Site icon InMarathi

होय! WhatsApp वरचे डिलीट केलेले मेसेज वाचणे सहज शक्य आहे ! कसे? वाचा

wtsapp-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

WhatsApp, जगातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या मेसेंजिंग अँप्स पैकी एक आहे. Whatsapp शिवाय राहणारी मंडळी सहजासहजी शोधून सापडणार नाहीत. कारण तो आजच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला  आहे.

 

हे ही वाचा – मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं? टेन्शन घेण्यापेक्षा हे वाचा

पण, यातच एखादा मेसेज चुकीच्या ग्रुपवर किंवा चुकीच्या व्यक्तीला पाठवला जाऊ शकतो. WhatsApp वापरतांना समजा एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला चुकीचा मेसेज नजर चुकीने सेंड झाला तर त्यामुळे व्यक्तीची खूप नाचक्की होत असे.

त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून WhatsApp ने डिलिट फॉर एव्हरीवन नावाचं फिचर लाँच केलं.

यामुळे नजरचुकीने पाठवलेला मेसेज डिलिट करणं पाठवणाऱ्याला शक्य झालं. पण हे सर्व ७ मिनिटाच्या आतच केलं गेलं पाहिजे. अशी अट मात्र होती. मात्र नंतर ही वेळ वाढवण्यात आली आहे.

आज एखादा मेसेज डिलीट करण्यासाठी ६८ मिनिटं आणि १६ सेकंदांचा कालावधी मिळतो.  एवढा अधिक वेळ मिळणं सोयीचं सुद्धा आहे आणि गैरसोयीचं सुद्धा!! म्हणजे एखादा मेसेज डिलीट करायला तुम्हाला वेळ जास्त मिळतोय तसं इतरांना तो मेसेज वाचण्यासाठी मिळणारा वेळ सुद्धा वाढला आहे.

परंतु आता काही ट्रिक्स व तंत्रज्ञानाच्या मदतीने हे डिलिट झालेले मेसेज बघता येणं शक्य झालं आहे.

स्पॅनिश अँड्रॉइड ब्लॉग अँड्रॉइड जेफेने केलेल्या दाव्याअनुसार डिलिट केलेले मेसेज फोनच्या लॉग मध्ये सेव्ह असतात.

 

 

त्यामुळे मेसेज प्राप्तकर्ता पाठवलेला मेसेज जरी पाठवणाऱ्याने डिलिट केला असेल तरी पाहू शकतो. अँड्रॉइड सिस्टमच्या नोटिफिकेशन रजिस्टरमध्ये हे मेसेज सेव्ह केलेले असतात. त्यामुळे ते रेकॉर्डस् चेक केल्यावर आपल्याला डिलिट केलेले मेसेज सुद्धा सहज वाचता येऊ शकतात.

डिलिट केलेले मेसेज कसे वाचणार?

ब्लॉगच्या म्हणण्यानुसार नोटिफिकेशन हिस्ट्री नावाच्या एका थर्ड पार्टी अँपच्या मदतीने कोणीही या डिलिट केलेल्या मेसेजला सहजरित्या उघडू व वाचू शकतो. हे अँप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे.

अँप डाउनलोड केल्यावर वापरकर्त्याला नोटिफिकेशन लॉगमध्ये जाऊन मेसेज शोधावा लागणार. नोवा लॉन्चर सारख्या अँप्सचा वापर करणाऱ्या व्यक्तीला हे अधिक सोपं होतं.

 

 

कुठल्याही अँपशिवाय नोटिफिकेशन लॉग वापरण्यासाठी एक पद्धत आहे.

होम स्क्रिनला जोर लावून दाबा, त्यातल्या विजेेट्सवर क्लिक करा. त्यात ऍक्टिव्हिटिज, मग सेटिंग आणि त्यातल्या नोटिफिकेशन लॉग मध्ये जा.

काही अँड्रॉइड फोन मध्ये नोटिफिकेशन लॉग मध्ये जाण्यासाठी विजेट उपलब्ध असते.

थर्ड पार्टी अँप व वरील ऍक्टिव्हिटी प्रत्यक्ष करून बघितल्यावर अनेकांना ते डिलिटेड मेसेज खरंच वाचता आले. परंतु त्यात तेच मेसेज होते ज्यांचा समावेश फोन वरील नोटिफिकेशन मध्ये होता.

नोटिफिकेशन लॉग मध्ये तितकेच मेसेज दिसतात जेवढे नोटिफिकेशन बार मध्ये स्वीप करण्याआधी दिसतात. जर आपण मोबाइल रिस्टार्ट केला तर मात्र आपला नोटिफिकेशन लॉग क्लीयर होतो.

या ट्रिकची पण एक मर्यादा आहे. यात मेसेजचे फक्त १०० अक्षरं दिसतात. त्यापेक्षा अधिक दिसत नाहीत.

हे फिचर फक्त अँड्रॉइड 7.0 व त्याचावरच्या अँड्रॉइड फोन्समध्ये असतं. यात फक्त टेक्स्ट मेसेज पुन्हा बघता येतो. मीडिया फाईल मात्र पुन्हा बघता येत नाहीत.

 

हे ही वाचा – सावधान! मोबाईल सॅनिटायझरने स्वच्छ करताय? थांबा; आधी हे वाचा, नाहीतर….

हे काही पहिल्यांदा नाही की कोणी WhatsApp चे डिलिटेड मेसेज बघू शकतो. याआधी गेल्यावर्षी जोनाथन जधीरसकी नावाच्या iOS एक्सपर्ट ने दावा केला होता की WhatsApp डिलिट केलेला डेटा पण डिव्हाईसमध्ये सेव्ह करून ठेवते त्यामुळे डिलिट केलेले मेसेज बघणं सहज शक्य आहे.

त्यामुळे तुम्ही डिलिट केलेले अथवा स्वाईप केलेले मेसेज बघून वाचणं सहज शक्य आहे. अँड्रॉइड जेफेची पद्धत ही जास्त चांगली व सोपी आहे.

यामुळे तुम्ही एखादा डिलिटेड मेसेज तर वाचू शकतातच. त्यासोबत तुम्ही टायपिंग करताना सावधानता बाळगणं सुरू कराल व एखादा चुकीचा संदेश शेयर करणं टाळू शकाल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version