Site icon InMarathi

आईच्या गर्भात असताना बाळ काय काय अनुभवते ? जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आईच्या पोटात जेव्हा गर्भ वाढत असतो तेव्हा त्याचे पडसाद त्याची आई सोडली तर बाह्य जगावर कुठल्याही प्रकारे जाणवत नाहीत. आईला पोटात फिरणाऱ्या गर्भाच्या जाणीवा नेणीवा हर एक क्षणाला होत राहतात. यासाठीच तर म्हटलं जात गर्भाची नाळ गर्भात असेपर्यंत आईशी जोडलेली असते आणि बाहेर आल्यावर जेव्हा ही नाळ तोडली जाते त्यावेळी गर्भ हा समाजाशी एक व्यक्ती, एक माणूस म्हणून जोडला जातो.

मात्र जेव्हा बाळ गर्भात असते तेव्हा खरेच का त्याच्या जाणीवा आणि नेणीवा तितक्या विकसित असतात ?

खरेच का त्याला पंचेद्रीयांचे ज्ञान असते? गर्भात सुद्धा बाळ बाहेर चाललेल्या घडामोडी ऐकू शकते का? ते पाहू शकते का? त्याच्या संवेदना कितपत जागृत राहतात? यावर अनेकदा जगात अनेक ठिकाणी संशोधन चालू असते.

 

mindblowing-facts.org

गर्भात असणारे बाळ पाहू शकते का? या विषयी नुकतेच युनाईटेड किंग्डम येथील लँकेस्टर युनिवर्सिटी च्या शास्त्रज्ञांनी काही संशोधनात्मक प्रयोग केले.

खरे पाहता आत्तापर्यंत गर्भात असलेले बाळ ऐकू शकते का? अथवा त्याला बाहेरच्या जगाच्या घडामोडींचे काही ज्ञान असते का विषयी भरपूर संशोधन झालेले आहे मात्र गर्भात असलेले बाळ पाहू शकते का याविषयी जास्त काही संशोधन झालेले नाही. लहान बाळ जन्मल्यानंतर त्याच्या विषयी आणि त्याच्या ऐकण्या, बोलण्या अथवा बघण्याच्या क्षमता पडताळून पाहण्यासाठी अनेक प्रयोग केले आहेत आणि अजूनही केले जावू शकतात परंतु बाळ गर्भात असताना ते पाहू शकते का याविषयी प्रयोग करायला आजपर्यंत फारशी कुणी तसदी घेतलेली नाही.

याबाबत लँकेस्टर युनिवर्सिटी च्या शास्त्रज्ञांनी एक अभिनव प्रयोग केला. यामध्ये तब्बल ३९ गर्भांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मुख्य हेतू गर्भाची पाहण्याची क्षमता गर्भात असताना कितपत विकसित झालेली असते हे पाहणे होता.

या प्रयोगात सामील झालेल्या गर्भाचे वय अंदाजे २३२ ते २५४ दिवसांचे होते. अर्थात जेव्हा ही सर्व बाळे आईच्या उदरात होती तेव्हा त्यांची दृष्टी कितपत आहे हे तपासून पाहताना त्यांना आणि त्यांच्या आयांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण क्रमप्राप्त होते.

त्यासाठी संशोधकांनी साधारणपणे मानवी चेहऱ्याचा आकार दिसेल असे तीन ठिपके त्रिकोणाकृती आकारात जोडून अशा स्वरूपाची लाईट मानवी मातेच्या उदरावर पडेल अशी व्यवस्था केली. यामध्ये सदर प्रकाश पडला असता गर्भाची प्रतिक्रिया काय आहे हे आजमावण्यासाठी 4D Ultrasound technology चा वापर केला गेला.

 

Foetus ultrasound

ज्यावेळी तीन ठिपके एका विशिष्ट आकारात बांधून गर्भाला दाखवले गेले तेव्हा त्याला त्यांनी प्रतिसाद दिला. याउलट अगदी तसेच तीन ठिपके इतस्त: विखुरलेल्या आकारात जेव्हा पुन्हा एकदा लाईट च्या द्वारे गर्भाला दाखवले गेले त्यावेळी त्या गर्भानी कसलाही प्रतिसाद दिला नाही.

या संशोधनामुळे गर्भ अगदी जन्माला येण्यापूर्वी सुद्धा विशिष्ट प्रकारच्या आकृतीबंधाना प्रतिसाद देवू शकतो या निष्कर्षाप्रत संशोधक आलेले आहेत.

याचा अर्थ आकार ओळखण्याची क्षमता गर्भावस्थेपासून विकसित होत असते असे म्हणण्यास वावं आहे. जन्मल्यानंतर बाळांना त्यांच्या पाळण्यात मधोमध झुलणारा खेळणा बांधून ठेवतात. हलत्या वस्तूंकडे एकटक पाहत बाळ खेळत राहते अथवा पाहता पाहता ते झोपी जाते.

या त्याच्या जाणीवा अगदी गर्भावस्थेत असल्यापासून उत्क्रांत होत असतात हे या संशोधनाने सिद्ध होण्यास वाव राहतो.

यापूर्वी कधीही गर्भाच्या पाहण्याच्या क्षमतेवर संशोधन झाले नसल्याने ह्या संशोधनाला महत्व आहे. यामध्ये मजेशीर गोष्ट अशी की जेव्हा गर्भ विकसित होत असतो त्यावेळी दृष्टी ही अगदी शेवटच्या टप्प्यावर विकसित होणारी गोष्ट असते. गर्भाचे डोळे गर्भ तयार होण्याच्या अवस्थेमध्ये बराच काळ बंद अवस्थेमध्ये राहतात. ज्यावेळी ७ महिने वगैरे पूर्ण होतात त्यावेळी गर्भाचे डोळे उघडले जातात.

त्यामुळे अगदी जन्म घेण्याच्या अगोदर काही आठवडे गर्भाची दृष्टी विकसित झालेली असते आणि गर्भ बाहेरचे वातावरण पाहू शकतो.

 

shalom690.com

मात्र हे पाहणे कितपत असते अथवा त्याच्या क्षमता काय असतात? जर गर्भ पाहू शकत नसेल अथवा कसलाच प्रतिसाद देत नसेल तर जन्मजात आंधळेपणाची करणे गर्भावास्थेमध्ये शोधून त्यावर उपचार करता येवू शकतात का या शक्यतांवर संशोधक विचार करत आहेत. असे झाले तर जन्मजात आंधळेपणा हा कुठल्याही मुलाच्या वाट्याला भविष्यामध्ये येणार नाही ही शक्यता वास्तवात उतरू शकते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version