सावधान, हे १० पदार्थ सर्रास फ्रिजमध्ये ठेऊन आपण स्वतःचंच नुकसान करून घेतोय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सर्वसाधारणपणे थंड वातावरण हे खाद्यपदार्थांच्या साठवणुकीसाठी जास्त सुरक्षित आणि आरोग्यदायी असते. कमी तापमानात अन्नाचा नाश करू शकणारे सूक्ष्मजीव आणि जीवाणू वाढू शकत नाहीत. हे बहुतांशी खरं असलं तरीही आपल्यापैकी बहुतेक जण हाच नियम सर्व भाज्यांसाठी किंवा खाद्यपदार्थांसाठी लागू करतात.
कोणत्या खाद्यपदार्थाची साठवणूक कुठे करावी हे त्या त्या खाद्यपदार्थावर अवलंबून आहे.
काही पदार्थ थंड हवेत साठवणे गरजेचे असते तर काही उबदार जागी ठेवणे फायद्याचे असते. पुढे दिलेले काही पदार्थ आपण कुठे ठेवावेत हे माहीत नसल्याने चुकीने फ्रीजमध्ये साठवतो. पण ते त्यापेक्षा इतर ठिकाणी ठेवलेले चांगले असतात.
१. टोमॅटो :

न पिकलेले टोमॅटो हे सर्वसाधारण तापमानावर (रूम टेम्परेचर) ठेवले जावेत. यामुळे ते पिकत असताना ते अधिक चविष्ट आणि रसाळ होतात. खूप थंड वातावरणात ते तितके चांगले पिकत नाहीत. एकदा ते पूर्ण पिकले की तुम्ही ते फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवू शकता.
पण फ्रीजमध्ये ठेवलेले टोमॅटो वापरण्यापूर्वी किमान अर्धा तास ते बाहेर काढून ठेवावेत.
२. कांदे:

न सोललेल्या कांद्याला टिकण्यासाठी हवेशीर जागी ठेवण्याची गरज असते. ते जर फ्रीजमध्ये ठेवले तर ते आर्द्रतेमुळे, दमटपणामुळे कुजू शकतात किंवा मऊ पडू शकतात.
पण कापलेला कांदा मात्र कायम फ्रीजमध्ये झाकून ठेवावा.
३. काजू आणि सुकामेवा:

आपल्यापैकी कितीतरी जण काजू आणि सुकामेवा खवट होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात?!
पण खरंतर ह्यामुळे फायदा कमी आणि तोटा अधिक होतो.
फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे सुक्यामेव्याचा खुसखुशीतपणा आणि nutty flavor कमी होतो. शिवाय फ्रीजमधल्या इतर पदार्थांचा वास त्यांना लागायची शक्यता असते. या ऐवजी सुकामेवा हा हवाबंद पिशवीत बाहेर ठेवावा.
४. लसूण:

जर तुम्ही लसूण फ्रीजमध्ये ठेवलीत तर तिला मोड यायला लागतात आणि ती चामट होते. त्यापेक्षा ती एखाद्या थंड आणि कोरड्या जागी ठेवावी.
५. तुळस:

तुम्ही तुळशीची पाने फ्रीजमध्ये ठेवता का? असं करून तुम्ही त्यांचा “गोडसर सुगंध” मारत आहात.
फ्रीजमधील थंड वातावरण ही पानं कोरडी करतं. ही पानं ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ही पानं पाण्याच्या जारमध्ये भिजवून ठेवावीत.
६. बटाटे:

बटाटे हे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसते. त्यापेक्षा ते जाळीच्या पिशव्यांमध्ये ठेवावेत.
जर तुम्ही ते थंड जागी ठेवलेत तर त्यातील स्टार्चचे रूपांतर शर्करेत होते. शक्यतोवर ते प्रकाशात ठेऊ नका आणि वापरण्यापूर्वी धुवून साठवू नका.
७. मध:

मध फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसते. तो बाहेर ठेवला तरीही पातळ आणि ताजा राहू शकतो. फक्त तो हवाबंद डब्यात ठेवावा. उलट तो फ्रीजमध्ये ठेवल्याने घट्ट होतो.
८. ऑलिव्ह ऑइल:

तुम्ही ऑलिव्ह ऑइल, खरं तर कुठलंच तेल फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. फ्रीजमध्ये ते घट्ट होतं. हे खासकरून खोबरेल तेलाबद्दल अधिक प्रमाणात होतं. त्यापेक्षा तेल तुमच्या स्वयंपाकघरात थंड ठिकाणी गॅसपासून दूर ठेवा.
९. कलिंगड किंवा खरबूज :

Journal of Agricultural and Food Chemistry या मासिकात छापून आलेल्या एका संशोधनानुसार, कलिंगड किंवा खरबूज हे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांच्यावर चिलिंग इफेक्ट होऊन त्यातील पोषकद्रव्ये कमी होऊ शकतात.
त्यामुळे ती कापण्यापूर्वी फळांच्या बास्केटमध्ये ठेवावीत आणि कापल्यावर लगेच खावीत.
१०. ब्रेड किंवा पाव:

तुम्ही आजवर उरलेला पाव किंवा ब्रेड हा फ्रीजमध्ये ठेवत आला असाल पण ते योग्य नाही. यामुळे तो चामट होऊ शकतो. थंडपणा आणि आर्द्रतेमुळे तो लवकर शिळा होऊ शकतो.
त्यामुळे फ्रीज हा सगळ्याच गोष्टी साठवण्यासाठी योग्य नाही. तर काही गोष्टी सामान्य खोलीच्या तापमानात ठेवल्याने सुद्धा त्यांची गुणवत्ता योग्य राखण्यास मदत होते.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.