Site icon InMarathi

तुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय?

kensington-security-slot-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुमच्यापैकी बहुतांश जण लॅपटॉप वापरत असतील. या लॅपटॉपवर अनेक स्लॉट असतात जसे की युएसबी पोर्टचा, चार्जिंगचा, इयरप्लगचा वगैरे वगैरे..!

पण याच स्लॉटमध्ये चौकोनी किंवा गोल आकाराचा स्लॉट देखील असतो. तुम्ही देखील लॅपटॉप घेतल्यापासून त्याचा कधीच वापर केला नसेल. किंबहुना तुम्हाला त्याचा नेमका उपयोग काय आहे तेच माहित नसेल.

हा चौकोनी किंवा गोल स्लॉट जुन्या लॅपटॉपमध्ये क्वचितच पाहायला मिळतो. परंतु आता जे लेटेस्ट लॅपटॉप आहेत त्यावर हा स्लॉट हमखास पाहायला मिळतो.

फक्त लॅपटॉपच नाही तर पोर्टेबल एचडीडी, मॉनिटर, आणि अनेक इलेक्ट्रोनिक डिव्हाईसमध्ये हा स्लॉट देण्यात येतो. बरं तर या स्लॉटचा नेमका उपयोग काय? आणि हा स्लॉट लॅपटॉपला का असतो त्याची उत्तरं तुम्हाला आज मिळतील.

 

या स्लॉटला Kensington Security Slot (केन्सिंगटन सिक्युरिटी स्लॉट) असे म्हणतात. लॅपटॉप चोरीला जाऊ नये म्हणून हा स्लॉट लॅपटॉपला दिलेला असतो.

या स्लॉटमध्ये मेटल केबल आणि रबर कोटिंग असलेल्या cylindrical anchor ची एक बाजू घालायची आणि Key किंवा number combination टाकून हा anchor लॉक करायचा.

cylindrical anchor ची दुसरी बाजू कोणत्याही  immovable object जसे की टेबल किंवा खुर्चीला जोडायची, म्हणजे झाला तुमचा लॅपटॉप लॉक.

आपण सायकल कशी लॉक करतो तसचं आहे हे, फक्त सायकलला असा स्लॉट नसतो. गमतीची गोष्ट म्हणजे या स्लॉटचं ओरिजिनल डिजाईनचं पेटंट १९९९ मध्ये सायकल ब्रँड  Kryptonite (क्रिप्टोनाईट) यांनी आपल्या नावावर करून घेतले होते.

 

तसं पाहता हा प्रकार केल्याने तुमचा लॅपटॉप चोरीला जाणारच नाही याची शक्यता कमी ! कारण cylindrical anchor ची केबल कापली जाऊ शकते.

तसेच लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रोनिक डिव्हाईसची बॉडी सहसा प्लास्टिक किंवा फायबरची बनलेली असते. त्यामुळे हे लॉक कोणीही माणूस जोरात खेचून बाजूला करू शकतो.

दुकानदार या स्लॉटचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तू चोर सहज पळवू शकतात. पण Kensington Security Slot आणि cylindrical anchor च्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू लॉक केल्यास त्या सुरक्षित राहतात.

आता पुढल्या वेळेस कोणी विचारलं की हा स्लॉट कसला रे? तर त्याच्यासमोर एका विद्वान माणसासारखं इम्प्रेशन मारायला विसरू नका !

आणखी नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ बघा.

 

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version