आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
मुलीबरोबर डेटवर जाणं हा एकदम exciting अनुभव असतो. त्यातून आपण डेटवर चाललोय ती मुलगी योगा करत असेल तर मग तर काय ? सोने पे सुहागा.. ही win-win situation असते.
ती सुद्धा तात्पुरती नव्हे तर आयुष्यभरासाठी. योगाभ्यास केवळ शरीराच्या सुदृढतेसाठी महत्त्वाचा असतो असे नाही, तर तो बुद्धी आणि भावनांचा योग्य मिलाफ घडवून आणतो.
जी मुलगी योगासने करते तिला योगिनी म्हणतात. ती कायमच बुद्धीने विचार करून योग्य तोच निर्णय घेते आणि कोणत्याही कठोर परिस्थितीला धैर्याने सामोरी जाते.
शिवाय ती आपल्या मतांबद्दल आणि आचार-विचारांबद्दल लवचिक असते.
त्यामुळे जर योगासने करणारी सुदृढ मुलगी तुमच्या आयुष्यात आली तर तिचा हात आयुष्यभरासाठी धरून ठेवा. तिच्यातील हे काही गुण तुम्हाला आयुष्यभर सोबत करतील.
१. मानसिक आणि शारीरिक लवचिकता :
तिचे फक्त शरीरच लवचिक असते असे नाही. शरीर तर लवचिक असतेच पण त्याहीपेक्षा जास्त लवचिक तिचे मन असते. ती कोणत्याही नकारात्मक गोष्टी अधिक काळ धरून ठेवत नाही. ताणत नाही.
अशा मुली कोणत्याही परिस्थितीत शांत राहून आपल्या स्वतःच्या मनाचे संतुलन राखतात.
२. दिसायला सुदृढ आणि आकर्षक असतात :
त्या दिसण्यात किंवा राहण्यात आकर्षक असतात. त्यांचे शरीरच त्यांच्या सुदृढतेबद्दल बोलते.
दररोज योगासने करणे हा सर्वात आरोग्यदायी व्यायाम आहे. ह्यामुळे तुमच्या सर्व शरीराची हालचाल होते. तुमच्या शरीरातील प्रत्येक नस मोकळी होते. सांधे लवचिक होतात. आजार तुमच्या आसपासही फिरकत नाहीत.
त्यामुळे अशा मुलीबरोबर डेटवर गेलात तर तुम्हाला जाणवेल की तुम्ही तुमची दुःख कुरवाळत बसला आहात आणि ती तुम्हाला आधार देत्ये.
३. त्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असतो :
योग करणाऱ्या मुलींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नसते. योग साधनेमुळे शरीराचे विविध भाग मोकळे होतात आणि त्यामुळे घुसमटलेल्या भावनांना बाहेर पडायला वाट मिळते.
एकदा नकारात्मक भावना बाहेर पडला की आत्मविश्वास ओसंडून वाहू लागतो.
शिवाय योगसाधना करणाऱ्या व्यक्तीला आतूनच खूप ऊर्जा मिळत असते. त्यामुळे ती व्यक्ती कायमच उत्साही असते.
४. अफाट शक्तिशाली:
योगासने करणारी मुलगी कदाचित तुम्हाला पंजा लढवण्यात हरवू शकणार नाही पण plank challenges मध्ये तुम्ही तिला हरवूच शकणार नाही.
तुम्ही शीर्षासनात सुद्धा तिला हरवू शकणार नाही.
बरं पण त्यासाठी पाहिले तुम्हाला ते येतं तरी का?? 😉
५. पूर्वग्रहदूषित मते नाहीत:
योगासने करणाऱ्या मुलींना एखाद्या व्यक्तीबद्दल अंदाज बांधण्याची वाईट सवय नसते. त्या जजमेंटल नसतात. त्या योगासनांमार्फत कोणत्याही नकारात्मक भावना किंवा पूर्वग्रह मनातून काढून टाकण्यात यशस्वी होतात.
त्या स्वतःला किंवा इतरांना सुद्धा सतत न्यायाधीशांच्या नजरेतून बघत नाहीत.
६. समतोल राखतात:
योग आपल्याला सर्व गोष्टींचा समतोल कसा राखायचा हे शिकवते. समतोल राखणे म्हणजे तुमच्या आत्म्याचा शोध घेणे.
त्यामुळे योगाचा अभ्यास करणाऱ्या मुली नृत्यात आपला तोल राखू शकतात तसाच आपल्या भावनांचा सुद्धा समतोल राखू शकतात.
७. शारीरिक लवचिकता:
तिच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. त्यामुळे ती तिच्या शरीराबद्दल सकारात्मक असते आणि ती कशी दिसते, तिच्या शरीराची ठेवण कशी आहे किंवा इतरांना तिच्याबद्दल काय वाटते याबद्दल तिची काहीच नकारात्मक मते नसतात. पूर्वग्रह नसतात.
ती कोणत्याही कपड्यांमध्ये comfertable असते. आणि ती कपडे उत्तम प्रकारे आत्मविश्वासाने carry करू शकते.
८. सकारात्मक दृष्टिकोण:
फक्त पुस्तकातच नाही तर प्रत्यक्ष जीवनात सुद्धा योग अभ्यास हा त्याच्या विविध आसनांमधून सकारात्मक परिणाम घडवतो.
इतकेच नाही तर योगाने कमावलेले शरीर हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करते आणि त्यामुळे त्या व्यक्तीसोबत असलेल्या व्यक्तीला आनंदी वाटते.
त्यामुळे तुम्ही भेटलेली मुलगी जर योगासने करत असेल तर ती तिच्यातील सकारात्मक ऊर्जा तुमच्यात संक्रमित करून जाईल हे निश्चित.
आजकाल योगासनं करणारी मुलगी मिळणं ही इतकी कठीण गोष्ट उरलेली नाही. कारण आता योग हा कित्येकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे.
त्यामुळे आजूबाजूला डोळे उघडून नीट पहा. तुम्ही स्वतः तर योगासनं कराच आणि तुम्हाला योग्य वाटेल त्या ‘योगिनी’ची निवड करा. तुमची निराशा होणार नाही यावर विश्वास ठेवा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.