जर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं नसतं तर भारत देश कैक पटीने “भारी” झाला असता
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले. खूप वेळा इंग्रजांच्या राज्याचे समर्थन करताना भारतात इंग्रजांनी सुधारणा घडवून आणल्या असे म्हटले जाते.
जर इंग्रज नसते तर भारत मध्ययुगीन कालखंडात राहिला असता असे ही खूप सगळ्या विचारवंतांचे मत पडते. कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो की जर समजा इंग्रज भारतात आलेच नसते तर आज भारताची स्थिती कशी राहिली असती?
या प्रश्नाचं वेगळ्या बाजूने उत्तर द्यायचं झालं तर इंग्रज भारतात आले नसते तर आज भारतात परिस्थिती खूप वेगळी दिसली असती आणि ती आज दिसते त्यापेक्षा सकारात्मक दृष्टीने वेगळी दिसली असती.
इंग्रज भारतात आले नसते तर देशाची काय अवस्था झाली असती याच वर्णन करताना इंग्रज राज्याच्या पाठीराख्यांकडून दोन मोठी कारणे दिली जातात.
१. जर इंग्रज नसते तर भारत नावाचा एक देश कधीच बनला नसता. हा देश अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागाला गेला असता.
२. भारतात यंत्रयुग हे इंग्रजांनी आणले आणि औद्यौगिक प्रगतीची सुरुवात देखील इंग्रजांनीच केली त्यामुळे इंग्रज नसते तर औद्योगीकरण झाले नसते.
या दोन प्रवाहामध्ये खरेच काही तथ्य आहे का?
जर इतिहास चाळून पहिला तर लक्षात येईल इसवी सन १७०७ मध्ये मुघल सम्राट औरंगझेब याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मुघल साम्राज्याचा अस्त सुरु झाला आणि मराठा साम्राज्याचा उदय.
मराठ्यांनी औरंगझेबाच्या मृत्यनंतर आपला डंका दाही दिशांना डौलाने फडकत ठेवला. त्या काळात मराठा साम्राज्य दक्षिणेला तामिळनाडू पर्यंत, उत्तरेला पेशावर पर्यंत आणि पश्चिमेला बंगाल पर्यंत पसरलेले होते.
मराठ्यांनी हैदराबादच्या निजामाला हरवून आंध्रप्रदेश आणि तेलंगणा जिंकण्याची सुद्धा तयारी केलेली होती. १७ व्या शतकात मराठा शक्ती एक साम्राज्याच्या स्वरूपात उगम पावत होती.
या शक्तीला रोखून ठेवलं ते बाहेरून आलेल्या अहमदशहा अब्दाली याने! मराठे पानिपतचे तिसरे युद्ध अब्दाली कडून हरले.
१८ व्या शतकाच्या सुरुवातीला तीन मोठ्या शक्तींचा भारतात उदय झाला होता. पंजाब प्रांतातील महाराजा रणजितसिंग याचे शीख साम्राज्य, महाराष्ट्रातील राजा शिवाछत्रपतींचे मराठा साम्राज्य आणि म्हैसूरचे टिपू सुलतान याचे साम्राज्य.
या तीनही साम्राज्य मध्ये मराठा साम्राज्याची शक्ती खचितच मोठी होती. जर ब्रिटीश भारतात आले नसते तरीही भारत हा मराठ्यांच्या एकछत्री अमलाखाली नांदणारा छोट्या राज्यांचा एकसंघ देश बनला असता.
आता जिथे औद्योगीकरणाचा मुद्दा येतो तिथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंग्रज येण्या अगोदर देखील भारत जगातील एक मोठा निर्यातदार देश होता.
रेशीम कापड, मलमल, ताग, सोने, चांदी, धातू, हिरे, मसाले अशा वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्याच्या विविध वस्तू बनवून त्यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर भारतातून चालत असे.
१९१८ सालच्या औद्योगिक समितीने आपले भारताविषयी मत नोंदवताना असे म्हटले होते की,
“आजच्या घडीला आधुनिक औद्योगिकरणाचा जनक म्हणून डांगोरे पिटणारी युरोपची संस्कृती जेव्हा बाल्यावस्थेमध्ये होती त्यावेळी भारतात प्रचंड श्रीमंत साम्राज्ये त्यांच्या संपत्ती आणि दुर्मिळ कलाकुसरी साठी प्रसिद्ध होती.
–
त्याची भुरळ पश्चिमेच्या अनेक व्यापाऱ्यांना पडलेली होती. भारताचे औद्योगीकरण आज असलेल्या युरोपच्या औद्योगीकरणाच्या तुलनेत कुठेही कमी दर्जाचे कधीच नव्हते”.
वरील विधानांचा अर्थ समजून घेतला तर ब्रिटीशांनी भारत घडवला असे म्हणण्यापेक्षा भारत लुटला असे खेदाने म्हणावे लागते.
रेल्वे आणि टेलिग्रामची सुविधा तर त्यांच्यामुळे भारतात आली मात्र इथला पैसा आणि संपत्ती प्रचंड प्रमाणात लुटून त्यांनी इंग्लंडला नेली हे नाकारता येत नाही.
अजूनही पाहायचे झाले तर ब्रिटीश भारतात नसते आले तर काय घडले असते याचा थोडक्यात लेखाजोखा पाहू.
१. पाकिस्तान आणि बांगलादेशाची निर्मिती झालीच नसती. भारतात छोटी छोटी राज्ये राहिली असती तरीही ही राज्ये भारत या एका नावाखाली एकसंघ राहिली असती.
२. कदाचित तिबेट आज चीनच्या ऐवजी भारताचा हिस्सा बनला असता.
३. इतक्या मोठ्या भूभगाबरोबर भारताला संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थायी सुरक्षा समितीचे सदस्यत्व मिळाले असते.
४. भारत जगातील सगळ्यात श्रीमंत देश असू शकला असता. दादाभाई नौरोजी यांनी आपल्या “Poverty and Un-British rule in India” या पुस्तकात वर्णन केले आहे इंग्रज जितके वर्ष भारतात राहिले त्याच्या दर वर्षाला ४ लाख पौंड इतकी संपत्ती लुटून ब्रिटनला नेत राहिले. जर ब्रिटीश नसते तर आज भारत महासत्ता म्हणून उदयास आलेला देश असला असता.
५. भारतात पैशाअभावी होणारा दुष्काळ राहिला नसता.
६. एक सत्य असे ही सांगता येईल की ब्रिटीश आले म्हणून या देशात लोकशाही आणि संसद व्यवस्था आली. ब्रिटिशानी ही व्यवस्था Indian Council Act 1861 या कायद्याद्वारे आणली.
कायद्याचे राज्य ही संकल्पना ब्रीटीशांचीच होती. ब्रिटीश नसते तर लोकशाही पद्धतीने चालणारे राज्य आणि निवडणूक पद्धती यायला कदाचित अनेक वर्षे लागली असती.
७. आज आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये इंग्रजीचा जितका भयाण प्रभाव दिसतो तो प्रभाव ब्रिटीश नसते तर कधीच दिसला नसता.
त्यामुळे ब्रिटीश राज नसले असते तरीही आपला देश खूप चांगल्या स्थितीत राहिला असता आणि चालला असता अशी ही एक परिस्थिती आहे.
वैज्ञानिक शोध आणि यांत्रिक युगातील फायदे मिळायला कदाचित वेळ लागला असता पण आपल्याकडे असलेल्या संपत्तीमुळे आपण देशामध्ये त्याही सुधारणा घडवून आणल्या असत्या असे म्हणण्यास वाव राहतो.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.