Site icon InMarathi

भारतीय “रूपया”चा स्वातंत्र्यापूर्वीचा मुघल साम्राज्यापासूनचा रंजक इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

भारतातील  पैश्यांचा – किंवा अधिक योग्य म्हणायचं झालं तर रूपया ह्या चलनाचा इतिहास खूप मनोरंजक आहे.

प्राचीन काळात ‘रुपया’ ह्या शब्दाशी साधर्म्य असलेला शब्द कौटिल्य उर्फ चाणक्य साहेबांनी अर्थशास्त्रात ‘रूप्यरूप ‘ नावाने वापरला आहे अर्थात हा रूपया चांदीचा आणि सोन्याचा असे.

(बाय द वे – हा चाणक्य सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या अन्नात थोडं थोडं विष देखील घालायचा! पूर्ण माहिती इथे क्लिक करून वाचू शकता.)

आता इतिहासाला ठामपणे ठाऊक असलेल्या काळात येऊ.

पहिला भारतीय मुसलमान सम्राट शेरशहा सूरीने त्याच्या काळात जनतेसाठी ज्या ज्या सोयी आणि बदल केले होते त्यापैकी ‘रूपया’ नावाचे नाणे चलनात आणणे हा एक नवा आणि मोठा बदल होता.

 

स्रोत

इतिहासात लिहिला गेलेला हा पहिला रूपया होय. हा रुपया १७८ ग्रेन म्हणजे ११ ग्रामचा आणि चांदीचा होता आणि या रुपयाचा एक्स्चेंज भाव होता तांब्याचे ४० पैसे किंवा ४० तांब्याचे पैसे म्हणजे १ चांदीचा रुपया..! स्वस्त वाटतो की नाही !

याच शेरशहाने तांब्याची नाणी आणि सोन्याची नाणी ज्यास मोहर म्हटले जाई ती सुद्धा चलनात आणली.

तेव्हापासून प्रत्येक व्यवहार पैश्यात होऊ लागला. (दाम करी काम ही म्हण तेव्हा पासूनच सुरु झाली असावी बहुतेक !) असं असलं तरी संपूर्ण भारतात पैशांना रूपया म्हणायला जायला बराच काळ जावा लागला कारण रुपया हा प्रामुख्याने मोघल साम्राज्यातच होता, तर इतर भारतीय राज्यात पैशाला इतर विविध नावे होती.

हा रुपया पुढे भारतात सर्वत्र यायला ‘बक्सर’ची लढाई कारणीभूत ठरली.

 

india.com

१७६५ नंतर शाह आलम याला ब्रिटिश  जी नाणी घडवून देत ती साचेबद्ध नसत, तर भारतात बहुतेक मोठे व्यापारी मोठ्या नाण्यांचा खरे-खोटेपणा पडताळण्यासाठी ती कोरून पाहत असतं, त्यामुळे त्या नाण्यांची अगदी चाळण होई.

ही प्रथा सुद्धा बंद करायला बरासचा काळ लोटला. तर बक्सरच्या ब्रिटिशांनी सर जेम्स प्रिन्सेप जे भारतीय ब्राम्ही लिपीचे गाढे संशोधक होते त्यांच्या वतीने भारतीय चलनाचा अभ्यास करून लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याकडे एक अहवाल आणि नाण्याचे प्रारूप करून पाठवले.

अर्थात प्रिन्सेप यांचा अहवाल आणि एक डिझाईन मंजूर होऊन इंग्लंड मधून नाणे पाडण्याचे मशिनही भारतात आले.  इथेच  भारतीय ‘ रुपयाला ‘ खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि जेम्स प्रिन्सेप हे भारतीय रुपयाचे जनक झाले .

बक्सरच्या या पहिल्या नाणे छपाई मशीनपासूनच नाणे ज्या नाणी छपाई केंद्रात घडवले जाई तिचा एक स्पेशल लोगो किंवा खूण ही नाण्यावर छापायची प्रथा सुरु झाली ती अजून टिकून राहिली. या प्रथेला किंवा खुणेला आपण मिंट मार्क म्हणतो.

 

history.com

सन १८३३-३४ पासून विल्यम राजाच्या छापाची नाणी तयार व्हावयास सुरुवात झाली. त्यानंतर अनुक्रमे व्हिक्टोरिया राणी, आठवे एडवर्ड, पंचम जॉर्ज आणि सहावे जॉर्ज सहावे या राजांची मुद्रा असलेली नाणी सन १९४७ पर्यंत भारतात तयार करण्यात आली.

 

स्रोत

या कामासाठी तत्कालीन भारताच्या तिन्ही म्हणजे बंगाल,  मुंबई आणि  मद्रास या प्रांतात अनेक नवीन नाणी छपाई केंद्रे  तयार करण्यात आली. तांबे, चांदी आणि सोने वापरून नवीन नाणी तयार करण्यात आली. त्यासाठी नवा कायदाही अस्तित्वात आला.

