Site icon InMarathi

“मी तुला चांगला मित्र समजते रे” : हे काही मुलांच्या नशिबातच असतं का? कुठे चुका होतात? समजून घ्या

frinedzoned inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

माझ्यासमोर बसलेला तो अठरा-एकोणीस वर्षांचा मुलगा असेल. अत्यंत फ्रस्ट्रेट झाला होता. तावातावाने बोलत होता.

“प्रत्येक वेळेस मला जी मुलगी आवडते ती माझ्याबरोबर डेटवर यायला नकार देऊन तू माझा फक्त चांगला मित्र आहेस असं म्हणते. काही महिन्यांपूर्वी मी एका मुलीला भेटलो. आम्ही एकमेकांबरोबर पुरेसा वेळ घालवला. एकमेकांचे चांगले मित्र झालो.

“आज जेव्हा मी तिला डेटवर जाण्याबद्दल विचारलं तर ती म्हणाली, तू माझा चांगला मित्र आहेस आणि कायम राहशील.”

 

theshrinkonyourcouch.com

 

पण त्यापुढे जाऊन आपल्यात काही नाहीये आणि नसेल. माझ्या कळण्याच्या पालिकडे गेलं हे. हे आजचंच नाही. या आधी सुद्धा असं माझ्याबरोबर दोनदा झालंय.

मला एखादी मुलगी आवडायला लागली आणि मी तिला तसं सांगून एक स्टेप पुढे जायचा प्रयत्न केला की ती मला फ्रेंड झोन्ड करून टाकते. पण का? नेमका प्रॉब्लेम कुठे आहे?

बरं आणखी एक, मलाही एकाच टाईपच्या मुली आवडतात. बारीक, लांब केस असलेल्या, उंच. मला माहित नाही का, पण अशा मुलींकडे मी नेहमी आकर्षित होतो. डॉक्टर माझं काही चुकतंय का?

 

twiniversity.com

 

माझं म्हणजे त्या हम तुम मधल्या गाण्यासारखं झालंय.

‘हम अच्छे दोस्त हैं,
पर उस नझर से तुमको देखा नहीं,
वो सब तो ठीक हैं,
पर उस बारे मैं मैने सोचा नही’

सेम… मला माझं आयुष्य, मला आवडणाऱ्या प्रत्येक मुलींशी फ्रेंड झोन्ड होऊन काढायचं नाहीये डॉक्टर. माझी पण काही स्वप्नं आहेत. मी काय करू?”

माझ्याकडे अशी टीन एज मधली मुलं येतात तेव्हा बऱ्याचदा प्रेमळ स्वभावाच्या या मुलांना मुलींकडून नकार मिळालेला असतो आणि फ्रेंड झोन्ड केलेलं असतं. त्यामुळे या वयोगटातील मुलं कित्येकदा माझ्यासमोर बसून त्यांचं मन मोकळं करत असतात.

मी त्याला म्हटलं,

“बरं आपण चांगल्या गोष्टीपासून सुरुवात करूयात. मला कळतंय की तुझी चिडचिड होतेय. पण तुझ्या एक लक्षात येतंय का की याचाच अर्थ असा आहे की तुझ्यात एक चांगला मित्र होण्याची क्षमता आहे.

ही फारच चांगली गोष्ट आहे.

तुझं मुलींसोबत bonding चांगलं होतं आणि त्यांना तू मित्र म्हणून हवासा वाटतोस. आता तुझ्या प्रश्नाकडे जाऊ.

 

 

तुला आवडणाऱ्या मुली तुझ्याकडे फक्त मित्र म्हणून बघत असतात आणि त्यापेक्षा जास्त गंभीरपणे त्या तुमच्या नात्याकडे पाहत नाहीत.

तुला याबद्दल आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. यामागे बरीच कारणं असू शकतात.

मी काही शक्यता मांडतो.

तू मुलींनी दिलेल्या hints कडे लक्ष देतोस का? कदाचित त्या त्यांच्या वागण्याबोलण्यातून तुला त्या तुझ्यात मैत्रीपलीकडे interested नसल्याचं सुचवत असतील. पण तू ते signals लक्षपूर्वक घेतले नसशील.

