आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
तुमचे अनेक मित्र मैत्रिणी सध्या अमेरिकन्स कंपन्यांसाठी काम करत असतील आणि सध्या तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलं असेल की त्यांना Thanks Giving Day निमित्त चांगली २-४ दिवसाची सुट्टी आहे. त्यांच्या तोंडून हे ऐकल्यावर तुमचा चेहरा हिरमुसला असणारचं, कारण दरवर्षी त्यांना Thanks Giving Day निमित्त सुट्टी मिळते. पण भारतात हा दिवस साजरा केला जात नाही त्यामुळे आपण बापुडे नेहमीप्रमाणे कामावरच जाणार ! तसं पाहायला गेलं तर आपल्या भारतीयांना या सणाबाबत फारशी माहिती नाही. तुमच्याही मनात प्रश्न निर्माण होतच असतील की Thanks Giving day नेमका का साजरा केला जातो? आपल्या सणांप्रमाणेच या सणादेखील काही महत्त्व आहे का? तुमच्या याच प्रश्नांची उत्तर या लेखाच्या माध्यमातून आम्ही सोडवत आहोत.
Thanks Giving Day म्हणजे परमेश्वराचे आभार मानायचा दिवस ! अमेरिकेमध्ये Thanks Giving Day ला इतर धार्मिक सणांप्रमाणेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. अमेरिकेमधील प्रत्येक घरामध्ये या दिवशी टर्की पक्षाचे मांस शिजवले जाते आणि खाण्यापिण्याची अगदी चंगळ असते.
या दिवशी गरिबांना घरी बोलावून खायला घालण्याची प्रथा आहे. तसेच समाजसेवी संस्थांकडून समाजहिताचे अनेक कार्यक्रम आयोजित केलं जातात आणि अमेरिकन नागरिक या कार्यक्रमांना स्वखुशीने मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात हे विशेष ! या दिवशी अमेरिकेमध्ये परेडचे आयोजन देखील केले जाते. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मॅकीज डिपार्टमेंटल स्टोर कडून १९२४ सालापासून Thanks Giving परेड आयोजित केली जाते. ही सर्वात मोठी Thanks Giving परेड म्हणून ओळखली जाते.
Thanks Giving Day चा अमेरिकन इतिहास:
१६२१ मध्ये Plymouth वसाहतदार आणि Wampanoag इंडियन्स यांनी मिळून autumn harvest feast म्हणजेच शरद ऋतूमध्ये पहिली मक्याची कापणी यशस्वी झाल्यानंतर एक मेजवानी आयोजित केली होती, हा सोहळा आजवरचा पहिला वहिला Thanks Giving सोहळा म्हणून ओळखला जातो. पहिल्या शेतीमधून यशस्वीरित्या पीक मिळाल्याबद्दल परमेश्वराचे आणि निसर्गाचे आभार मानण्यासाठी हा सोहळा ३ दिवस साजरा केला गेला.
पुन्हा १६२३ मध्ये मोठा दुष्काळ संपुष्टात आल्यानंतर याच वसाहतदारांनी दुसऱ्यांदा Thanks Giving सोहळा साजरा केला. त्यानंतर विविध वसाहतींनी आणि राज्यांनी आपापल्यापरीने सुमारे दोन दशके Thanks Giving सोहळा साजरा केला. अमेरिकन राज्यक्रांतीवेळी कॉंग्रेसने वर्षभरातून २-३ Thanks Giving Day साजरे करायचे असे जाहीर केले. १७८९ मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अमेरिकन सरकारच्या वतीने Thanks Giving Day ला अधिकृत सण म्हणून मान्यता दिली. या दिवसाच्या निमित्ताने अमेरिकेला मिळालेलं स्वातंत्र्य आणि संविधानाला मिळालेली मंजुरी या दोन गोष्टींसाठी परमेश्वराचे आभार मानावेत असा संदेश त्यावेळी जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अमेरिकन नागरिकांना दिला. १८१७ मध्ये Thanks Giving Day हा official Holiday घोषित करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले. दरम्यान प्रत्येक राज्य वेगवेगळ्या दिवशी Thanks Giving Day साजरा करत असे.
त्यानंतर १८६३ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी राष्ट्रीय Thanks Giving day साजरा करायचा असे घोषित केले आणि त्याला National Holiday चा दर्जा देखील मिळवून दिला.
यावेळी त्यांनी एक पत्रक जाहीर केले आणि त्यात आपण Thanks Giving day कोणत्या भावनेने साजरा करायचा ते स्पष्ट केले,
देवाच्या कृपेने आपण या सुंदर सृष्टीत आनंदाने जगत आहोत. आपल्यावर जेवढी संकटे येतात त्याला धैर्याने तोंड देण्याची शक्ती आपलं परमेश्वर आपल्याला देतो. पण त्याच दयावान परमेश्वराला आपण हळूहळू विसरत चाललो आहोत. पुन्हा एकदा या दिवसाच्या निमित्ताने एकत्र येऊया आणि पवित्र स्वर्गातून आपल्यावर कृपादृष्टी ठेवणाऱ्या परमेश्वराचे आभार मानूया.
सध्या Thanks Giving Dayचं फॅड जगभर पसरलयं. अमेरिकेसह कॅनडा, ग्रेनाडा, लिबेरिया, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, सेंट लुशिया, जर्मनी, जपान, यु.के. या देशांमध्ये देखील Thanks Giving Day साजरा केला जातो. फक्त प्रत्येक देशाची हा सोहळा साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आपल्या भारतातही गोव्यात अनेक ठिकाणी ख्रिश्चन बांधव Thanks Giving Day साजरा करतात.
—
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.