Site icon InMarathi

औषधांविना शांत झोप लागावी म्हणून हे ५ पदार्थ तुम्हाला हमखास मदत करतील!

late night sleeping girl InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वी लोक लवकर उठायचे आणि लवकर झोपायचे, पण सध्याच्या या धावपळीच्या युगात वेळ कधी निघून जाते ते कळत देखील नाही. रात्रीचे बारा-एक वाजले म्हणजे दुसरा दिवस सुरु झाला तरी लोक झोपत नाहीत किंवा त्यांना झोप लागत नाही.

ही समस्या म्हणजे काही आजार नाही. अनेकांना उशिरा झोपण्याची सवयच होऊन जाते, त्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप लागत नाही.

जर तुम्हाला देखील अशी समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकते.

आज आम्ही तुम्हाला अश्या काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही खाल्ले तर रात्री तुम्हाला सुखाची झोप लागेल.

 

स्रोत

चेरी:

 

 

चेरीमध्ये melatonin नामक एक घटक असतो, जो मनुष्याच्या झोपेच्या क्रियेसाठी पोषक ठरतो. जे लोक सतत प्रवास करत असतात ते झोपेसाठी melatonin च्या गोळ्या देखील घेतात. एका निरीक्षणामध्ये हे देखील सिद्ध झाले आहे की चेरीचा ज्यूस पियाल्यामुळे गाढ झोप लागते आणि मुख्य म्हणजे तुमची झोप पूर्ण होते.

 

रताळी:

 

झोपेसाठी आवश्यक असणारे सर्वच घटक रताळ्यामध्ये आढळतात. तसेच त्यामध्ये पोटेशियमसुद्धा असते जे शरीराचे मसल्स रीलॅक्स करते. ज्यामुळे रात्री लवकर झोप लागते.

 

हर्बल टी:

 

अनेक निरीक्षणांमधून हे सिद्ध झालं आहे की हर्बल टी लवकर झोप येण्यास कारणीभूत ठरू शकते. झोपण्यापूर्वी हर्बल टी घेतल्यास तुमचे डोळे लवकर जड होतात आणि काहीच वेळात तुम्ही झोपेच्या स्वाधीन होता.

 

दूध

 

 

झोपेपूर्वी आपल्याला नेहमी दूध पिण्यास सांगितले जाते. ते यासाठीच की दूध हे झोप येण्यासाठी चांगलेच परिणामकारक ठरते. दुधामध्ये  aminoacid tryptophan असतं जे मेंदूमध्ये serotonin नामक द्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असतं.

हे serotonin द्रव्यचं लवकर झोप येण्यासाठी कारणीभूत ठरतं. म्हणून यापुढे झोपण्याच्या वेळी दूध नक्की प्या.

 

केळी:

 

केळ्यामध्ये पोटेशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात जे चांगल्या झोपेसाठी आवश्यक असतात. तसेच त्यामधील कार्बोहायड्रेट्स सुद्धा झोप येण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतात.

या व्यतिरिक्त केळ्याचे आपल्या शरीरासाठी अनके फायदे आहेत. त्यामुळे झोपण्याच्या वेळेस एकतरी केळ जरूर खावं.

तर मग आज रात्री वरीलपैकी एक तरी पदार्थ नक्की try करा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version