स्त्री पुरुष भेदभावाला फाटा देत २५० मुलांच्या शाळेत एकटी शिकतेय ‘ती’ !
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“बेटी पढाओ, बेटी बचाव” सध्या हे आपल्या सरकारचे ध्येय आहे. जे भविष्याच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. मुलगी शिकते तेव्हा ती सुशिक्षित होते आणि त्यानंतर ती आपल्या मुलांनाही सुशिक्षित बनवू पाहते. त्यामुळे शिक्षण हे खूप गरजेचे आहे. देशाच्या विकासात शिक्षणाचा खूप मोठा वाटा असतो.
आपल्याकडील शाळांमध्ये एकत्र फक्त मुलं असतात किंवा मुली असतात किंवा दोघेही असतात. पण आज आम्ही आपल्याला एका अश्या शाळेबाबत सांगणार आहोत जिथे २५० मुलांमध्ये एक मुलगी शिकते आहे.
देहरादून येथील कर्नल ब्राऊन कॅम्ब्रिज शाळा, ह्या शाळेतील सहाव्या वर्गात शिकणारी मुलगी शिकायना एक १२ वर्षांची मुलगी आहे जी २५० मुलांच्या शाळेतील एकमात्र मुलगी आहे.
ह्याबाबत बोलताना ती सांगते की, जर मुली आज सर्वकाही करू शकतात तर त्या मुलांच्य शाळेत का नाही शिकू शकत?
तिच्या शाळेतील पहिल्या दिवसाबद्दल ती सांगते की, “जेव्हा मी पहिल्या दिवशी वर्गात जाऊन बसले तेव्हा, शिक्षकांनी वर्गात येताच त्यांच्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे ‘गुड मॉर्निंग बॉईज’ म्हटले. आणि त्यानंतर त्यांची नजर माझ्यावर पडली, तेव्हा ते म्हणाले की आता मला ‘गुड मार्निंग स्टूडंट्स’ बोलायची सवय करवून घ्यावी लागेल.”
शिकायना ह्या २५० मुलांमध्ये देखील अगदी बिनधास्तपणे वावरते, पण असं मुलांच्या शाळेत शिकणे ही तिची स्वतःची इच्छा नसून तिच्या नशिबाचा खेळ आहे. शिकायना ही अतिशय सुंदर गाते, तिनेटीव्हीवरील अनेक संगीत कार्यक्रमात देखील सहभाग घेतला आहे.
&TV वरील वॉइस ऑफ इंडिया ह्या कार्यक्रमात देखील सहभागी होती, एवढचं नाही तर ती फायनल राउंड पर्यंत देखील पोहोचली होती. त्यासाठी तिला सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत शाळेतून सुट्टी घ्यावी लागली होती. कार्यक्रम संपल्यावर जेव्हा ती परतली तेव्हा तिच्या शाळेने तिला वरील वर्गात पाठविण्यास नकार दिला.
त्यानंतर शिकायना हिच्या वडिलांनी अनेक शाळांमध्ये तिची अॅडमिशन करण्याचे प्रयत्न केले, पण कोणीही तिला अॅडमिशन दिली नाही. त्यामुळे शिकायना हिच्या वडिलांनी तिला आपल्याच शाळेत अॅडमिशन देण्यात यावी अशी विनंती शाळा प्रशासनाकडे केली.
शिकायना चे वडील विनोद मुखिया सांगतात की शाळा प्रशासनाने लगेच त्यांची विनंती स्वीकारत शिकायना हिला शाळेत प्रवेश दिला. पण एका मुलांच्या शाळेत मुलीला प्रवेश देण्याआधी शाळेला अनेक विषयांवर आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांवर विचार करावा लागणार होता.
जसे की शाळेत तिचा गणवेश काय असेल? तिच्यासाठी वेगळे बाथरूम लागेल का? आणि जर इतर शिक्षकांनी देखील अशीच मागणी केली तर काय करायचे? ह्यासार्वांचा विचार करून शाळेने शेवटी शिकायना हिला शाळेत प्रवेश दिला.
आता शिकायना ह्या शाळेत मुलांसोबत शिकते आहे, एवढचं नाही तर तिचा गणवेश देखील मुलांप्रमाणेच शर्ट-पॅण्ट आहे. शिकायना हिच्या वर्गात १७ मुले शिकतात आणि शिकायना ही देखील त्यांच्यापैकीच एक दिसते.
शिकायना बाथरूम कुठलं वापरणार, किंवा तिच्यासाठी नव बाथरूम बनवायचे का? कारण ती मुलाचं बाथरूम वापरू शकत नाही. म्हणून ह्यावर देखील शाळा प्रशासनाने तोडगा काढून तिला शिक्षकांच्या खोलीतील बाथरूम वापरण्याची परवाणगी दिली. तसेच शिकायना हिला बाहुली सोबत नाही तर मैदानात खेळायला जास्त आवडतं.
त्यामुळे आता तिच्या ह्या नवीन शाळेत तिने लॉन टेनिस खेळण्यास सुरवात केली आहे. आता तिला ह्या शाळेत २ महिने झालेत, आणि तिला तिची ही नवी शाळा आवडू लागली आहे.
अश्याप्रकारे शिकायना हिला मुलांच्याच का होईना पण शाळेत प्रवेश मिळाला. आणि ह्याने ती अतिशय आनंदी आहे. तिला कुठेही ह्याचे दुख किंवा तणाव नाही की ती एवढ्या मुलांमध्ये एकटी आहे.
स्त्रोत : BBC
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.