Good News, नोकिया परत येतोय !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
साधारण दहा वर्षांपूर्वी नोकियाचा मोबाईल म्हणजे सगळ्यांचा फेव्हरेट होता. कोणीही विचारलं, कोणता मोबाईल घेऊ की समोरचा त्याला अगदी आत्मविश्वासाने उत्तर द्यायचा, “मित्रा नोकियाचं घे, सगळ्यात बेस्ट, बाकी चायना रे!” नोकियाचे फोन पण अगदी टिकाऊ, कुठे पडले झडले तरी तुमच्या फोनला काही होणार नाही आणि याच लढाऊ वृत्तीमुळे नोकिया फोन तुमच्या आमच्या सगळ्यांच्याचं मनात घर करून बसला होता. पण दोन वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नोकिया विकत घेतली आणि आपल्या जिवाभावाचा सोबती या जगातूनच नाहीसा झाला. पण अधूनमधून कुजबुज सुरु होती की नोकिया पुन्हा नव्या दमात येतोय, पण ती कुजबुज वाऱ्याप्रमाणे कुठल्या कुठे विरून गेली. परंतु नुकतीच नोकियाच्या Capital Markets Day presentation मधून एक official slide ऑनलाईन leak झाली आणि त्या कुजबुजीवर शिक्कामोर्तब झालं की हो, नोकिया खरंच परत येतोय !
या slide वर पुढील दोन वर्षातील नोकियाच्या Main Topics चा उल्लेख आहे. यंदा २०१६ मध्ये नोकियाने बहुप्रतीक्षित अश्या OZO VR camera कसा लॉन्च करावा यावर लक्ष केंद्रित केले. येणाऱ्या २०१७ या वर्षी नोकिया VR Market मध्ये पाय रोवण्यासाठी जास्त प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण नोकिया फॅन्सना प्रतीक्षा आहे नोकिया कोणता भारीतला स्मार्टफोन घेऊन बाजारात उतरणार आहे याची ! पुढच्याच वर्षी नोकिया कंपनी त्याचं मोबाईल, ऑटोमोटीव्ह आणि कन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक मधील पेटंट लायसन्स expand करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षीच नोकिया नवीन स्मार्टफोन बाजारात आणेल याची खात्री आहे. पुढे २०१८ मध्ये नोकिया स्वत:च्या VR टेक्नोलॉजीचं licensing करणार आहे आणि त्याचं पेटंट देखील त्यांना हमखास मिळेल.
येणारे २०१७ हे वर्ष नोकिया चाहत्यांसाठी एकदम भारी असणार आहे, कारण पहिल्याच सहा महिन्यात नोकिया दोन स्मार्टफोन लॉन्च करणार असून उर्वरित वर्षामध्ये नोकियाचे अजून २-३ स्मार्टफोन बाजारात येण्याची शक्यता आहे. परंतु या गोष्टीबाबत मात्र कोणतीही ठोस माहिती नाही की कोणत्या महिन्यात नोकिया आपले नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे.
नोकिया स्मार्टफोन कोणत्याही महिन्यात सादर करो पण आम्हा चाहत्यांसाठी नोकिया परत येतोय हीच सर्वात आनंदाची गोष्ट आहे !
—
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.