आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
जगभरात अनेक सुंदर ठिकाणं आहेत, काही नैसर्गिक तर काही मानव निर्मित. नैसर्गिक ठीकाणांसोबतच आपण ह्या कृत्रिम ठिकाणांची सुंदरता बघण्यासाठी जगभ्रमंती करत असतो.
पण जगात केवळ नैसर्गिक आणि कृत्रिम ठिकाणच नाही तर आणखीही काही अश्या सार्वजनिक गोष्टी आहेत ज्या कुठल्या पर्यटन स्थळापेक्षा कमी नाहीत. जसे की जगभरातील एयरपोर्ट्स. जगात असे अनेक एयरपोर्ट्स आहेत जे त्यांच्या सुंदरतेसाठी ओळखले जातात.
पण तुम्ही कधी बसस्थानक बघितलं आहे? जे एयरपोर्टएवढचं सुंदर आणि स्वच्छ असेलं. आता एयरपोर्ट एवढं सुंदर बसस्थानक असू शकतं हा विचारच मुळात कुणी केला नसावा.
पण जगात असे बसस्थानक देखील आहेत ज्यांची सुंदरता बघून मोठमोठे पंचतारांकित हॉटेल्स देखील अचंबित होतील. आज आपण अश्याच काही बसस्थानकांची सफर करणार आहोत..
१ हॉलंड :
हॉलंड येथील हे बसस्थानक २००३ साली तयार करण्यात आले. हे बसस्थानक हूपडार्प्स स्पार्न इस्पितळाजवळ आहे. हे बसस्थानक त्याच्या इंटीरियर डिजाइन करिता संपूर्ण जगभर ओळखल्या जाते. त्याच्या बांधकामात सिंथेटिक पॉलिएस्टरचा वापर करण्यात आला आहे. हॉलंडचे हे बसस्थानक येथे येणाऱ्या सर्वांच लक्ष वेधून घेते.
२. ब्रिटन :
ब्रिटनच्या वर्कशायर येथील स्लो बसस्थानक हे एवढे सुंदर आहे की ह्याच्यासमोर मोठमोठे हॉटेल्सही कमी पडतील. तसेच हे स्थानक सोयी-सुविधांनी पूर्ण आहे. येथे अनेक रेस्टॉरंट, कॅफे, वेटिंग रूम आणि स्वच्छतागृहांची सुविधा आहे.
३. पोर्तुगाल :
पोर्तुगाल येथील हे बसस्थानक जगातील अत्याधुनिक बसस्थानकांपैकी एक आहे. हे बसस्थानक पूर्णपणे काचेचे बनलेले आहे. ह्या बस स्थानकावर एकावेळी ९६ बसेस उभ्या करता येतात.
४. क्रोशिया :
क्रोशिया येथील हे बसस्थानक देखील जगातील सर्वात सुंदर बसस्थानकांपैकी एक आहे. हे बस स्थानक येथील ड्रावा नदीच्या किनाऱ्यावर आहे.
५. स्वित्झर्लंड :
स्वित्झर्लंडच्या अराउ येथिल हे बसस्थानक चार मोठ्या मोठ्या खांबांच्या आधारे उभं आहे. ह्याच्या पांढऱ्या छताला पॉलीथीन ट्यू बने तयार करण्यात आले आहे. ही छत संपूर्ण पारदर्शी आहे.
६. लंडन :
साउथ लंडन येथील वॉक्सल बसस्थानक हे २००५ साली तयार करण्यात आलं. हे बसस्थानक सर्व सुविधायुक्त असे बसस्थानक असून ते पूर्णपणे स्टेनलेस स्टीलने तयार करण्यात आले आहे.
७. ब्रिटन :
ब्रिटन येथील प्रेस्टन बस स्थानक वेस्टर्न युरोपमधील सर्वात मोठे बसस्थानक आहे. येथे ११०० कर आणि ८० डबलडेकर बसेस अगदी सहज पार्क करता येतात. हे बसस्थानक याच्या डिझाईन करिता अतिशय प्रसिद्ध आहे.
८. फ्रान्स :
फ्रान्स येथील पॅरिसचे थियाइस बसस्थानक हे त्याच्या विचित्र डिझाईन करिता प्रसिद्ध आहे. ह्याला ईसीडीएमचे संस्थापक इमानुअल कंस्ट्रेल आणि डॉमिनिक मॅरेक ह्यांनी डिझाईन केले आहे.
९. जर्मनी :
जर्मनीच्या ह्या बसस्थानकाला २००९ साली बेस्ट बिल्डींगचा अवॉर्ड मिळाला आहे. हे स्थानक आर्किटेक्ट ब्लंक मॉर्गन ह्यांनी डिझाईन केले आहे. ह्याच्या १८०० स्क्वेअर मीटरच्या पंखासारख्या आकाराच्या छतासाठी प्रसिद्ध आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.