Site icon InMarathi

मुस्लीम कट्टरवादाचा चलाख वापर करून राम मनोहर लोहियांना हरवण्यासाठी काँग्रेसनं रचलेला डाव

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपल्याला माहीती आहेच की हा देश स्वतंत्र झाल्यापासून या देशावर येन केन प्रकारे एकाच घरण्यानं राज्य करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आणि ते घरानं म्हणजे गांधी घरानं आणि त्यांचा काँग्रेस पक्ष.

देशात लावलेली आणीबाणी असो किंवा जयप्रकाश नारायणांपासून ते राम मनोहर लोहीयापर्यंतच्या अगदी निस्वार्थी आणि देशभक्त महानुभवांची प्रताडना असो, काँग्रेस सत्तेसाठी कोणत्या कोणत्या थराला गेलीय हे इतिहास तर सांगतोयच शिवाय सर्वसामन्यांनादेखील ते सर्वश्रूत आहे.

आज काँग्रेसच्या अशाच एका आठवणीचा उजाळा आम्ही करत आहोत. घटना उत्तर प्रदेशमधील आहे. उत्तर प्रदेशमधील फर्रूखाबाद हा मतदारसंघ म्हणजे जेष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहीया यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. राम मनोहर लोहिया यांनी याच मतदार संघातून निवडणूक लढवली आणि खासदार झाले.

 

hindi.firstpost.com

जगाच्या नकाशावर भलेही फर्रूखाबादचं नाव झालं असेल परंतु आजही हा मतदारसंघ विकासापासून अनेको मैल दूर आहे. उत्तर प्रदेशचं गलिच्छ राजकारणानं या मतदारसंघाला कधीच उभारी येऊ दिली नाही.

राम मनोहर लोहिया हे असं नेतृत्व होतं की त्यांनी १९६३ साली फर्रूखाबादमध्ये केवळ दोन सभा घेतल्या आणि खासदारकी मिळवली. त्यावेळचे काँग्रेसचे खासदार पं.मूलचंद दूबे यांच्या मृत्यूनंतर १९६३ साली फर्रूखाबादमध्ये पोटनिवडणूक लागली आणि हीच निवडणूक जिंकण्यासाठी राम मनोहर लोहिया मैदानात उतरले. नुकतचं भारत चीन युध्ददेखील झालं होतं.

या युध्दात चीनकडून भारताला पराभव स्विकारावा लागला आणि ही सर्वस्वी काँग्रेसची जबाबदारी होती. लोकांचा काँग्रेसच्या विरोधात आक्रोश वाढत होता. आणि नेमक्या याच संधीचा फायदा राम मनोहर लोहिया यांनी घेतला आणि केवळ दोन सभा गाजवून त्यांनी खासदारकी मिळवली होती.

सुरूवातीला त्याच्या सोशालिस्ट पक्षामध्ये केवळ बोटावर मोजण्याएवढेच कार्यकर्ते होते. एवढं असूनही त्यांनी काँग्रेसच्या विरोधात दंड थोपटले आणि पहिली सभा त्यांनी शहरातल्या सरस्वती भवनात घेतली ज्यामध्ये जवळपास पाच हजारपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. त्यांनी याच सभेत आपल्यासाठी मतदान तर मागीतलंच शिवाय निवडणूकीच्या खर्चापोटी पैसेदेखील मागीतले लोकांनी लोहिया यांना भरभरून मदत केली.

या सभेनंतर अन्य प्रांतातील समाजवादी कार्यकर्ते फर्रूखाबादच्या दिशेने कूच करू लागले. लोहिया यांनी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून ठेवली. बघता बघता संपूर्ण फर्रूखाबादमध्ये लोहिया यांच्या नावाचा जयघोष होऊ लागला.

 

tribuneindia.com

देशभरातून बरेच समाजवादी कार्यकर्ते तोपर्यंत फर्रूखाबादमध्ये पोहोचले यामध्ये केरळची सरस्वती आपल्या तीन बहिनी एक भाऊ आणि वडीलांसमवेत फर्रूखाबादमध्ये दाखल झाली, लखनऊची हबीबा बानो असेल किंवा स्थानिक कार्यकर्ता श्यामा गुप्तांची पत्नी रमा देवी आणि नात्यांमधल्या अन्य स्त्रियांनी लोहियांच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

आपल्या लक्षात येईल की तेंव्हासुध्दा जनता काँग्रेसला किती वैतागली असेल. स्त्रियांचा विशेष सहभाग हा काँग्रेसच्या परावभवाला कारणीभूत झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सगळ्यांच्या अथक प्रयत्नानंतर राम मनोहर लोहियांनी काँग्रेसला हरवलं. हा पराभव नेहमीप्रमाणे काँग्रेसच्या जिव्हारी लागला आणि काँग्रेसनं समाजवाद्यांचा सफाया करण्याचं ठरवलं.

राम मनोहर लोहियांच्या यशानंतर सोशालिस्ट पार्टीनं उत्तर प्रदेशात चांगलाच जोर धरला होता. संपूर्ण उत्तर प्रदेशात सोशालिस्ट पार्टीचा प्रचार जोरात सूरू होता.

नंतर १९६७ साली पुन्हा लोकसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आणि यावेळेस मात्र काँग्रेस पार्टी पूर्ण तयारी करूनच मैदानात उतरली. यावेळी लोहिया यांच्या स्पष्टवक्तेपणाचा फायदा घेऊन त्याच हत्यारानं सोशालिस्टांचा सफाया करण्याचा बेत काँग्रेसनं आखला. १९६७ साली राम मनोहर लोहिया कन्नौज लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरले.

 

thewirehindi.com

प्रचारादरम्यान एका पत्रकार परिषदेत काँग्रेसने पेरलेल्या एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला की,

“मुस्लिम धर्मातल्या चार पत्नि ठेवण्याच्या परंपरेबद्दल आपलं मत काय?”

लोहिया यांनी त्यांच्या बाण्याप्रमाणे सरळसोट उत्तर दिलं-

“जर महिलेनं पतीव्रता राहावं असं लोकांना वाटत असेल तर पुरुषांनी देखील पत्निव्रता राहिलं पाहिजे.”

त्यामुळे बहुपत्नित्वाला त्यांनी विरोध असल्याचं स्पष्टपणे जाहीर करून टाकलं. आणि नेमकी इथेच माशी शिंकली. जो मुस्लिम बहूल समाज सोशालिस्टांच्या मागे होता तो त्यांच्या एका वक्तव्यांनं त्यांना सोडून गेला. परिणामी अलाहाबादपासून ते बरेलीपर्यंत सोशालिस्ट पार्टीचा सफाया झाला.

भले त्या निवडणूकीत लोहिया जिंकले असतील मात्र त्यांच्या सोशालिस्ट पार्टीचा अस्त इथूनच सूरू झाला. परिणामी काँग्रेस पुन्हा नव्या जोमानं उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय झाली.

आपण जर वेळोवेळीचा इतिहास चाचपला तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेसनं कशा प्रकारे गांधी घरण्याला राजकीय संकटांपासून वाचवलं मग त्यामध्ये कितीहा बळी गेले तरी चालतील अशी काँग्रेसची निती होती. आणि त्यांच्या याच गनिमी काव्यातून राम मनोहर लोहियांसारखा नेताही सुटू नये हेच या भारतीय राजकारणाचं दुर्दैव.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version