Site icon InMarathi

पाश्चात्य कमोडच्या फ्लशला पाणी सोडण्यासाठी दोन वेगळी बटणे का असतात? समजून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आजकाल सर्वत्र आपल्याला कमोड म्हणजेच वेस्टर्न स्टाईलची शौचालये दिसतात. कुठल्या हॉटेलमध्ये असोत किंवा मॉलमध्ये. आजकाल सर्वत्र अशाच पद्धतीची शौचालये वापरली जातात. जर तुम्ही वेस्टर्न टॉयलेटचे फ्लश बघितले असेल तर त्यावर तुम्हाला दोन बटण दिसली असतील. आता फ्लश साठी दोन बटणे का असावीत? दोन्ही बटनांचे काम हे फ्लश करणे आहे, मग दोन बटणे कशाला?

 

besttoilet-reviews.com

ड्युअल फ्लशची ही आयडिया अमेरिकेच्या इंडस्ट्रियलिस्ट डिजाइनर विक्टर पापानेक ह्यांची होती. त्यांनी १९७६ साली त्यांच्या डिजाइन फॉर द रियल वर्ल्ड ह्या पुस्तकात ह्याचा उल्लेख केला आहे. वेळेसोबतच ह्याच्या तंत्रज्ञानात देखील बदल होत गेला.

 

home.howstuffworks.com

ह्यानंतर १९८० साली ऑस्ट्रेलियाने हे तंत्रज्ञान वापरून ड्युअल फ्लश वापरणारा पहिला देश झाला. ह्यामुळे ऑस्ट्रेलियात आजवर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच देशांनी हे तंत्रज्ञान आत्मसात केले.

 

xanaxjunkee.blogspot.com

२ बटण असलेल्या ह्या ड्युअल फ्लश टॉयलेटचा संबंध दोन वेगवेगळ्या बटनांशी आहे. ज्यापैकी एक लहान तर एक मोठा असतो. ह्या दोन्ही बटनांचा वेगवेगळा एक्जिट वॉल्व असतो तसेच पाण्याची लेव्ह्लही वेगवेगळी असते.

 

carlobonetti.com

ह्या दोन बटनांपैकी लहान बटणातून साडे तीन किंवा चार लिटर एवढे पाणी रिलीज होते तर मोठ्या बटणातून सहा ते नऊ लिटर पाणी रिलीज होते. फ्लशमध्ये असलेला लहान बटण हा लिक्विड वेस्टला फ्लश करण्यासाठी असते तर मोठे बटण हे सॉलिड वेस्ट फ्लश करण्यासाठी असते.

youtube.com

त्यामुळे ह्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही टॉयलेट वापराल तेव्हा ह्या दोन बटणांचा वापर काळजीपूर्वक करा. म्हणजेच जर लिक्विड वेस्ट फ्लश करायचे असेल तर लहान बटणाचा वापर करा तसेच सॉलिड वेस्ट फ्लश करायचे असल्यास मोठ्या बटणाचा वापर करा.

एका रिसर्च नुसार ह्याप्रकारे फ्लशचा वापर केल्याने आपण एका वर्षात २० हजार लिटर पर्यंत पाण्याची बचत करू शकतो.

पाण्याचे महत्व तर आपण सर्वच जाणतो. दिवसेंदिवस आपल्या पृथ्वीवरील पिण्याच्या पाण्याचा साठा हा कमी कमी होत चालला आहे. त्यामुळे जेमेल तशी आणि तेवढी पाण्याची बचत करणे खूप गरजेचे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version