' ‘या’ ७ गोष्टी असणाऱ्या पुरुषाकडे स्त्रिया होतात नेहमीच आकर्षित! – InMarathi

‘या’ ७ गोष्टी असणाऱ्या पुरुषाकडे स्त्रिया होतात नेहमीच आकर्षित!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसाचे चांगले दिसणे आणि डोक्याने हुशार असणे हे सर्वांना आवडणारं आणि आकर्षून घेणारं कॉम्बिनेशन आहे. सर्वांना आपला सोबती हा दिसायला चांगला हवा आणि त्यासोबत तो हुशारही हवा असं वाटत असतं.

पण समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी एवढचं हवं असतं का ? तर नाही!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फक्त एवढ्याने होत नसतं. तर तुम्ही कश्याप्रकारे वागता किंवा तुमची बॉडी लॅन्गवेज, पोस्चर हे देखील तेवढंच महत्वाचं ठरते.

त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही असे शास्त्रीय गोष्टी सांगणार आहोत, ज्या तशा तर खूप विचित्र आहेत – पण स्त्रियांवर विशेष प्रभाव टाकतात!

तसेही – आपल्यावर विचित्र गोष्टींचा प्रभाव जसा जास्त होतो तेवढेच हेही खरे आहे.

१. आपली हनुवटी नेहमी वर ठेवा, ते जास्त मर्दानी दिसतं :

 

Hrithik Roshan looking up InMarathi

 

रिसर्च नुसार जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही तुमची हनुवटी नेहमी वर ठेवायला हवी, तेव्हा तुम्ही अधिक मर्दानी दिसता.

आपलं डोकं जरा मागच्या बाजूने वाकवून ठेवणे ह्याला मर्दानी बॉडी लॅन्गवेज समजल्या जातं आणि ते महिलांच्या दृष्टीने अधिक आकर्षक देखील दिसतं.

==

हे ही वाचा : या ११ गोष्टींमध्ये समजूतदारपणा दाखवलात, तर संसार नक्कीच सुखाचा होईल…

==

२. सिमेट्रीकल चेहरा आणि बॉडी देखील फायद्याची ठरेल :

 

 

सिमेट्रीकल चेहराच नाही तर संपूर्ण बॉडी सिमेट्रीकल असेलं तर ते अधिक आकर्षक ठरतं.

आणि साहजिकच जेव्हा आपण एखाद्याला आपला सोबती म्हणून निवडतो तेव्हा तो परफेक्ट असावा असे सर्वांनाच वाटत असते. त्यामुळे समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी सिमेट्रीकल चेहरा आणि बॉडी देखील फायद्याची ठरू शकते.

३. साधारण चेहरा हा जास्त आकर्षक असतो :

 

attractive men postures-inmarathi07

 

रिसर्चनुसार सामान्य, साधारण दिसणारे लोक त्या लोकांपेक्षा जास्त आकर्षक असतात जे थोडे वेगळे किंवा युनिक दिसतात.

शास्त्रज्ञांच्या मते आपल्या मेंदूमध्ये एक मानसिक डेटाबेस आहे जिथे आपण आपल्या जीवनात जेवढेही चेहरे बघतो ते स्टोर करत जातो. त्यामुळे आपल्याला हे माहित असतं की सामान्य काय आहे आणि तेच आपल्याला आकर्षक वाटत असतं.

४. दाढी आणि केसांची नीट निगा राखा:

 

Aakash Thosar Inmarathi

 

शास्त्रज्ञांच्या मते खूप मोठी दाढी हे आकर्षक नसतं. खूप मोठी दाढी असणे हे पुरुषत्व आणि आक्रमकता दर्शवते. तर त्याएवजी किंचित वाढलेली दाढी ही पूर्ण दाढी किंवा क्लीन शेव लुक पेक्षा अधिक आकर्षक दिसते.

==

हे ही वाचा : लाखो वर्षांपूर्वीच्या स्त्रीला, पुरुषांच्या कोणत्या गोष्टीचं आकर्षण वाटलं? कथा उत्क्रांतीची…

==

५. घाम एक चांगला कामोत्तेजक आहे :

 

Virat Kohali InMarathi

 

घाम ह्याला पुरुषत्वाचा सूचक समजल्या जाते. घामाने भिजलेल्या पुरुषांकडे स्त्रिया आकर्षून जातात. घाम हा स्त्रियांमधील कामोत्तेजक भावना निर्माण करण्याचं काम करतो.

६. विनाकारण हसू नका :

 

Pavan Kalyan InMarathi

 

शास्त्रज्ञांच्या मते हसणाऱ्या चेहेऱ्यापेक्षा स्त्रियांना गंभीर वा रागीट चेहरे जास्त आवडतात. त्या अश्या पुरुषांकडे आकर्षिल्या जातात. कारण गंभीर आविर्भाव – हे वर्चस्व दर्शविते जे स्त्रियांना खूप आवडते.

७. चेहऱ्यावरील व्रण तिला घायाळ करू शकतात:

 

Irfan Khan InMarathi

 

स्त्रियांना व्रण असलेले पुरुष जास्त आवडतात. कारण त्यावरून हे कळून येते की समोरच्याचे जीवन हे साहसी असेल, मग ते व्रण बाथरूममध्ये घसरून पडल्याने का लागलेले नसो, पण स्त्रियांना ते आवडतात.

अर्थात, ह्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की तुम्ही स्त्रियांना इम्प्रेस करण्यासाठी स्वतःला दुखापत करवून घ्यावी…! 😀

तरी – ह्या काही गोष्टी जर तुमच्यात असतील किंवा जर तुम्ही तसे वागत असाल, तर तुम्ही स्त्रियांना नक्की आकर्षक वाटाल.

आता प्रत्येकाने यातील काय काय आपल्यात आहे – वा – आणता येईल – याचा विचार करावा. त्यानुसार आपली पर्सनॅलिटी तयार करावी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

हे ही वाचा : अविवाहित असलेल्या ‘या’ ऋषींनी जगाला दिला कामसूत्राचा मंत्र, विश्वासच बसणार नाही!

==

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?