थंडीच्या दिवसात तोंडातून वाफ का येते? समजून घ्या..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू असणाऱ्या आपल्या भारत देशात प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. पावसाळा आवडणारे काहीजण पाहायला मिळतात, पण उन्हाळा आवडणारी मंडळी सापडणे दुर्लभच…
हिवाळा हाच बहुतांश मंडळींना आवडणारा ऋतू असतो. हिवाळ्याची ती दवबिंदूंची सकाळ, दिवसभर अंगाला झोंबणारा तो थंड वारा, गोधडीतील ती उबदार रात्र, जागोजागी पेटणाऱ्या शेकोट्या.
बऱ्याचवेळा आपल्याला हा ऋतू फारच आवडीचा वाटतो. उन्हाने अंगाची होणारी लाही किंवा पावसात भिजल्याने येणारा वैताग या दोन्ही गोष्टींचा त्रास होत नसल्याने हिवाळ्यात बरं वाटतं.
असा हा हिवाळ्याचा ऋतू आपल्यासोबत अनेक गोष्टी आणि नवीन अनुभव घेऊन येत असतो. जसे की खूप थंडी असली की आपल्या तोंडातून वाफ येते.
‘तोंडाची वाफ दवडणे’ हा वाक्प्रचार मराठीत अगदीच प्रसिद्ध आहे. या वाक्प्रचारात वापरली जाणारी तोंडची वाफ आणि ही खरीखुरी वाफ यात मात्र फरक आहे. थंडी अधिक असेल त्यावेळी हमखास आपल्या तोंडातून वाफ येते.
हे बघून आपल्याला जरी नवल वाटत नसलं तरी लहान मुलांना मात्र मजा येते, म्हणून ते मुद्दाम तोंडातून वाफ काढण्याचा प्रयत्न करतात. मुलांना मनोरंजन म्हणून हा खेळ खूप मजेदार वाटतो.
त्यांच्यासाठी हे एखाद्या जादूसारखं असतं. आपण लहान असताना आपल्यासाठी देखील ही एक जादूच होती. कारण तेव्हा माहित नव्हतं की, तोंडातून वाफ का येते? पण तुम्हाला माहित आहे ना थंडीच्या दिवसांत तोंडातून वाफ का निघते ते?
कदाचित तुम्हाला आजही ह्याचं उत्तर मिळालेलं नसावं. मिळाले नसेल, तर हे शास्त्रीय कारण आज नक्कीच समजून घ्या.
तर श्वासोच्छवास प्रक्रीयेदरम्यान आपल्या शरीरात कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते. आपले फुफ्फुस ह्या पाण्याचे बाष्पीभवन करून ही वाफ तोंडाद्वारे आणि नाकाद्वारे बाहेर टाकण्याचे काम करत असते.
श्वसन आणि पचन ह्या दोन्ही कार्यादरम्यान ही प्रक्रिया घडत असते. तसेच आपण जे पाणी पित असतो ते देखील मूत्र, घाम आणि बाष्पीभवनाद्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते.
थंडीच्या दिवसांत शरीराबाहेरील वातावरणाचे तापमान हे अतिशय कमी असते. अश्यात मग जेव्हा ही पाण्याची वाफ श्वासासोबत बाहेर येते तेव्हा ती कंडेन्स्ड होऊन पाण्याच्या लहान लहान कणांचे ढग तयार होतात.
ते तोंडातून बाहेर येताना वाफेसारखे दिसतात. ज्याला आपण तोंडातून वाफ निघणे म्हणतो.
आता हे हिवाळ्यातच का होते उन्हाळ्यात का नाही ते जाणून घेऊ :
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराच्या बाहेरील वातावरणाचे तापमान हे शरीराच्या तापमानापेक्षा खूप जास्त असते. पाणी कंडेन्स होण्यासाठी तापमान कमी असण्याची गरज असते.
त्यामुळे जेव्हा शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ती वाफ तोंडाद्वारे बाहेर येते तेव्हा ते पाण्याचे कण कंडेन्स्ड होऊ शकत नाहीत आणि बाष्पीभवनाची प्रक्रिया जलद गतीने होते. ज्यामुळे तोंडातून वाफ येताना दिसत नाही.
तर आता तुम्हाला नक्की कळलं असेल की हिवाळ्यात तोंडातून वाफ का निघते आणि उन्हाळ्यात का येत नाही…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.