नावाची मुलगी देखील आहे. हे सर्व काही ह्या चित्रपटात दाखविण्यात आलेलं नाही.

माधुरी बरोबर चं प्रेम प्रकरण :

 

bollywoodmantra.com

 

माधुरी दीक्षित आणि संजय दत्त ह्यांच्यात अफेअर असल्याच्या अनेक बातम्या त्या वेळी गाजल्या. पण त्यानंतर त्याला अटक झाली आणि माधुरीने त्याला सोडून दिले. पण हा मुद्दाही ह्या चित्रपटातून वगळण्यात आला आहे.

संजय गुप्ता सोबतची मैत्री :

 

firstpost.com

 

राजकुमार हिरानी आणि संजय दत्त ह्यांची मैत्री तर जगजाहीर आहे. पण त्याआधी देखील संजयचा एक खास मित्र होता तो म्हणजे दिग्दर्शक संजय गुप्ता. ह्यांनीच संजय दत्तला खरा स्टारडम मिळवून दिला.

संजय गुप्ता सोबत संजय दत्तने आतिष, कांटे, मुसाफिर आणि झिंदा सारखे चित्रपट केले. पण ह्यांची २० वर्षांची मैत्री अखेर तुटली. गुप्ता ह्याबाबत सांगताना म्हणतात की, संजय दत्तचा मॅनेजर धरम ओबेरॉय ह्याने दत्तच्या मनात काही गैरसमज उभे केले आणि आमच्या मैत्रीत फुट पडली.

अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन :

 

newson.co.in

 

संजू चित्रपटात संजय दत्तचे मुंबई बॉम्बस्फोटातील सहभागाबाबत तर सांगण्यात आले आहे – पण त्याच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांना बाजूला सारून.

कट कसा रचला गेला, त्याचे दुबई येथील डॉनशी संबध तसेच छोटा शकील सोबतच त्याचं ते संभाषण… जे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादांपैकी एक होता. तसेच त्याने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी कबुली देताना सांगितलं होतं की त्यानेच अबू सालेम कडून गन्स पुरविल्या होत्या.

तसेच ह्याबाबत आणखी एक वाद होता की, संजय दत्तचे अबू सालेम आणि छोटा शकील ह्यांच्याशी संबंध तर होतेच पण शकील ह्याने एकदा संजयला मारण्याचा देखील प्रयत्न केला.

पण हे सर्व मुद्दे देखील ह्या चित्रपटातून वगळण्यात आले आहेत.

संजय दत्तला टेक्सास येथे वास्तव्यास राहायचे होते :

ड्रग्सला ह्या चित्रपटात एक महत्वाचे स्थान देण्यात आले आहे, कारण संजय दत्तच्या आयुष्यातील तोच एक टर्निंग पोईंट ठरला होता. पण ह्या ड्रग्समुळे संजय दत्तच्या जीवनात कुठले कुठले बदल झाले हे चित्रपटात दाखविण्यात आले नाही.

 

timesnownews.com

 

तो युएसच्या पुनर्वसन केंद्रात होता जेव्हा त्याची भेट त्याची पहिली पत्नी रिचा हिच्याशी झाली. ह्यानंतर संजय दत्त पूर्णपणे बदलू लागला होता. सिमी गरेवालच्या एका कार्यक्रमात त्याने हे मान्य केले होते की, त्याला तिथून परत यायचं नव्हतं.

टेक्सास येथे एक कुरण विकत घेऊन तिथेच राहण्याचा त्याचा प्लान होता. पण त्याच्या पित्याने त्याला “एक वर्ष भारतात येऊन राहा, त्यानंतर देखील तुला परत जायचे असेल तर तू नेहमीसाठी युएसला शिफ्ट होऊ शकतोस” असे सांगितले.

ज्यानंतर संजय दत्त भारतात आला आणि मग काही परत गेला नाही.

अश्या, संजय दत्तच्या जीवनातील महत्वाच्या मुद्द्यांना ह्या चित्रपटातून हेतुपूर्वक वगळण्यात आलं आहे. पण जर हे मुद्दे देखील चित्रपटात दाखविण्यात आले असते तर खऱ्या अर्थाने संजय दत्तचे जीवन लोकांसमोर येऊ शकले असते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version