आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशांत कितीही राजकीय खटके उडत राहिले तरी इतर कुठल्याही गोष्टीत आपण त्यांना किंवा ते आपल्याला कमी लेखत नाहीत असं आपण समजतो. पण तसं नाहीये. आपल्या बॉलीवूडचे चित्रपट हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत, विदेशी लोक देखील आपले चित्रपट अगदी आवडीने बघतात.
पण पाकिस्तानात मात्र काही वेगळंच दृश्य आहे. येथील सेन्सर बोर्ड बॉलीवूडच्या चित्रपटांना पाकिस्तानात रिलीजच होऊ देत नाहीत.
कदाचित असे करून आपण भारताला कमी लेखतो हे दाखवायचं असेलं कदाचित, कारण त्यांनी बॅन केलेल्या चित्रपटांच्या यादीवरून तर हेच दिसून येतं. त्यातही काही चित्रपटांना बॅन करण्यामागे पाकिस्तानी सेन्सर बोर्डाने जी कारणे दिली आहेत ती केवळ आणि केवळ हास्यास्पद आहेत.
आज आम्ही आपल्याला अश्या काही चित्रपटांबाबत सांगणार आहोत ज्यांना काही हास्यापद कारणे देऊन पाकिस्तान सेन्सर बोर्डाने बॅन केले आहे.
राझी (२०१८) :
आलिया भट्टचा राझी ह्या चित्रपटाने खूप प्रसिद्धी मिळविली, त्यातील आलिया भट्टच्या कामाची देखील प्रशंसा करण्यात आली.
देखील पाकिस्तान सेन्सर बोर्डाच्या मते ह्या चित्रपटात काही विवादित कंटेंट आहे आणि ह्यात पाकिस्तानबाबत खूप नकारात्मक गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत. ह्या सर्व कारणांमुळे ह्या चित्रपटाला पाकिस्तानात रिलीज करण्यावर बंदी लावण्यात आली.
पॅडमॅन (२०१८) :
नुकताच येऊन गेलेला अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट देखील ह्यातून सुटलेला नाही. नाही ह्यात पाकिस्तान बाबत काहीही गैर नव्हतं. पण पाकिस्तानी सेन्सर बोर्डाने ह्या चित्रपटाला तिथे ह्याकरिता रिलीज होऊ दिले नाही कारण, त्यांच्या मते धर्मात ज्या विषयांना वर्जित समजले जाते त्या विषयावरील चित्रपट पाकिस्तानात दाखविले जाऊ शकत नाही.
टाइगर जिंदा है (२०१७) :
समान खान भलेही पाकिस्तानात खूप लोकप्रिय असला तरी त्याचा देखील एक चित्रपट ‘टाइगर जिंदा है’ हा पाकिस्तानात रिलीज होऊ शकला नाही. ह्या चित्रपटात कॅटरीना कैफने पाकिस्तानी एजेन्सी आयएसआयच्या एजंटची भूमिका साकारली आहे, जिला एका रॉ एजंट म्हणजेच भारतीय एजेन्सी च्या एजंटशी प्रेम होते. ह्या चित्रपटाला अॅण्टी नेशन म्हणत बॅन केले.
जॉली एलएलबी-२ (२०१७) :
अक्षय कुमारचा हा चित्रपट देखील पाकिस्तानात रिलीज होऊ शकला नाही, कारण ह्या चित्रपटात काश्मीरचा मुद्दा दाखविण्यात आला आहे.
रईस (२०१७) :
शाहरुख खान देखील पाकिस्तानात अतिशय लोकप्रिय आहे, तरीही त्याचा रईस हा चित्रपट पाकिस्तानात रिलीज होऊ शकला नाही. पाकिस्तानी सेन्सर बोर्डाच्या मते ह्या चित्रपटात ईस्लाम धर्माला नकारात्मक उद्देशाने दाखविण्यात आले आहे.
दंगल (२०१७) :
ह्या यादीत आमीर खानचा दंगल हा चित्रपट देखील आहे. पण ह्या चित्रपटात तर पाकिस्तान बाबत काहीच नाही आहे. मग त्यांनी हा चित्रपट रिलीज का नाही होऊ दिला? तर ह्यामागे पाकिस्तानीसेन्सर बोर्डाने जे कारण दिले आहे ते खरंच हास्यास्पद आहे. तुम्हाला आठवत असेलं की दंगल ह्या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये जेव्हा गीता फोगट जिंकते तेव्हा भारताचे राष्ट्रगीत लागतं, बसं ह्याचं कारणावरून ह्या चित्रपटाला पाकिस्तानात रिलीज मिळाला नाही. कारण पाकिस्तानी जमिनीवर भारतीय राष्ट्रगान वाजणे हे त्यांना अपमानास्पद वाटत होते.
नीरजा (२०१६) :
नीरजा, हा चित्रपट एका रिअल स्टोरीवर बनविण्यात आला आहे. हा चित्रपट प्लेन हायजॅकवर आहे. ह्यामध्ये सोनं कपूरने एयर होस्टेस नीरजा भानोतची भूमिका साकारली आहे. ह्यामध्ये पाकिस्तानविषय नकारात्मक गोष्टी दाखविण्या आल्या आहेत म्हणून हा चित्रपट तिथे बॅन करण्यात आला आहे.
फँटम (२०१५) :
२०१५ साली सैफ आली खान आणि कॅटरीना कैफ असलेला हा चित्रपट देखील पाकिस्तानात रिलीज होऊ शकला नाही. हा चित्रपट २६/११ च्या मुंबई हल्ल्यावर आधारित होता, ज्यात पाकिस्तानचा हात होता. आता तिथे हा चित्रपट रिलीज का नाही झाला हे वेगळ्याने सांगायची गरज नाही.
–
- बॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे?
- या आहेत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या कर्तबगार बायका!
–
बेबी (२०१५) :
अक्षय कुमारचा बेबी हा चित्रपट देखील पाकिस्तानमध्ये बॅन करण्यात आला. त्यांच्या मते ह्या चित्रपटात मुस्लीमांबद्दल खूप नकारात्मक गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत. सोबतच ह्या चित्रपटातील नकारात्मक भूमिका साकारणाऱ्यांची नवे देखील मुस्लीम होती म्हणून हा चित्रपट पाकिस्तानात बॅन करण्यात आला.
रांझणा (२०१३) :
सोनं कपूर, अभय देओल आणि धनुष ह्यांचा चित्रपट रांझणा ह्यावर देखील पाकिस्तानात बॅन लावण्यात आला. आणि ह्याचं कारण म्हणजे ह्या चित्रपटात सोनं कपूर ही मुस्लीम असून ती एका हिंदू मुलाच्या प्रेमात पडल्याचं दाखविण्यात आले आहे म्हणून, हा चित्रपट पाकिस्तानी सेनासार बोर्डाने पाकिस्तानात रिलीज करण्यास मनाई केली.
–
- जीवाची बाजी लावत लढणाऱ्या सैनिकांचे बॉलीवूडने केलेले हे चित्रीकरण चीड आणणारे आहे
- बॉलीवूडने ठरवलेल्या प्रेमाच्या व्याख्यांमध्ये अडकलेली तरुणाई
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.