सगळे विश्वचषक सामने म्हणजेच ‘वर्ल्डकप’ ४ वर्षांनीच होतात – जाणून घ्या रंजक इतिहास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आपल्या देशात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्व आहे, आपल्या इथे क्रिकेटचे वेगवेगळे प्रकार खेळले जातात. वन डे, टेस्ट क्रिकेट, रणजी क्रिकेट, २०-२०, आयपीएल!
पण तरीही प्रत्येक क्रिकेट फॅनला प्रतीक्षा असते ती दर ४ वर्षाने येणाऱ्या वर्ल्ड कपची!
आणि फक्त क्रिकेटच नव्हे, ऑलिम्पिक गेम्स, ट्रायथलॉन, फुटबॉल इत्यादि खेळ सुद्धा दर ४ वर्षानी होतात, आणि क्रिकेट सारखेच यांची सुद्धा प्रतीक्षा करणारे फॅन्ससुद्धा प्रचंड आहेत!
ऑलिम्पिक, क्रिकेट विश्व चषक, फिफा वर्ल्ड कप हे आणि अशा इतर काही सामन्यांचा प्रेक्षकवर्ग जगभर मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे.
त्या-त्या खेळाचे चाहते अतिशय आतुरतेने ह्या सामन्यांची प्रतीक्षा करत असतात. पण त्यासाठी त्यांना ४ वर्ष वाट बघावी लागते.
ऑलिम्पिक असो वा फिफा वर्ल्ड कप, जगातील जवळपास सर्वच विश्वचषक सामने हे ४-४ वर्षांनंतर आयोजित केले जातात.
पण हे सामने ४ वर्षांनीच का आयोजित केले जात असतील, म्हणजे ते २-२ वर्षांनी किंवा दरवर्षी आयोजित का केले जात नाहीत? हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. आज तुमच्या ह्याच प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधून काढलं आहे.
हे ही वाचा –
===
त्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून बघावे लागेल. इ.स. ७७६ पूर्व काळात फावल्या वेळेत सैनिकांमध्ये खेळाचे सामने लढवले जायचे. हे सामने त्यांच्या प्रशिक्षणाचा एक भाग असायचे. काही काळाने हे सामने नियमितपणे आयोजित केले जाऊ लागले.
हळूहळू सैनिकांचे हे खेळाचे सामने लोकप्रिय होऊ लागले आणि त्यात सामान्य खेळाडूंना देखील सहभागी करून घेतले जाऊ लागले.
यानंतर सैनिकांजवळील मर्यादित वेळ आणि त्यांची तयारी बघता हे सामने ४ वर्षांच्या कालावधी नंतर आयोजित केले जाऊ लागले. ह्या ४ वर्षांच्या कालावधीला ‘ऑलंपियाड’ असे म्हटले जाऊ लागले.
हा शब्द ‘ऑलंपिया’ ह्या पर्वताच्या नावावरून आला. येथेच ह्या खेळांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येत होते.
१८९६ साली जेव्हा ग्रीस म्हणजेच तेव्हाचे एथेंस येथे ऑलिम्पिक खेळांची सुरवात करण्यात आली. तेव्हा देखील ४ वर्षांच्या कालावधीनंतर ह्या खेळांचे आयोजन करण्याची प्रथा निभावली गेली.
इतर खेळांच्या सामन्यांच्या आयोजनात देखील ह्याचं परंपरेच अनुकरण करण्यात आले.
फुटबॉलमध्ये फिफा आणि क्रिकेटमध्ये आयसीसी ह्या आपल्या खेळाडूंवर खूप लक्ष देते त्यांची फिटनेस आणि खेळ ह्यासाठी त्यांना पुरेपूर वेळ मिळावा ह्याचीही काळजी घेते.
कारण टेस्ट क्रिकेट मध्ये प्रचंड संयम लागतो, शिवाय आयपीएल सारख्या ३ तासांच्या सामन्यांमध्ये खेळाडूंचा फिटनेस, मानसिक स्थिति सगळंच टेस्ट होतं!
त्यामुळे वर्ल्ड कप मध्ये त्यांचा परफॉर्मन्स हा ढासळू नये आणि खेळाडूंना तसेच पर्यायाने संघाला लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागू नये, म्हणूनच विश्वचषक दर ४ वर्षानी होतो!
फुटबॉलच्या बाबतीत देखील असेच काहीसं आहे. वर्षभर फुटबॉलच्या वेगवेगळ्या क्लबच्या डझनभर मॅचेस होत असतात!
पण वर्ल्ड कप सारख्या महत्वाच्या आणि मोठ्या सामन्याच्या आयोजनांसाठी ४ वर्षांचा वेळ घेतला जातो.
हे ही वाचा –
===
ऑलिम्पिकची सुरवात ६ एप्रिल १८९६ साली ग्रीस येथे झाली. ज्यामध्ये १४ देशांतील २०० एथलिट्सनी ४३ सामन्यांत सहभाग घेतला होता.
तेव्हापासून ऑलिम्पिकचे सामने हे दर ४ वर्षांनी आयोजित केले जातात. तर फिफा वर्ल्ड कप आणि क्रिकेट वर्ल्ड कप देखील ४ वर्षांनीच आयोजित केल जातो.
तसेच कुठल्या आपत्कालीन स्थितीत हे आयोजन थांबविले देखील जाऊ शकतात. जसे दुसऱ्या विश्वयुद्धा दरम्यान झाले होते.
तसेच आत्ता सुद्धा होत आहे, कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगभर थैमान घातलं आहे! देशातले ७ बलाढ्य देश ज्यात भारत अमेरिका, युरोपियन देश समाविष्ट आहेत, सध्या ते देश लॉकडाऊन आहेत!
या देशांची आर्थिक सामाजिक मानसिक घडी विस्कटली आहे!
अशा परिस्थितीत भारतात होणारी ‘आयपीएल’ रद्द केली असून,अलिम्पिक गेम्स सुद्धा रद्द करायचा विचार चालला आहे! या तणावपूर्ण परिस्थितीत खेळाडूंचे मनोधैर्य खचलं आहे, शिवाय आर्थिक नुकसान देखील खूप झाले आहे!
पण काय करणार, मनुष्यजातीला वाचवायचे असेल तर इतकं तर आपल्याला केलंच पाहिजे!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.