नाणे छपाईच्या सुरुवातीला नाण्याच्या एका बाजूस त्या त्या राजाची मुद्रा आणि दुसऱ्या बाजूस त्याची किंमत लिहिली जाऊ लागली ज्याला आपण छापा काटा म्हणतो.

शाह आलम च्या काळात सुरु झालेल्या या नाण्यांवर ईस्ट इंडिया कंपनीचे नाव दिसून येते कारण तोवर भारतात कंपनी चे राज्य होते.

पुढे १८५७ चा उठाव पूर्णपणे निपटून काढल्यावर राणीने जाहीरनामा काढून कंपनी बरखास्त करत ब्रिटिश राज्याची स्थापना केली आणि संपूर्ण  भारतीय प्रांतात  रुपया हे चलन जाहीर केलं आणि  व्हिक्टोरिया राणी (क्वीन) आणि व्हिक्टोरिया सम्राज्ञी (एम्प्रेस) अशा दोन मुख्य प्रकारांत व्हिक्टोरियाची नाणी पडण्यास सुरुवात झाली.

 

स्रोत

नाणी किंवा रूपया भारतात ब्रिटिश अंमल असलेल्या व इतर राजांच्या प्रदेशातही चालू शकत होती किंवा इतर राज्यांची नाणी फारसी प्रसिद्ध नव्हती. त्यामुळे ही नवी एकसमान अर्थव्यवस्था भारतीयांना नवी असली तरी १०० % सुटसुटीत होती.

या रुपयाला तेव्हा ङ्म्री , पै , आठ अणे उर्फ अठन्नी , चवन्नी ,आणा, कारि , पराका, पावली ही लहाना पासून मोठी होत जाणारी भावंडे होती.

पैकी आणे हे तांब्याचे , रुपया हा चांदीचा आणि मोहर म्हणजे ५ आणि १० रुपयांचे नाणे हे सोन्याचे होते.

पुढे १९०६ मध्ये तांब्याची जागा पीतळेच्या नाण्यांनी घेतली शिवाय महत्वाची बाबा म्हणजे ब्रिटिशांनी त्यावेळेस भारतात ‘ इंडियन प्रोमिसरी नोट ‘ अर्थात कागदी नाणे सुद्धा आणले. म्हणजेच नोट!

मुळात नोट या शब्दाचा अर्थ  टीप असा होतो. म्हणजे सरकारी खात्रीची टीप असलेल लिखाणाचा कागद होय. या नोटेच्या आकार बराच मोठा असे जो १९२३ नंतर पहिल्या जागतिक युद्धात खिशात बाळगण्या एवढा सोपा झाला आणि त्यावर किंग जॉर्ज ५ वे विराजमान झाले.

 


पुढे भारतीय स्वातंत्र्य युद्धाला यश मिळत गेल्यावर हंगामी भारतीय सरकारने नाण्यांमध्ये थोडा बदल केला आणि सहावे जॉर्ज यांची भावमुद्रा तशीच ठेवण्यात आली तर दुसऱ्या बाजूस भारताचे प्रतीक म्हणून सिंहाचे चित्र आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० पर्यंत ही नाणी सुरू रहिली.

१९५० साली मात्र पूर्णपणे भारतीय नाणी तयार करण्यात आली. ही नवी नाणी चांदीची नव्हती पण त्यांचे ‘रूपया’ हे नाव मात्र स्वीकारण्यात आले.

ब्रिटिश राजे-राण्यांचे चित्र काढून टाकण्यात आले. आता त्याऐवजी चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र आले. १९५७ सालानंतर आणखी बदल करून एक रुपयाचे १०० पैसे असे प्रमाण ठरविण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्यानंतर ही अनेक काळापर्यंत भारतीय रुपया हा जागतिक अर्थव्यवस्थेत खूप मोठ्या प्रमाणात भक्कम होता.

इतकेच काय तर स्वातंत्र्यापूर्वी  ब्रिटिश पाउंड आणि अमेरिकन डॉलरला बाजारात जो विनिमय भाव मिळे तोच भाव भारतीय रुपयाला मिळत असे. फ्रांसच्या फ्रँक चलनाला सुद्धा त्यावेळेस भारतीय रुपयापुढे झुकावे लागे.

आता स्वातंत्र्य मिळून बराच काळ आणि पाणी वाहून गेले आहे. भारतीय रुपया बाजारात पत गमावून बसला आहे. १ अमेरिकन डॉलरला ६७ भारतीय रुपये असा भयंकर भाव आहे.

स्रोत

येणारा अर्थशास्राचा काळ हा  भारतीय व्यापारिक आणि राजकीय घडामोडींवरच आधारित असेल अशी आशा करूया!

चाणक्याचा काळात ज्या भारतीय ‘रूपया’ ने घोडदौड सुरु केली, ज्या शेरशहा सूरीने त्याला सामान्यांच्या खिशात आणलं आणि ज्या जेम्स प्रिन्सेपनं त्याला रूप दिल तो रुपया येणाऱ्या काळात प्रभावशाली होवो हेच मागणे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version