Site icon InMarathi

हे १० पदार्थ जे आपण इथे ‘चायनीज’ म्हणून खातो ते खुद्द चीनमध्ये सुद्धा मिळत नाहीत!

chinese food inmarathi

YouTube

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चिली चिकन चॉवोमीन, फ्राईड राईस, मंचुरीयन… हे सर्व नाव ऐकल्यावर आपल्याला आठवण येते ती चायनिज खाद्यपदार्थांची जे आपण आवडीने खात असतो.

भारतात चायनीज खाद्यपदार्थांच क्रेझ खूप जास्त आहे. प्रत्येक विकेंडला चायनीज रेस्टॉरंट गर्दीने तुडुंब असतात. रस्त्याचा कडेला लागणाऱ्या गाड्यांवर पण तुम्ही चायनीज पदार्थ खायला गर्दी करत असतात.

==

हे ही वाचा : घरबसल्या ठराविक पदार्थांना कंटाळले असाल, तर या १० खाऊगल्ल्यांची व्हर्चुअल सफर पाहून तोंडाला पाणी सुटेल

==

पण तुम्हाला माहिती आहे का आपण चायनीज म्हणून जे पदार्थ ग्रहण करत असतो त्याचातले बहुतांश पदार्थ हे चायनीज नाहीत !

ते पदार्थ मूलतः भारतीय आहेत, ज्याचा पारंपारिक चायनीज खाद्यपदार्थांशी संबंध आहे पण त्यांचात खूप फरक आहे.

या चायनीजला इंडियन चायनीज देखील म्हटलं जातं अर्थातच देसी चायनीज.

 

 

१०० वर्षांपूर्वी १९ व्या शतकात चायनाच्या हक्काभागातून काही चिनी लोकांचा समूह कोलकतात स्थायिक झाला.

तुमच्या माहिती करता आज जे पदार्थ चायनीज म्हणून आपण खात आहोत, जे सदैव आपल्या जिभेवर रेंगाळत असतात. हे मूळात आपल्या खाद्यपदार्थापासून प्रेरणा घेऊन बनवले आहेत.

उदाहरण द्यायचं झालं तर चायनीज भेळ, चायनीज इडली इत्यादी.

देशी चायनीज हे भारतीय पदार्थ व चिनी पदार्थांच्या मिश्रणातुन तयार झाले आहे. ह्यातील बऱ्यापैकी पदार्थ शाकाहारी आहेत. मूलतः चीन मध्ये मांसाहार मोठ्या प्रमाणात केला जातो.

ह्या चिनी पदार्थांचा भारतीयीकारणामुळे ते भारतात इतर परदेशी खाद्यपदार्थांपेक्षा जास्त लोकप्रिय झाले आहेत.

हे पदार्थ बनवताना लागणारे मसाले, चटणी, बेसिक तत्व हे सर्व चायनीज मुळाचे असतात. पन भारतीय चायनीज पदार्थात मोठया प्रमाणात भारतीय भाजीपाला, मसाले वापरले जातात.

जे चिनी पदार्थांमध्ये वापरले जात नाहीत.

चायनीज मध्ये वापरलं जाणारी शेजव्हान ही चटणी आणि मंचुरीयन चटणी, आता भारतीय चायनिज मध्ये देखील वापरली जात आहे त्यामुळे आपलं देसी चायनीज दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.

चला आपण जाणून घेऊयात आता अश्या ९ चायनीज खाद्यपदार्थांबद्दल ज्यांची चव आजून खुद्द चायनीज लोकांनी नाही घेतली आहे.

 

१ ) चिली चिकन :

 

सोया चटणी सोबत काही चायनीज मसाले घातल्यावर , ही एक डिश तयार होते , पार्टीच्या वेळी स्टार्टर म्हणून ही डिश खूप प्रसिद्ध आहे.

यात चिकन ला चायनीज पेस्टच आवरण दिलं जातं. त्यावर वेगवेगळे मसाले, बारीक कांदा आणि बारीक मिरची टाकून सर्व केलं जातं. याचं एक ड्राय व्हर्जन देखील आहे जे तळून सर्व केलं जातं.

