' सर्जिकल स्ट्राईक “खरंच” झाली का? व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले? सत्य जाणून घ्या – InMarathi

सर्जिकल स्ट्राईक “खरंच” झाली का? व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले? सत्य जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

२०१६ सालच्या सप्टेंबर महिन्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून “सर्जिकल स्ट्राईक” केली. तेव्हापासून एक कधीही नं संपणारा वाद सुरू झाला होता. सर्जिकल स्ट्राईक खरंच झाली की नाही व “ही सर्जिकल स्ट्राईक पहिलीच होती का?” – ह्यावर.

पण नुकतेच सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडीओ प्रसृत झालेत…आणि वादाला वेगळंच वळण मिळालं…!

सैनिकांच्या शौर्याचा “असा” वापर होणं योग्य आहे का, सरकारने “राजकीय” लाभासाठी सैनिकी कार्यवाहीचं “असं” मार्केटिंग करावं का – असं हे नवं वळण.

ह्या दोन्ही प्रश्नांवर – साहजिक स्ट्राईक पहिलीच होती का – आणि – “आत्ताच” सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडीओ उघड का केले गेलेत – ह्यांवर फेसबुकवर उत्तम विवेचन केलेल्या दोन पोस्ट इथे वाचकांसाठी देत आहोत.

चिन्मय भावे लिहितात :

===

दोन तीन संदर्भ देतो.

१) शिवशंकर मेनन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. मनमोहन सिंह सरकारने नेमलेले. “२००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर असे स्ट्राईक्स करण्याची भारतीय सैन्याने तयारी केली होती, पण राजकीय नेतृत्वाने diplomatic चॅनल वापरायचे ठरवले.” हे त्यांच्या Choices: Inside the Making of Indian Foreign Policy या पुस्तकात नमूद आहे.

२) जनरल बिक्रम सिंह सैन्य प्रमुख होते काँग्रेसच्या काळात. त्यांनी NDTV वर पहिल्याच दिवशी सांगितले की, या आधी बॉर्डरवर पेट्रोल पार्टीवर छापा मारण्यासारख्या छोट्या कारवाई झालेल्या आहेत. पण त्यांना “सर्जिकल स्ट्राईक” म्हणता येणार नाही.

 

surgicle-strike-inmarathi
india.com

२०१६ सप्टेंबरमध्ये एकाचवेळी अनेक ठिकाणी स्पेसिफिक इनपुटवर कमांडो हल्ला झाला. त्याचे स्केल आणि व्याप्ती बरीच मोठी होती. पाक बॉर्डर ऍक्शन टीमची कारवाई आणि आपलं प्रत्युत्तर अनेकदा घडलं आहे. अगदी हल्ली सुद्धा. परंतु त्याला सर्जिकल स्ट्राईक्स म्हणत नाहीत. सैनिक त्याला “बटालियन लेव्हल बदला” असं म्हणतात.

३) ज्येष्ठ पत्रकार प्रवीण स्वामी, नितीन गोखले वगैरेंनी सविस्तरपणे तपशील दिलाय. शिवाय हिस्टरी ची फिल्मही आहे. ती पाहून सत्य-असत्यता verify करू शकता.

४) सर्जिकल स्ट्राईक्स वर शंका घेणे आणि त्यावर भाजपच्या प्रत्येकाने टिमकी वाजवणे दोन्हीचा मी विरोध करतो. पण –

जसे १९७१ चे राजकीय श्रेय इंदिराजींचे आहे (बांगलादेश निर्मिती), कारगिलचे श्रेय-अपश्रेय जसे वाजपेयींचे आहे, तसेच सर्जिकल स्ट्राईक्स चे राजकीय श्रेय मोदी सरकारचे आहे.

सैनिकी श्रेय पॅराशूट रेजिमेंटचे आहे यात वादच नाही. पण ऑपरेशन फेल गेले असते, आपली माणसं मारली गेली असती (जसं श्रीलंकेत “ऑपरेशन पवन”मध्ये घडलं आहे) तर ते अपश्रेय आणि छि थू मोदींची झाली असती. त्यामुळे चिडचिड करण्याची गरज नाही…!

सर्जिकल स्ट्राईक्स करावे लागतील आणि ते जाहीरही करावे लागतील हा लष्करी थिंक टॅन्कचा निर्णय २००९ च्या आसपास झाला. तरीही २०११ आणि २०१३ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाने धमक दाखवली नाही. आणि हे त्यांनीच नेमलेल्या NSA च्या लिखाणावरून स्पष्ट आहे.

 

nawaz-modi-inmarathi
financialexpress.com

सर्जिकल स्ट्राईक्स जाहीर करण्याचा हेतू भाजपला वोट गोळा करणे नाही.

