आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
एखाद्या बँकेत तुमचं बचत खाते असेल तर तुम्ही नेहमी तुमच्या किमान मासिक रक्कमेचा उल्लेख करत असतात. तुम्ही म्हणतात अकाऊंटमध्ये 10000 रुपये किमान सरासरी रक्कम आहे. परंतु याचा नेमका अर्थ काय होतो तो आपण जाणून घेणार आहोत.
बहुसंख्य लोकांना असं वाटत राहतं की त्यांचा बचत खात्यातील रक्कम ही 10000 रुपयांचा खाली नसावी. जर असं असेल तर त्यांना दंड भरावा लागेल. त्यासाठीच बँकेच्या अकाउंटमध्ये 10000 रुपये कोणत्याही परिस्थितीत शिल्लक राहावे यासाठी लोक प्रयत्न करत असतात.
याचा अर्थ त्यांचं खातं नेहमी तितक्या रकमेने भरलेलंच असलं पाहिजे. तरीसुद्धा खात्यातील किमान सरासरी रक्कम ही अत्यंत वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने मोजली जाते.
खात्यातील किमान सरासरी मासिक रक्कम म्हणजे काय?
याचा साधारण अर्थ महिन्याचा शेवटच्या दिवशी तुमच्या बँक खात्यात असलेली रक्कम होय. महिन्याचा शेवटच्या दिवशी बँक खात्यातील रक्कम याची बेरीज करून तिला महिन्यात असलेल्या दिवसांनी भागून मिळालेली संख्या ही बँक खात्यातील किमान मासिक सरासरी रक्कम असते. एका गणिती सूत्रात सांगायचं झालं तर
कि.मा.स.रक्कम = ( महिन्याचा शेवटच्या दिवशी एकत्रित बँक खात्यात झालेल्या व्यवहारांचा रक्कमेची बेरीज) / महिन्यातील दिवस
जर उदाहरण द्यायचं झालं तर , आपण फेब्रुवारी महिन्याच उदाहरण घेऊयात. तुमच्या खात्यातील रकमेची मर्यादा 5000 रुपये आहे.
आता तुमचा खात्यातील महिन्याचा सुरवातीला रक्कम 10000 रुपये आहे. तुम्ही 10 एप्रिलला 8000 रुपये काढले आणि 20 एप्रिलला 2000 रुपये खात्यात जमा केले. तर फेब्रुवारी महिन्याची किमान मासिक सरासरी रक्कम किती असेल?
15 दिवसांसाठी खात्यात 10000 रुपये ठेवणे हे एक महिन्यासाठी खात्यात 5000 रुपये ठेवण्या इतकेच आहे. ( 10000 * 15 दिवस = 5000* 30 दिवस)
राष्ट्रीयकृत बँक विरुद्ध खाजगी बँक
स्टेट बँक , बँक ऑफ इंडिया, अल्लाहाबाद बँकेसारख्या बँकांना साधारणतः महिन्याचा शेवटी खात्यात खूप कमी किमान रक्कम असली तरी चालते. तिथे बँकेची किमान मासिक सरासरी रक्कम ही 5000 रुपये असते आणि नॉन मेंटेनन्स चार्ज 40 – 50 रुपयांपेक्ष्या जास्त नसतो.
खाजगी बँकेत मात्र याउलट स्थिती बघायला भेटते, त्यात किमान मासिक सरासरी रक्कम ही 10000 इतकी असते आणि नॉन मेंटेनन्स चार्ज हा खूप जास्त असतो जर अपेक्षित रक्कम खात्यात ठेवली नाही तर, तो 750 रुपये इतका जास्त ही खाजगी बँकेत असू शकतो.
आता तुम्हाला समजलं असेल की खात्यातील किमान मासिक सरासरी रक्कम कशी काढली जाते? यातून तुम्हाला बँकिंग करताना, नक्की मदत होईल. यामुळे तुम्ही दंडापासून वाचण्यासाठी खात्यात किती रक्कम ठेवायची याचे गणित सहज करू शकतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.