 

२ ) मंचुरीयन :

 

 

चिकन मंचुरीयनच्या निर्मितीच श्रेय नेल्सन वांगया व्यक्तीला जातं. त्याने १९९५ साली मुंबईत पहिल्यांदा मंचुरीयन आणलं.

त्याने त्यात पारंपारिक चायनीज पदार्थ न वापरता, भारतीय पदार्थांचा वापर केला व गरम मसाल्या ऐवजी सोया सॉसचा वापर केला होता.

आज मासे , गोबी , मटण यामुळे मंचुरीयन वेगवेगळ्या व्हरायटीत उपलब्ध आहे.

 

३ ) चाओमिन :

 

 

चीन मध्ये चाओमिनला चाऊ मेंईन म्हणतात आणि त्यात नूडल्सचा काही भाग उकळवून त्यावर भाजी, अंड्याची चटणी टाकतात. परंतु भारतात त्याला तळले जाते. भारतात ते खूप तिखट बनवतात.

घरी बनवून मोठ्या प्रमाणात हे भारतात खाल्ले जातात.

 

४ ) मनचावो सूप :

 

 

भारतीय मनचावो सूपाची संकल्पना ही सोयायुक्त , तिखट टेस्टच्या सुपाची आहे ज्यात आलं व लसूण घातले जातात. नंतर भाजीपाला अथवा मांसासोबत बनवलं जातं.

ह्या बरोबरच गाजर व अनेक फळभाज्या बारीक चिरुन त्यात टाकल्या जातात.

==

हे ही वाचा : प्रत्येक भारतीय उद्योजकाने हे शिकायलाच हवं; जे चीनचा सर्वात श्रीमंत माणूस करतोय…

==

५ ) स्प्रिंग रोल्स :

 

 

चायनीज ह्याला चुन जूआन म्हणतात.

तिकडे वसंत ऋतूच्या आगमनावेळी काँटोनिस स्टाईल डम्पलिंगस सारखा हा पदार्थ बनवला जातो पण भारतात त्याला तळून, त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या भाजा घालून, मसाले घालून पार्टी फूड म्हणून दिलं जात.

 

६ ) शेजव्हान :

 

 

फ्लेवरयुक्त , तिखट अशी गडद लाल रंगाची शेजव्हान चटणी भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. नूडल्स पासून फ्राईड राईस पर्यंत सर्वांवर टाकून ती खाल्ली जाते ती जेवण अधिक लज्जतदार बनवते.

लाल मिर्ची, लसूण याने तिची लज्जत आजून वाढते

 

७ ) दरसान :

 

 

अंड्याची नूडल्स जिला विविध भागांत कट करून तिला तळल जातं. त्यावर मधाच आवरण चढवलं जातं. सेसामें बिया टाकल्या जातात व आईस्क्रीमसोबत वाढलं जातं. हा पदार्थ १००% चायनीज नाही!

 

८ ) अमेरिकन चोप्सी :

 

 

खूप जास्त लज्जतदार अशी ही डिश, खूप लोकप्रिय आहे, अमेरिकन चोप्सी नूडल्स चिकन व अन्य पदार्थ टाकून त्यावर मिरची लसुनाची पेस्ट टाकून बनवली जाते.

ही खूप चविष्ट व मजेदार असते!

 

९ ) दाटे पॅनकेक्स :

 

 

फक्त भारतात एखाद्या चायनीज जेवणा नंतर , डेझर्टला एका स्त्रीप डोनटच्या तळलेल्या भागावर आईस्क्रीम टाकून चायनीज म्हणून सर्व केलं जातं.

 

१० ) फ्राईड राईस :

 

 

==

हे ही वाचा : हे एकच चटपटीत स्नॅक्स तुमची कित्येक औषधं कायमची बंद करू शकतं!

==

कुठलीही गोष्ट तळा आणि सर्व करा, ती भारतात लोकप्रिय होते!

असाच काहीसा प्रयोग बारीक कापलेल्या फळभाज्या , भाज्या व राईस , तिखट, गरम मसाला, थोडंस शेझव्हान टाकून, भाताला तळा, मिक्स करा आणि तुमचा फ्राईड राईस तयार होतो.

ही सध्याचा घडीला भारतातील सर्वात लोकप्रिय डिश आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version