आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
डेटिंग ट्रेंड्स पूर्णपणे बदलले आहेत. जे दोन-चार वर्षांपूर्वी खूप सोपं वाटायचं ते आज कठीण वाटायला लागलंय. बुजरा स्वभाव असणं ह्यात काही गैर नसलं तरी अशा स्वभावामुळे काही मुलांना मुलींशी बोलताच येत नाही.
मुली समोर आल्या की अशी मुलं मुलींच्या नजरेला नजर देऊन बोलू शकत नाहीत. त्यांना मुलींशी मैत्री करता येत नाही.
याचा संबंध फक्त लाजाळू किंवा बुजरा स्वभाव असण्याशी नाहीये. तर याचा संबंध मुलांना असलेल्या नकाराच्या भीतीशी आहे.
मुलांना आपला हा स्वभाव बदलता येऊ शकतो का? आणि त्यांना आवडत असणाऱ्या मुलींशी ही मुलं बोलू शकतात का?
थोडे प्रयत्न केले तर ही गोष्ट तितकी कठीण नाही. याप्रकारे कोणताही मुलगा मुलीशी सहजपणे बोलू शकतो कारण बहुतेक वेळेस असा स्वभाव हे starting trouble असतं. मुलींशी बोलणं अवघड जात असेल तर अशा वेळी काय कराल?
स्वतःला ओळखा:
जर तुम्हाला सतत मी इतरांपेक्षा कमी आहे असं वाटत राहिलं तर तुम्ही तुमचा बुजरा स्वभाव कधीच सोडणार नाही. ही तुम्ही स्वतःला जोखण्याची आणि तुमचा आत्मविश्वास ढळू न देण्याची परीक्षा असते.
उदाहरण द्यायचं झालं तर, तुम्ही तीन मुलींबद्दल विचार करत असता. एक दिसायला खूप सुंदर असते, दुसरी मध्यम असते आणि तिसरी दिसायला जराशी डावी असते. तुम्ही कोणत्या मुलीला विचाराल?
तुम्ही तिसऱ्या मुलीला विचारायचा विचार कराल. कारण तुम्ही स्वतःला कमी लेखत असता आणि तुम्ही स्वतःच स्वतःला पहिल्या दोन्ही मुलींनी हो म्हणावं या लायकीचे मानत नाही.
–
- हे वाचाल, तर वाचाल! स्त्रियांशी संभाषण करताना उपयोगी पडतील अशा खास आयडिया
- “मी तुला चांगला मित्र समजते रे” : हे काही मुलांच्या नशिबातच असतं का? कुठे चुका होतात? समजून घ्या
–
तुम्हाला त्या दोघीही नकारच देतील हे तुम्हीच ठरवलेलं असतं. तुमचा हा दृष्टीकोन तुम्ही बदलायला हवा. जर तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला पहिल्या मुलीला विचारताना सुद्धा मनात शंका नसेल. मुलींना अशी मुलं आवडतात ज्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असतो आणि ज्यांचं व्यक्तिमत्त्व उत्साही असतं.
कित्येकदा मुली दिसण्यापेक्षा या स्वभावाला जास्त महत्त्व देतात. प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसत नाही आणि तरीही कोणाला ती आवडू शकते. त्यामुळे स्वतःच्या दिसण्याचा एवढा बाऊ न केलेलाच चांगला.
तुमच्या कोशातून बाहेर पडा:
तुम्ही इतरांपेक्षा कमी आहात या विचारातून बाहेर पडा. तुमच्या असुरक्षिततेतून बाहेर पडण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे तुम्ही इतरांपेक्षा कमी आहात या विचारांना थारा न देणं. तुमचा मेंदू हे एक प्रभावी हत्यार आहे. त्यामुळे त्याचा योग्य तो वापर करून घ्यायला तुम्ही शिकलं पाहिजे.
वास्तववादी अपेक्षा ठेवा:
ज्या मुलीला तुमच्यात रस आहे तिच्याशी बोलताना गोष्टी उगाचच अवघड करून बोलू नका.