जर त्यांच्यातली कोणी तुला तू मला माझ्या भावासारखा वाटतोस असं म्हणाली असेल तर याचा अर्थ ती तुझ्याशी त्या व्यतिरिक्त मैत्रीपलीकडे जाऊन काही नातं ठेऊ इच्छित नाही हे तू समजून घ्यायला हवं होतंस.

कदाचित तू त्यांच्याकडे जसा शारीरिकदृष्ट्या आकर्षित झालास तशा त्या तुझ्याकडे झाल्या नसतील.

 

 

तुझ्या डोक्यात तुला आवडणाऱ्या मुलींचा एक टाईप आहे तसाच त्यांच्या डोक्यात त्यांना आवडणाऱ्या मुलाचा टाईप असेल आणि कदाचित तू त्यात बसत नसशील, असंही असू शकतं ना?

बरं तू या सगळ्यात तुझ्या वाढीकडे, ग्रूमिंगकडे पुरेसं लक्ष देतोयस का? मुलींच्या मागे लागून स्वतःच्या प्रकृतीची तू हेळसांड करत असशील तर ते खूप चुकीचं आहे असं मला वाटतं.

बरं तुला desperately girlfriend का हवीय? म्हणजे इतर मित्रांना आहे म्हणून, कॉलेजमध्ये आहेस तर ती हवीच म्हणून, की आणखी काही?

जर असं असेल तर तू यावर काम करायला हवंस.

मी कितीतरी मुलांशी बोललोय. त्यांच्यासाठी हा निर्णय हा आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण ठरलाय.

तू तुझ्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीला, जिच्यात तुला मैत्रीपलीकडे रस नाही अशा मुलीला विचारू शकतोस की, मुली मला नाकारतात याचं कारण काय असू शकतं.

 

कदाचित एक मुलगी म्हणून ती तुला अजून काही insights देऊ शकते.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, इतर मैत्रिणींशी बोललास की तुला आवडणाऱ्या मुलींना तू फक्त मित्र का वाटतोस या प्रश्नाचं उत्तर मिळेल.

शिवाय तू तुला आवडणाऱ्या मुलींचा टाईप जरा वाढवून बघ. कदाचित एखादी त्यात न बसणारी मुलगी तिच्या इतर characteristics मुळे तुला आवडू शकते.

 

 

शिवाय तू काही जणींना फ्रेंड झोन्ड केलं असशील तर ते का? याचाही विचार कर. या सगळ्याचा विचार केल्यावर तुला नात्याबद्दल खूप काही शिकायला मिळेल.

अजून एक गोष्टं लक्षात घे – तू फक्त १९ वर्षांचा आहेस. तू अजून जग पाहिलं नाहीयेस.

पुढे जाऊन तुला अजून वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या आवडीनिवडी असलेल्या मुली भेटतील.

कदाचित त्यातली एखादी तुला त्या अर्थाने क्लीक होईल. तुझ्या प्रत्येक मैत्रिणीला भावी नवरा म्हणून तू आवडणार नाहीस आणि तुझी भावी वधू म्हणून तुला प्रत्येक मैत्रीण आवडणार नाही.

पण तरीही तुम्ही चांगले मित्र-मैत्रीण असूच शकता आणि यात काहीच गैर नाही.

 

photos.filmibeat.com

 

जर तू मित्र म्हणून चांगला असशील, विश्वासार्ह असशील तर प्रेमाच्या नात्यांची सुरुवात चांगल्या मैत्रीपासूनच होते हे लक्षात ठेव. म्हणजे तू अर्धा रस्ता पार केलायस.

तुला या रस्त्यावरून डोळे उघडे ठेवून चालण्यासाठी शुभेच्छा. ही प्रोसेस गुंतागुंतीची असते खरी, पण तेवढीच आनंददायी, खूप काही शिकवून जाणारी सुद्धा असते.

पण या वाटेवर चालताना काही चांगले मित्र-मैत्रिणी असणं हे खूप महत्त्वाचं असतं. ते तुला कायम सोबतच करतात.” मी म्हटलं.

त्याला पटलं असावं. तो विचारमग्न अवस्थेत उठून दाराच्या दिशेने चालू लागला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत माझ्या टीनएजच्या दिवसांत हरवून गेलो. नेहमीसारखाच… पुन्हा एकदा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version