' प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर, ह्या बायकांमध्ये पाळली जाणारी ही प्रथा ‘अमानवी’ आहे! – InMarathi

प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर, ह्या बायकांमध्ये पाळली जाणारी ही प्रथा ‘अमानवी’ आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपण एका सभ्य संस्कृतीत आणि अत्यंत सुरक्षित वर्तुळात राहतो त्यामुळे आपल्या चौकटीबाहेरचं जग हे आपल्याला हे खूप सुंदर दिसतं!

पण ते तोपर्यंतच जोपर्यंत त्याची दाहकता आपल्याला जाणवत नाही! एकदा का त्या अनिष्ट गोष्टी, वाईट परंपरा आपल्याला समजायला लागल्या की आपण खूप सुखी आहोत असंच वाटतं!

जुन्या काळापासून चालत आलेल्या बऱ्याच रूढी परांपरांना आपण फाटा दिला आणि नवीन जगण्याच्या पद्धतीप्रमाणे बदलत गेलो! 

पण तरी फक्त आपल्या देशातच नव्हे तर साऱ्या जगात अशा कित्येक जाती जमाती आहेत ज्या त्यांच्या परंपरा आजही पाळतात!

उदाहरण द्यायचं झालं तर आदिवासी लोकांच घ्या, आज माणूस चंद्रावर गेला आहे पण आदिवासी लोकांच्या समस्या काही केल्या दूर होत नाहीयेत, त्याला अर्थात ती लोकं सुद्धा तितकीच जवाबदार आहेत!

 

aadivasi inmarathi
adivaasihunkaar.blogspot.com

 

जगभरात असंख्य आदिवासी जाती -जमाती आहेत आणि परंपरेनुसार त्यांच्या काही अनोख्या प्रथा देखील आहेत.

एकीकडे जग आधुनिक होत असताना या आदिवासी जमाती मात्र आपल्या परंपरांनाच कवटाळून बसल्या आहेत. आदिवासी लोक फारच भोळे भाबडे आणि देव भोळे!

त्यामुळे त्यांच्या प्रथा देखील परमेश्वराभोवतीच गुंतलेल्या असतात. अनिष्ट रूढी, परंपरा पाळणे हा त्यांच्या मते परमेश्वराची भक्ती करण्याचा एकमेव मार्ग होय.

याच भावनेतून अनेक आदिवासी जमातींमध्ये अंगावर काटा आणणाऱ्या प्रथा आज देखील अविरत सुरु आहेत.

indonesaia dani InMarathi

अशीच एक प्रथा इंडोनेशिया मधील एका आदिवासी जमाती मध्ये फार काळापासून पाळली जात आहे.

कुटुंबातील कोणा जवळच्या पुरुष व्यक्तीचा मृत्य झाल्यास या जमातीतील स्त्रीला आपल्या हाताची बोटे अर्पण करावी लागतात.

या बलिदानातून ती स्त्री त्या व्यक्तीच्या मृत्यचे दुःख कधीच विसरत नाही असा या जमातीचा समज आहे. यातून त्या स्त्रीचे त्या व्यक्तीवर असलेले प्रेम देखील सिद्ध होते असे या जमातीचे म्हणणे!

 

indonesaia dani 1 InMarathi

इंडोनेशिया मधील या जमातीचे नाव आहे दानी (Dani). ही जमाती प्रामुख्याने इंडोनेशियामधील New Guinea राज्याच्या पश्चिम भागात आढळते.

या जमातीमधील स्त्रियांना जवळचा कोणी पुरुष नातलग मेल्यावर आपल्या हाताच्या बोटाचा पुढील भाग कापून त्याच्या नावाने अर्पण करावा लागतो.

सध्या इंडोनेशियन सरकार ही प्रथा पूर्णपणे बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. आजही येथील म्हाताऱ्या स्त्रियांची हाताची बोटे कापलेली आढळून येतात. पण एखाद्या स्त्रीचा  मृत्यू झाल्यावर हाच प्रकार पुरुषांना मात्र लागू होत नाही.

indonesaia dani 2 InMarathi

 

अमेरिकन समाजसेवी Richard Archbold यांनी १९३८ मध्ये आपल्या शोध मोहिमेच्या दरम्यान या जमातीचा शोध लावला.

दानी जमातीचे लोक मुळातच लढाऊ ! शिकार करून स्वतः:चे आणि कबिल्यातील इतरांचे पोट भरणे हे एकमेव त्यांचे उद्दिष्ट ! दानी जमातीचे योद्धे नाकामध्ये जाडजुड रिंग्ज घालतात .

 

dani 2inmarathi
dailymail.co.uk

 

या जमातीच्या लोकांबद्दल आपल्या आधुनिक जगात फारच आकर्षण आहे कारण त्यांचे राहणीमान आणि जीवनशैली इतर आदिवासी जमातींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

दानी जमातीमधील पुरुष आपल्या लिंगाचे रक्षण करण्या साठी Koteka नावाची संरक्षक गोष्ट घालतात. सध्या फारच कमी आदिवासी जमातींमध्ये Koteka घातला जातो.

 indonesaia-dani-3-InMarathi

त्यामुळे खास हा पुरातन Koteka नावाचा प्रकार पाहण्या साठी पर्यटक या जमाती ला भेट देतात.

त्यांची ही बोटं तोडण्याची परंपरा ही फक्त त्यांच्यातल्या लोकांमुळेच चालत आली आहे, त्यांच्याच जमातीत कोणीतरी ही प्रथा चालू केली ती ते फक्त आता पुढे नेत आहेत!

बोटं तोडायला त्यांना दर वेळेस हत्याराची गरज असतेच असं नाही, बऱ्याच वेळा बोटाचा वरचा भाग चावून तो बधिर करून सुद्धा त्या बायका बोटं तोडतात!

 

dani tribe women inmarathi
thesun.co.uk

 

होय अंगावर काटा आणणारीच अशी ही प्रथा आहे, म्हणजे एकीकडे जगभरात स्त्रिया उंच भरारी घेत आहेत, आणि दुसरीकडे ह्या आदिवासी स्त्रिया ह्या अशा अनिष्ठ रूढी परंपरा यांमध्ये अडकून पडल्या आहेत!

पण ही अशी जीवघेणी आणि अमानवी प्रथा थांबायलाच हवी!

 

अश्या या आदिवासींची जमाती  आणि त्यांच्या प्रथा  !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?