आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुम्ही महागड्या कार, बाईक्स, घर, दुकान, हॉटेल आणि अश्या कित्येक महागड्या गोष्टींबद्दल बऱ्याचदा ऐकलं असेल. पण तुम्हाला आम्ही सांगितलं की जगात महागडे रस्ते देखील आहेत तर…? तुम्ही म्हणालं की त्यांच्या बांधकामाच्या खर्चावरून त्यांना महागडे रस्ते म्हणत असतील, पण असं नाहीये. या रस्त्यांना महागडे रस्ते यासाठी म्हटलं जातं कारण इथे आहेत महागड्या बिल्डींग्स, काही महत्त्वाच्या वास्तू आणि अतिशय श्रीमंत लोकांची अतिशय महागडी घरं ! असाच एक महागडा रस्ता आपल्या मुंबईमध्ये देखील आहे. जगातील सर्वात १० महागड्या रस्त्यांमध्ये या रस्त्याचा समावेश होतो बरं का ! या रस्त्याचं नाव आहे अल्टामाउंट रोड !
दक्षिण मुंबईमधील खंबाला हिल या हाय प्रोफाईल एरियामध्ये अल्टामाउंट रोड असून हा रस्ता पेडर रोड ला समांतर आहे. हा रस्ता पुढे जाऊन ज्या वळणावर पेडर रोडशी जोडला जातो त्या वळणाला केम्स कॉर्नर म्हणतात. (आता बहुतेकांच्या लक्षात आलं असेलं)
पूर्वी या रस्त्यावर अल्टामाउंट नावाचा बंगला होता म्हणून या रस्त्याला अल्टामाउंट रोड म्हटले जायचे. पण १९९० मध्ये शासनाने या रस्त्याला ‘एस.के.बरोडावाला’ असे अधिकृत नाव दिले. पण आजही येथे या रस्त्याला त्याच्या पूर्वीच्याच नावाने म्हणजे अल्टामाउंट रोड या नावानेच ओळखले जाते.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. तसेच अनेक महत्त्वाच्या वास्तू आणि बिल्डिंग्जचे देखील याच रस्त्यावर दर्शन होते. येथे इंडोनेशिया व दक्षिण आफ्रिका या देशांच्या वकिलाती आहेत. या रस्त्याला जोडलेल्या कारमायकल रोडवर बेल्जियम, चीन आणि जपान या देशांच्याही वकिलाती आहेत. याशिवाय अल्टामाउंट रोडवर बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या चेअरमनचे अधिकृत निवासस्थान आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांचे अधिकृत निवासस्थान देखील याच अल्टामाउंट रोडवर आहे.
नोव्हेंबर २०१५ मध्ये ज्या अपार्टमेंटमधून भारतातील सर्वात महागडा फ्लॅट विकला गेला ते लोढा बिल्डर्सचे ‘लोढा अल्टामाउंट’ हे लक्स्झरियस अपार्टमेंट सुद्धा याच अल्टामाउंट रोडवर आहे.
मफतलाल कॉम्पलेक्स आणि सुप्रसिद्ध डिजाईनर स्टोर ‘अझा’ देखील याच रोडवर आहे. अजून संपलं नाही मुख्य गोष्ट तर अजून बाकी आहे. जगातील सर्वात महागड घर म्हणून मुकेश अंबानीच्या ज्या एन्टालिया या २७ मजली भव्य मेन्शनचा उल्लेख केला जातो ते घर देखील याच अल्टामाउंट रोडवर आहे.
आपल्या मुंबईमध्ये एक जागतिक आश्चर्य आहे आणि आपल्याला माहित देखील नाही. कधी या अल्टामाउंट रोडवर गेलात तर साष्टांग दंडवत घालायला विसरू नका…
कुणास ठाऊक…कुबेराची थोडीशी कृपा आपल्यावरही व्हायची!
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.