पाकिस्तान “tactical nukes” ची सतत धमकी देत असतो. आणि गेली १५ वर्षे एकंदरीतच भारताकडे सामरिक प्रत्युत्तराचा पर्यायच नाहीए – असा समज होऊन जो भारतीय जनक्षोभ वाढत चालला होता तो पाहता जाहीर करणे गरजेचे होते.

===

प्रसिद्ध राजकीय विश्लेषक व आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासक सौ. स्वाती तोरसेकर ह्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडीओ रिलीज करण्यामागची चपखल राजकीय खेळी उत्कृष्टरित्या मांडली आहे.

स्वाती जी म्हणतात :

===

सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडियो आताच का बाहेर आले?

जेव्हा हल्ला केला तेव्हाही काँग्रेस आणि पाकिस्तान व्हिडीयो मागतच होते. आता देखील जे व्हिडियो दाखवले जात आहेत ते नमुना म्हणून आहेत. न दाखवलेले बरेच असणार आहेत. ही वेळ का निवडली जावी ह्याचे उत्तर काय?

 

surgical-strike-video-inmarathi
thewire.in

गंमत अशी की पाकिस्तान इस्लामाबादमध्ये जे बोलतो ते काँग्रेसवाले भारतात बोलतात. त्यांचे मुद्दे एकच असतात. दोघांनाही मोदींना खोटे पाडण्यात आणि सत्तेवरून खाली खेचण्यात रस आहे. किंबहुना काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर इस्लामाबादला जातात आणि मोदीना सत्तेवरून हटवण्यासाठी पाकिस्तानची मदत उघड उघड निर्लज्जपणे मागतात.

तेव्हा हे दोघे खोटे आहेतच – ह्या दोघांना खोटे पाडण्यासाठी व्हिडियो बाहेर आले हे कारण पटण्यासारखे नाही. मग हा इस्लामाबादेतील जनरल्स ना दिलेला इशारा आहे का? आगाऊ पण कराल तर हे दिवस विसरू नका?

असले इशारे इस्लामाबादचे जनरल्स कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. ह्याचा परिणाम होऊन हल्ले थांबतील ह्याची शक्यता नाही. काश्मिरात बर्फ हटले की दहशतवाद्यांचे थैमान आणि घुसखोरांच्या कारवाया सुरु होतातच हे वर्षानुवर्षे तसेच चालत आले आहे.

सर्जिकल स्ट्राईक नंतर स्ट्राईक झालाच नाही इथूनच पाकिस्तान ने सुरुवात केली. आता व्हिडियो बाहेर आले तसे पाकिस्तानचे भारतामधले पाठीराखे “हो हो, हल्ला झाला होता” हे कबूल करू लागले. आता ते म्हणतात पण ते “परिणामकारक” नव्हते. म्हणजे आधी म्हणायचे की हल्ले झालेच नाहीत – कानाखाली गणपती काढल्यावर “अहो लागलेच नाही म्हणायचे” हा सिलसिला आहे.

 

Pak_media_inmarathi
dawn.com

तेव्हा काँग्रेसला तर मान्य करावे लागले की हल्ले झाले होतेच. भारतीय TVवरील कार्यक्रमाच्या बातम्या पाकिस्तानातही पोचल्या आहेत. तिथली जनता त्यावर विचार करते.

त्यांच्या मनात आज काय असेल? आपलेच जनरल्स आणि काही राजकारणी आपल्याशी खोटे बोलले? त्यांनी आपला विश्वासघात केला? हे त्या पाकिस्तानी जनतेला पटायला वेळ लागेल का आता?

निवडणुकीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तानची खास करून तिथल्या जनरल्सची आणि ज्या राजकीय शक्ती ह्याचे समर्थन करतात त्यांची व्हिडियो बाहेर आल्यामुळे प्रचंड “गोची” झाली आहे. आजवर ज्यांनी हल्ले नाकारले ते जनतेला निवडणुकीच्या उंबरठ्यावर काय उत्तरे देणार? त्यांच्याकडे ह्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. इतके होऊनसुद्धा ते जर जनरल्सचे समर्थन करत बसले तर निवडणुकीत त्यांचे भवितव्य धोक्यात येईल

दुसरी गोम आहे ती मेलेल्यांच्या यादीची.

काँग्रेसला जसे मान्य करावे लागले की हल्ला झाला होता तसे आता भारतीय TV कार्यक्रम पाहणाऱ्या पाकिस्तानी जनतेलाही कळून चुकेल की इतके दिवस आपले सैन्य आपल्याला थापा मारत होते. एकदा हल्ले झाले सिद्ध झाल्यावर प्रश्न येतो – मेले कोण? त्यांची यादी कुठे आहे? त्यातले छद्म आताच बाहेर कदाचित येणार नाही तरी २०१९ च्या आधी मात्र नक्कीच येईल असे मला वाटते.

===

वरील दोन्ही विवेचन वाचून एकूणच सर्जिकल स्ट्राईकबद्दल आपला पर्स्पेक्टिव्ह बदलू शकण्याची शक्यता आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?