' या तुरुंगात कैदी बनून जाण्यासाठी चक्क पैसे भरावे लागतात! – InMarathi

या तुरुंगात कैदी बनून जाण्यासाठी चक्क पैसे भरावे लागतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुरुंग ही अशी जागा जिथे गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा भोगायला पाठवलं जातं. अश्या ठिकाणाचा विचार तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणूस स्वप्नातही करणार नाही. आपण तुरुंग पाहतो तो केवळ चित्रपटांमध्येचं किंवा कमनशीबवान असू तर जवळच्या कोणा महाभागाच्या कृपेने तुरुंग बाहेरून पाहायला मिळतो. पण समजा तुम्हाला आम्ही म्हणालो की भारतात असा एक तुरुंग आहे जेथे केवळ ५०० रुपये भरून तुम्ही तुरुंगातील जीवन कसं असतं ते अनुभवू शकता. तर तुम्ही अश्या तुरुंगाला भेट द्याल का?

fel-the jail-marathipizza

स्रोत

तेलंगणाच्या मेडाक जिल्ह्यातील संगारेड्डी गावामध्ये २२० वर्षे जुनं एक सेन्ट्रल जेल आहे. ज्याच रुपांतर आता एका म्युझियममध्ये करण्यात आलं आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे ‘Feel The Jail’ नावाची एक योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत दिवसाचे ५०० रुपये भरून पर्यटक कैद्याचे जीवन उपभोगू शकतात. पैसे भरून जेलमध्ये प्रवेश केला की तुम्हाला खादीपासून बनविलेले कैद्याचे कपडे, स्टीलची प्लेट आणि ग्लास, एक मग, हात धुवायचा साबण, अंघोळीचा साबण, एक गोधडी आणि जेल मॅन्यूअल प्रमाणे इतर गोष्टी दिल्या जातात.

sangareddy-jail-marathipizza01

स्रोत

जेवणामध्ये चहा आणि दुधासह जेल मेन्यूमध्ये असलेले पदार्थ वाढले जातात. जेवणामध्ये चपाती, भात, वाटण्याची उसळ, लाल डाळ, रसम, करी आणि दही या पदार्थांचा समावेश असतो. पर्यटकांना येथे जरी कैद्याचं जीवन अनुभवायला मिळत असले तरी त्यांना कैद्यासारखी वागणूक मात्र देत नाही. येथे पर्यटकांकडून कोणतही कष्टाचं काम करवून घेतलं जात नाही, परंतु त्यांना आपल्या कोठडीची साफसफाई करावी लागते आणि काही वेळ झाडे लावण्यासाठी काम करावे लागते.

feel-the jail-marathipizza01

स्रोत

जर तुम्हाला या नाविन्यपूर्ण योजनेचा अनुभव घ्यायचा असेल तर तेथे जाण्यापूर्वी संगारेड्डी जेल कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो, त्यानुसार ते आधीच सर्व व्यवस्था करून ठेवतात.

sangareddy-jail-marathipizza02

स्रोत

काय मग जाणार का जेलची हवा खायला???

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?