ती फक्त तुमच्याशी बोलत असेल आणि तुमच्या मात्र डोक्यात मात्र तिच्याबद्दल काही वेगळंच असेल असं करू नका. गोष्टी सहजपणे फ्लोमध्ये जशा घडतील तशा घडू द्या. खूप जास्त अपेक्षा असल्या की अपेक्षाभंगाचं दुःख जास्तच होतं.
खूप मुलींशी बोला:
तुम्ही स्वतःबद्दल चांगला विचार करायला लागलात की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणापेक्षा कमी नाही.
मग तुम्ही मुलींशी बोलायला लागा. प्रत्यक्ष बोलण्याची भीती वाटत असेल तर भीड चेपण्यासाठी त्यांच्याशी ऑनलाइन चॅटिंग सुद्धा करू शकता. मात्र अशावेळी मुलींना तुमची भीती वाटेल, तुमच्याशी बोलण्याचं दडपण वाटेल असे बोलायला जाऊ नका.
आजकाल यासाठी असलेले सोपे मार्ग म्हणजे फेसबूक, इन्स्टाग्राम, टिंडर आणि बम्बल आणि यापुढे जाऊन तुम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतलेत तर whatsapp आणि telegram सारखी अॅप्स. या माध्यमातून तुम्ही एकमेकांना भेटण्याच्या आधी जाणून घेऊ शकता.
मुली जास्त प्रमाणात असतील अशा ठिकाणी जात जा :
एकदा व्हर्चुअली मुलींशी बोलण्याचा विश्वास वाढला की मग मुलींना भेटायला लागा. तुम्ही यासाठी एखाद्या क्लब मध्ये नियमितपणे जाऊ शकता. अशावेळेस तुमचे मित्र तुमची मुलींशी ओळख करून देण्यात पुढाकार घेऊ शकतात.
संवाद सुरू करताना काही ठराविक प्रश्नांनी एकदा सुरुवात केलीत की तुम्ही या भूतलावरच्या कोणत्याही विषयावर चर्चा करू शकता, अर्थात समोरच्या व्यक्तीचा इंटरेस्ट बघून.
विविध मुलींशी बोला. खरोखरंच एखाद्या मुलीच्या प्रेमात पडल्याशिवाय एकाच मुलीवर अडकून राहू नका. तुम्ही स्वतः प्रत्येक बोलण्यात पुढाकार घेण्यात आग्रही राहिलात तर कालांतराने तुमचा लाजाळूपणा कमी होऊ लागेल आणि तुमचा आत्मविश्वास दिसून येईल.
–
–
तुम्ही बुजरे आहात हे तिला समजू द्या:
मुलींना तुम्ही बुजरे आहेत हे कळले तरी त्यात त्यांना विशेष फरक पडत नाही. खरंतर बऱ्याचश्या मुलींना मुलगा बुजरा, shy असणं हे आवडतं सुद्धा.
तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे किंवा तुम्हाला कसा inferiority complex आहे हे मुलींना सांगण्याची आवश्यकता नसते. पण तुम्हाला काही गोष्टींची लाज वाटते किंवा तुम्ही त्या सहसा करत नाही हे सांगण्यात काहीच वावगं नाही.
खरंतर हे सांगून तुम्ही स्वतःच्या मनावरचा ताण कमी करता. यामुळे तुम्ही खुलून बोलू शकता. जर यामुळे ती मुलगी दूर गेली तरीही ठीकच. याचा अर्थ ती तुम्ही तेवढा वेळ खर्च करण्याच्या पात्रतेची नव्हती.
लाजाळू असणं किंवा बुजरा स्वभाव असणं ही वाईट गोष्ट असल्यासारखं तिच्याकडे अजिबातच पाहू नका. कितीतरी माणसं यामुळेच मुलींशी बोलायला घाबरतात.
पण एकदा का तुम्ही तुमच्या स्वभावावर काम केलेत आणि स्वतःला व्यक्त करायला सुरुवात केलीत की तुम्ही कोणत्याही परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरं जाऊ शकता.
फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला हवा आणि स्वतःला या भीतीतून बाहेर पडण्याची एक संधी द्यायला हवीत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.