' विविध देशांच्या चलनी नोटांनी केलेले हे अनोखे विक्रम वाचून थक्क व्हाल! – InMarathi

विविध देशांच्या चलनी नोटांनी केलेले हे अनोखे विक्रम वाचून थक्क व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वर्ल्ड रेकॉर्ड हे फक्त माणसांनीच करावे, किंवा त्यांच्याच नावे असावे असा कुठलाही नियम नाही. निर्जीव वस्तू सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड करू शकतात. यात अगदी चलनी नोटांचा सुद्धा समावेश आहे.

काही वर्ल्ड रेकॉर्ड हे नोटांनी देखील बनविले आहेत. म्हणजेच नोट केवळ वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्यासाठीच कामी येत नाही तर नोटांचा देखील स्वतःचा वर्ल्ड रेकॉर्ड बनू शकतो. हे आपल्याला विचित्र जरी वाटत असले तरी ते रेकॉर्ड झालेले आहेत.

 

१४ शून्य :

 

currency world record-inmarathi

 

झिम्बाब्वेमध्ये खूप महागाई आहे, हा देश नेहमी आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहिला आहे. पण ह्याच देशातील नोटांनी एक विचित्र असा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.

२००९ साली झिम्बाब्वेमध्ये एक नवी नोट जारी करण्यात आली होती, ह्या नोटेवर दोन-तीन नाही तर चक्क १४ शून्य होती. म्हणजे ही एक नोट जवळपास १०००० अरब डॉलर एवढी होती.

हे झिम्बाब्वेमधील त्याकाळातील सर्वांत मोठे चलन होते.

 

सर्वात महाग नोट :

 

 

जगातील सर्वात महाग नोट म्हणवून घेण्याचा मान हा सिंगापूरच्या डॉलरला मिळाला आहे. ही नोट १९७३ साली जारी करण्यात आली होती, जी १०००० डॉलरची होती.

ह्या नोटेचे मूल्य हे जवळपास ४.५ लाख एवढे होते. पण काही काळाने भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी ही नोट बाद ठरविण्यात आली.

यामुळे नंतरच्या काळात भ्रष्टाचारावर काही प्रमाणात वचक बसला, मात्र या नोटेने एक वर्ल्ड रेकॉर्ड मात्र कायमचा त्यांच्या नावावर केला.

 

सर्वात लहान आकाराची नोट :

 

currency world raecord-inmarathi02

 

पूर्व युरोप येथील रोमानियन लियु नोटेच्या नावे जगातील सर्वात लहान आकाराची नोट असण्याचा रेकॉर्ड आहे. १० लियुची एक नोट २७*३८ मिलीमीटर एवढ्या आकाराची आहे.

म्हणजे आपल्या कडील एका पोस्टाच्या तिकीटाएवढी ती एक नोट असेल. युद्धादरम्यान कच्च्या मालाची कमतरता झाल्याने ही नोट एवढ्या लहान आकारात छापण्यात आली होती.

एखादी नकारात्मक गोष्ट वर्ल्ड रेकॉर्डसाठी कारणीभूत ठरू शकते याचे ही नोट म्हणजे हे एक उत्तम उदाहरण ठरेल.

 

१०० च्या वरील नोटांवर बंदी :

 

currency world record-inmarathi03

 

चीनमध्ये भ्रष्ट्राचार आणि काळाबाजार थांबविण्यासाठी १०० युआनच्या वरील नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. ह्यामुळे तिथल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

आपल्याकडे सुद्धा असा निर्णय घेण्यात आला तर काय घडेल, याची नुसती कल्पनाच भयानक आहे.. नाही का?

 

सर्वात हायटेक नोट :

 

currency world record-inmarathi04

 

सर्वात हायटेक नोटेचा मान हा युरो झोनच्या सामान्य चलन युरोला मिळाला आहे. येथील ५० युरोच्या नोटेची कॉपी करणे अशक्य असल्याचे मानले जाते.

ह्या नोटेला वॉशिंग मशीनमध्ये ९० डिग्री तापमानावर जरी धुण्यात आले तरी ह्या नोटेला काहीही होणार नाही. ही नोट अनेक रसायनांचा मारा देखील सहन करू शकते. त्यामुळे येथे ५० युरोची नोट सर्वात जास्त वापरात आणली जाते.

 

व्हर्च्युअल चलन :

 

 

बिटकॉईन हे एक व्हर्च्युअल चलन आहे,.तरी देखील इंटरनेट तर्फे होणाऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये ह्याचा खूप वापर केला जातो. हे चलन सातोषी नाकामोतोद्वारे २००८ साली लॉन्च केले गेले.

काळानुसार ह्यात सुधारणा होत गेली आणि आता हे चलन ऑफिशियल करन्सी एक्स्चेंज रेटमध्ये देखील वापरले जाते.

काय मग मंडळी, नोटांचे हे अनोखे विक्रम कसे वाटले तुम्हाला? आहे की नाही मोठी गम्मत…!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?